महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे ७ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत टिकून, तो सुधारण्यास सुद्धा मदत होते. मूग पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळे आणि पर्यायाने पाण्याचा वापर कमी झाल्याने जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचविता येते. या पिकांच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळे या पिकांची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय या पिकानंतर घेण्यात येणा-या पिकासाठी उत्तम ते जमिनीत गाडल्यास त्यापासून हिरवळीचे पीक घेतल्याप्रमाणे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.
मानवी आहाराच्या दृष्टीने मुगास विशेष महत्व आहे. मुगामध्ये २० ते क्ष२५ टक्के प्रथिने असतात आणि ही प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मूग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. कोणत्याही पिकापासून जास्तीतजास्त उत्पादन काढायचे असेल तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणा-या वाणाची निवड, योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्वमशागत, बियाण्याचे प्रती हेक्टर पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारशीत प्रमाणात वापर, वेळीच तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार वेळेवर पाणीपुरवठा, रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण महत्व आहे.
जमीन
उन्हाळी मुगासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी.
बियाणे प्रमाण आणि लागवडीचे अंतर
पिक कालावधी लागवडीची पद्धत हेक्टरी बियाणे (किलो) लागवड अंतर (से.मी.) उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण
मुग ६० ते ६५ सरी वरंबा १५ ते २० २२.५ *१० किंवा ३०*१० वैभव,फुले एम -२,पुसा-९३५१ ,पुसा विशाल,एस एल एम-६६८,एच यु एम -१,पंत मुग-५,सम्राट (पी डी एम -१३९ ), मेहा (आय पी एम ९९ -१२५), दुर्गा (आर एम जी -२६८ )
जमीन योग्य ठरते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते.
हवामान
या पिकास २१ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच ३0 ते ३५ अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी अधिक उत्पादन मिळते.
पूर्वमशागत
खरीप/ रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. जमिनीची खोल नांगरट नंतर २ कुळवण्या करून जमीन भुसभुशीत करावी. उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करून रानबांधणी करावी. जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सा-या पाडाव्यात. दोन ओळीतील अंतर २२.५ ते ३0 सें.मी. ठेवावे.
पेरणीची वेळ
उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करून नये अन्यथ: पीक मान्सुनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.
बियाण्याचे प्रमाण
पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रती हेक्टर बियाण्याचे प्रमाण पुरेसे आणि योग्य वापरणे महत्वाचे ठरते.
जमीन योग्य ठरते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते.
हवामान
या पिकास २१ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच ३0 ते ३५ अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी अधिक उत्पादन मिळते.
खत
चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० ते १५ गाड्या प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरावे. यामुळे ते जर्मिनीत चांगले मेिसळले जाते व अशा जमेिनीत या पेिकाची जोमदार वाळू होण्यास उपयोग होतो. पेरणी करताना मूग पिकास २o किलो नत्र आणि ४0 किलो स्फुरद प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावे.
आंतरमशागत पीक सुरुवातीपासूनच तणविरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढ़ीसाठी आवश्यक बाब आहे. कोळष्याच्या सहाय्याने पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली व ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. गरजेनुसार एक दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. पेरणीपूर्वी
फ्ल्युक्लोरालीन किंवा पेंडीमीथिलीन हे तणनाशक दौड़ लीटर प्रती हेक्टर पाचशे लेिट्र पाण्यातून जमिनीवर फवारावे.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय महत्वाचे असते. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्याने ओर्लिताच्या साधारणपणे ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जर्मिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येताना आणि शेंगा भरतांना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. तसेच पीक ५0 दिवसांचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होईल.
पीक संरक्षण
सामान्यतः खरिपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढ्ळून येतो. मात्र उन्हाळ्यातील कोरड्या व अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या विषाणूचा प्रसार पांढ्या माशीद्वारे होतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान ठिपके दिसतात व श्रोड्याच दिवसात पानांच्या ब-याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून कर्बग्रहण क्रिया मंदावते व फार कमी शेंगा लागतात.
रोगाचा प्रादुर्भाव शेंगांवरही दिसून येतो. रोग नियंत्रणासाठी प्रथम रोगबाधित झाडांचा मुळासकट उपटून नायनाट करावा. त्यानंतर विषाणूचा प्रसार करणा-या पांढ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही १0 मि.ली. केिंवा इमिड़ाक्लोप्रिड़ १७.८ टक्के प्रवाही २ मिली. प्रती १0 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
मुग पिकावर मावा, शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, पाने खाणारी अळी, इ. किर्डीचा प्रादुर्भाव होतो. या किर्डीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कोड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. त्यासाठी जमिनीची खोल नांगरष्ट करणे, पिकाची वेळेवर पेरणी, जैविक कोड नियंत्रण, परोपजीवी किंडींचा वापर, गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर इ. बाबींचा अवलंब करणे महत्वाचे आहे. मावा किंडीच्या नियंत्रणासाठी डायमेश्रोएट ३0 टक्के प्रवाही १0 मि.ली. प्रती १0 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठीं क्विनॉलफोस २५ टक्के प्रवाही १६ मेिं.ली. केिंवा स्पिनोसड़ ४५ टक्के प्रवाही ३ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुसरी एक फवारणी करावी.
काढणी, मळणी आणि साठवण
मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १g दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीच्या सहाय्याने झोडपून दाणे अलग करावेत. साठवणीपूर्वी मूग ४ ते ५ दिवस उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करु नये. शक्य झाल्यास धान्यास १ टका करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणुकीतील किंडींपासून मुगाचे संरक्षण होते.
उत्पादन : १o ते १२ किंवटल / हेक्टर प्रमाणे उत्पादन मिळते.
Share your comments