पेरणीपासून ते उगवणीपर्यंत पिकांवर विविध प्रकारच्या किड व रोगांचे आक्रमण होत असते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३o ते ७o टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ही घट टाळण्यासाठी पिकांवरील किडींचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वसाधारण आठवड्यातून एक वेळा, तर नियमित तीव्र प्रादुर्भाव क्षेत्रात आठवड्यातून दोन वेळा किडीचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. कोड सर्वेक्षण : कोड सर्वेक्षणामध्ये किडीची ओळख, अवस्था, जीवनक्रम, मित्र कीटक, त्यांची संख्या तसेच नियंत्रणासाठी किडीची अवस्था इत्यादी माहिती मिळते. नियंत्रणाची वेळ, शिफारशीत कीटकनाशक व त्याची नेमकी किती मात्रा वापरावी, हे ठरवता येते. नियमित सर्वेक्षणामुळे कीटकनाशकांच्या फवारण्या व त्यांची मात्रा कमी करता येते. तसेच, कीटकनाशकांचा संतुलित वापर करता येतो.
एकाच वर्गातील कीटकनाशके पुन्हा पुन्हा वापरल्यास या कीटकनाशकांची किडीमध्ये भिनण्याची प्रक्रिया सारखी असल्यामुळे कोड स्वतःमध्ये त्या कीटकनाशकाविरुद्ध संरक्षण यंत्रणा निर्माण करते. त्यालाच आपण किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली, असे म्हणतो. उदा. रसशोषक किडीचे जीवनचक्र सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यांचे असल्यामुळे कीटकनाशकाच्या पहिल्या फवारणीतून वाचलेली किडींच्या प्रतिकारक पिढ्या तयार होतात.
कीटकनाशकांचा अविवेकी व अमर्याद वापरामुळे किडीवर जगणारे मित्र कीटक मारले जाऊन पोषक हवामानात किडीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊ शकतो.
चुकीच्या फवारणी पद्धतीमुळे अपेक्षित नियंत्रण मिळत नाही. शिफारशीत कीटकनाशके किडींवर प्रभावी असतात व योग्य फवारणी तंत्रज्ञान वापरुन किडींचे अपेक्षित नियंत्रण हमखास मिळते.
किडीचे प्रभावी नियंत्रण
फवारणी केव्हा करावी : नियमित सर्वेक्षणाद्वारे किडींची व त्यांचे परभक्षक कीटकांची संख्या मोजून घ्यावी. कोड व परभक्षक कीटकांचे सर्वसाधारण गुणोत्तर १:२ आल्यास पिकामध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. त्यापूर्वी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा भाग म्हणून पर्यावरणास सुरक्षित (इकोफ्रेंडली) अशी कीटकनाशके निवडावीत. तसेच किडींचे शत्रू कीटक मारले जाणार नाही. वनस्पतिजन्य व जैविक कीटकनाशकांचा मोठ्या क्षेत्रावर किंवा गावपातळीवर एव?Iच वेळी वारंवार वापर कल्यास त्या भागात किडींचा उट्रेक होणार नाही. जैविक कीटकनाशकांच्या वापरास काही मर्यादा आहेत. ही कीटकनाशके वातावरणात आर्द्रता असल्यास व उन्हाची प्रखरता टाळल्यास अधिक प्रभावी ठरतात. जैविक कीटकनाशके आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
योग्य किटकनाशकांची निवड: फवारणीपूर्वी कीटकनाशकांची निवड करताना आपल्या पिकांवर कोणती कोड/रोग आहे, याची सर्वेक्षणाद्वारे खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. उदा. पानावर तपकिरी ठिपके, तपकिरी किंवा काळसर असतील, तर अशी लक्षणे बुरशीजन्य रोगाची आहेत. अनियमित तपकिरी ठिपके,चट्टे खोलगट/तेलकट असेल तर ही लक्षणे जिवाणुजन्य रोगाची, तर पानावर मोझेंकसारखे पिवळे/गर्द पिवळे व हिरवे चट्टे, पानाचा अनियमित आकार अशी लक्षणे असतील तर विषाणुजन्य रोग, असे समजावे.
किंडीमुळे नुकसान होत असल्यास पाने कुरतडणे, पानाला गोल/अनियमित छिद्रे, खरचटणे, काप, खोडाला छिद्रे इ. लक्षणे असल्यास किडींचा प्रादुर्भाव समजावा. पिकावर कोड किंवा रोगाचे निदान झाल्यावर कोडरोग कोणत्या प्रकारचा आहे, याची तज्ज्ञांकडून पडताळणी करून घेऊन शिफारशीत कीटकनाशकांचा/बुरशीनाशकाचा नियंत्रणासाठी वापर करावा. किडीसाठी स्पर्शजन्य व पोटविष शिफारशीत कीटकनाशकांची निवड करावी.
