प्राचीन काळापासून विविध 'वनस्पती, खणीज व प्राणीजन्य तेल त्यांच्या अत्युच्च गुणधर्मा नुसार कृषी क्षेत्रातील विविध 'बुरशीजन्य रोग व किडींवरील' नियंत्रणा करिता उपयोगात घेतले आहेत. त्यासंदर्भात आता आपण माहिती घेवुया.तेलाची फवारनी करतांना 'तेल विघटकांचा' वापर केल्यास तेल पाण्यात मिक्स होतात आणि इतर औषधींसोबत त्यांचा वापर करणे शक्य होते.अन्यथा तेल पाण्यावर तरंगत असल्यामुळे बर्याच शेतकरी मित्रांची इच्छा असुनही ते फवारणी करू शकत नाहीत.तल पाण्यात विरघळवीन्या करिता साबनाचा चुरा किंवा सोडा(निरमा) व स्टिकर असे तकलादू आणि मुर्ख पणाचे पर्याय करू, वापरू किंवा कुणास सुचवू सुद्धा नका. यामुळेच तेलांचा परिणामकारक वापर आजच्या भारतीय शेतीत होवू शकला नाही.प्रत्येकच तेलाचे पाण्यात फवारणीचे प्रमाण ०.५% ठेवावे.(५मीली प्रती १लिटर पाण्यात)(शेतकरी बांधवांच्या मागणी वरून 'निसर्ग फाऊंडेशन' द्वारे स्वस्त व परिणाम कारक फळमाशींचे सापळे, 'मासोळी, निम, करंज व पॅराफीन [खणीज] तेल', 'तेल विघटक', 'फळमाशीचे सापळे', 'सौर प्रकाश
सापळे','पिवळे/निळे चिकट सापळे', 'हाड-मासाचे खत'.निंबोळी चुरी','द्रवरूप जिप्सम' व 'जिप्सम पावडर' देण्यात येते,इतर जिल्ह्यातील पुरवठा संबंधित कोणताही खर्च घेण्यात येत नाही.)कृषी क्षेत्रात वापरण्यात येणार्या तेलांचे प्रकार-१.खनिज तेल (उदा.petroleum Base)२.वनस्पती तेल (उदा. निम, करंज ई.)३.प्राणीजन्य तेल (उदा. मासोळी तेल)त्यातही सरळ वापरातले म्हणजेच तेल घाण्यातून काढलेले कोणतीही प्रक्रिया न केलेले तेल Dormant Oil आणि गाळण लावून प्रक्रिया करून वापरात घेतलेले तेल Refind Oil असे प्रकार आहेत. या दोन प्रकारच्या तेलांचा वापर वातावरणातील थंड पणावर अवलंबून आहे. 'Dormant oil' ची परिणामकारकता जरी जास्त असली तरी अशा तेलांची थंडीतील फवारणी घट्ट व चिकट थर निर्माण करते त्यामुळेच बहार किंवा नवीन पालवीला मारक ठरू शकते. परंतू असे तेल उष्ण काळात वापर केल्यास फायदा होतो. याशिवाय प्रोसेस केलेले 'रिफाइन तेल' वापरात घेतांना वातावरणाचा विचार करण्याची गरज नाही.तेल वापरतांना घ्यावयाची काळजी-१.वातावरण/ॠतू (सीझन), किटक व बुरशींच्या प्रकारानुसार तेल कोणते वापरावे याबाबत मार्गदर्शन किंवा अभ्यासाची गरज आहे.नाहीतर आपल्याकडे उठसूट कशावरही एकच पर्याय. 'फवारा निंम तेल' हा प्रकार अतीशय मुर्ख पणाचा आहे.
२.तेलांच्या फवारणीत पुर्ण झाडावरील फवारा आवश्यक आहे. (बुंधा ते शेंडा).३.फवारणीचे तृषार बिंदू सुक्ष्म असावेत. थेंब नसावा.४.अती थंड काळ व उष्ण काळ टाळावा.५.पावसाळ्यातील पावसाच्या अती विलंब काळात तेल फवारणीस वापरू नये.६. गंधक (सल्फर) किंवा ताम्रयुक्त (कॉपर) बुरशीनाशकां सोबतचा वापर टाळावा.७.सरळ घाणीचे तेल (Dormant oil) हिवाळ्यात किंवा पालवी (नवती), बहार धरतांना वापरू नये.किटक व बुरशी विरूद्ध तेलांची फवारणी कसे कार्य करते (Mode of Action)सर्वच तेलांची कार्यप्रणाली जवळपास सारखीच असते. यामध्ये कीटकनाशक म्हणून जेंव्हा तेलांचा वापर होतो. त्यावेळी...१.तेल फवारणी मुळे होणाऱ्या गॅस उत्सर्जनामुळे किटकांची दमकोंडी होते.२.किटकांच्या शरिराची जळजळ होते व त्यांच्या शारीरिक बदलात (Metamorphosis) अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच किटकांच्या उत्पत्तीवर परिणाम होतो व किटकांत प्रतीकारक्षमता निर्माण होऊच शकत नाही.३.किटकांच्या खान्यात तेलांचा अंश गेल्यावर उत्तम पोट विषाचा परिणाम दिसतो.
४.रस शोषक किडींच्या ( पांढरी माशी, मावा, तुतुडे, फुलकिडे व कोळी) रस ग्रहन प्रक्रियेवर असर करत असल्यामुळेच बर्याच विषाणू (व्हायरस) चे वहण करन्याची (vectors or carriers) प्रक्रिया थांबते व रोगांचा प्रसार थांबतो.बुरशीजन्य रोगांवर जेंव्हा या तेलांचा वापर होतो तेंव्हा.१.बुरशींचे कवकिय जाळे (Fungal filament) तोडते.त्यामुळेच बुरशींची वाढ थांबते व तीचा नाश होतो.२.बुरशीजन्य रोगांचा विस्तार (spred) बुरशींच्या बिजांपासून (Spores) हवा, प्राणी व किटकांच्या माध्यमां द्वारे वहन होवून होत असतो. परंतु, तेलांच्या फवारनी मुळे बुरशींचे बीज आहे त्या स्थितीत एकाच ठिकाणी चिटकून बसतात आणि अपरिपक्व स्थितीतच त्यांचा नाश होतो. त्यामुळेच बुरशीजन्य रोगांच्या अती प्रादुर्भाव काळात तेलांची फवारणीच एकमेव पर्याय ठरतो.३.काही वनस्पती तेलात गंधकाचा (Sulphur) अंश असल्या कारणावरून त्यांचा बुरशीजन्य रोगांवर उत्तम रितीने परिणाम साधता येतो.
संकलन: पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क- 9403426096, 7350580311
Share your comments