कोटकनाशकांचे द्रावण तयार करणे : कीटकनाशकांचे पाण्यामध्ये द्रावण करताना प्रामुख्याने दोन प्रकारची कीटकनाशके बाजारात असतात. एक म्हणजे पाण्यामध्ये मिसळणारी (ईसी, एससी, डब्ल्यूपी, डब्ल्यूएससी इत्यादी), तर दुसरी म्हणजे पाण्यात विरघळणारी (एसपी, डब्ल्यूएसएल, एसएल, एसजी इ.). पहिल्या प्रकारच्या कीटकनाशकाचे क्रियाशील घटक विद्रावकामध्ये मिसळतात. हे विद्रावक ब-याच अंशी पाण्यामध्ये मिसळणारे असल्यामुळे ते कीटकनाशक (क्रियाशील घटक) व पाणी यांमधील दुव्याचे काम करते. अशी फॉर्म्युलेशन असलेली कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळतात; परंतु विरघळत नाही. गव्हाचे पीठ जसे पाण्यात मिसळते, त्याप्रमाणे चांगले ढवळल्यानंतर ते पाण्यात एकसारखे पसरते; परंतु काही वेळाने ते तळाशी बसते. म्हणून पाण्यात मिसळणा-या कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते व फवारणी करताना असे द्रावण परत-परत ढवळावे लागते. दुस-या प्रकारची कीटकनाशके पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून ती किडीसाठी प्रभावी ठरतात. तसेच, झाडांमध्ये त्वरित शोषली जातात. कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना पहिले प्लॅस्टिक बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात कीटकनाशक मोजून टाकावे व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. उदा. हे द्रावण १oo लिटर पाण्यासाठी तयार केलेले असल्यास ड्रममध्ये बकेटमधील द्रावण टाकून पाण्याची पातळी १oo लिटरची करावी व परत काठीने एकजीव द्रावण होईपर्यंत ढवळावे. प्रत्येक वेळी पंपामध्ये द्रावण भरताना ड्रममधील द्रावण काठीने ढवळत जावे.
फवारणी कशी करावी? : शिफारशीत कीटकनाशक योग्य मात्रेमध्ये घेऊन सांगितल्याप्रमाणे द्रावण तयार करावे. फवारणी करताना हातपंपाला (नॅपसॅक स्पेअर) हॉलो कोन नोझल वापरावे. कंपनीच्या पंपाला सर्वसाधारण हे नोझल असते. पंपाचे नोझल घट्ट करावे. या नोझलमधून ४० ते ८० पीएसआय दाब उत्पन्न होऊन फवान्याचे कवरेज मिळते. या पंपाने सर्वसाधारण पीकवाढीच्या अवस्थेनुसार ३५० ते ५oo लिटर पाणी प्रति हेक्टर लागेल. पीक मोठे असल्यास व दोन ओळींतील जागा संपूर्ण झाकल्यास पावर पंपाचा वापर करावा. या पंपातून प्रतिमिनीटo.५ ते ५ लिटर द्रावण बाहेर पडू शकते. या पंपाच्या होस पाइपला चार अॅडजस्टमेंट आहेत. त्यानुसार हवेचा दाब कमीजास्त घरून पिकाचा घेर व पानाच्या आकारमानानुसार द्रावण पडण्याचा वेग आपल्या चालण्याच्या वेगानुसार नियंत्रित करावा. सर्वसाधारण या पावर पंपाने प्रतिहेक्टर १७५ ते २oo लिटर पाणी लागेल. पावर पंपाला शिफारशीत कीटकनाशकांची मात्रा तीन पट करावी. फवारणी करताना हवेच्या दिशेने फवारणी करावी. हवेचा वेग (५ किमी प्रतितासपेक्षा) जास्त असल्यास द्रावण उडून जात असल्यास फवारणी टाळावी. पावसाची शक्यता असल्यास फवारणी टाळावी. फवारणी करताना पंपाचे नोझल (लांस) पिकापासून सहा इंच दूर धरल्यास चांगले कवरेज मिळेल. फवारणी केल्यावर त्यावर कमीत कमी ६ तासांपर्यंत पाऊस नसावा; अन्यथा पानावरील/झाडावरील कीटकनाशक धुऊन जाऊन फवारणी निष्प्रभ होते. फवारणीच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता असल्यास व फवारणी करणे आवश्यक असल्यास फवारणीच्या द्रावणामध्ये चिकट द्रव्य (स्टिकर) वापरावे. त्यामुळे कीटकनाशक पानावर/झाडावर जास्त वेळ चिकटून राहून हलका पाऊस आल्यास धुऊन जाणार नाही. याउलट प्रखर उन्हात उच उच्च तापमानामुळे कीटकनाशकाचे झाडावर पडण्यापूर्वी विघटन होण्याची शक्यता असते; त्यामुळे प्रखर उन्हात उद्य तापमानात फवारणी करण्याऐवजी सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. कीटकनाशके खरेदीपूर्वी पिकाच्या फवारणी क्षेत्रावर किती पाणी ते जाणून घ्यावे. त्यानुसार फवारणीची मात्रा काढावी.
फवारणी करताना घ्यायची काळजी : अ) कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे. ब) डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वांत विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तीला समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात. क) तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हात मोजे, नाकावरील मास्क इत्यादींचा वापर करावा.
फवारणी तंत्रज्ञान : फवारणी करताना पिकाच्या घेरानुसार व पानांच्या आकारमानानुसार यापूर्वी सांगितल्यानुसार निवड करावी. त्यामधून सर्वसाधारण मध्यम आकाराचे (१oo ते ३oo मायक्रॉन) थेंब पडतात. मध्यम आकाराचे थेंब फवारणीसाठी योग्य आहे; परंतु यापेक्षा लहान आकाराचे थेंब फवारल्यानंतर पिकावर योग्य त्या ठिकाणी पडण्यापूर्वीच ते वा-याने इतरत्र जाण्याची शक्यता असते. मोठ्या सर्वेक्षणानुसार असे आढळून आले, की बहुतांश शेतकरी चुकीच्या पद्धतीने फवारणी करतात. किडीचे निदान न करता, योग्य पंप न वापरता व सदोष फवारणी केल्यामुळे शिफारशीत कीटकनाशके प्रभावी असूनसुद्धा अपेक्षित नियंत्रण मिळत नाही
Share your comments