1. कृषीपीडिया

सोयाबीन पिकात वाढलाय का स्पोडोप्टेरा लिटूरा किडीचा प्रकोप! मग जाणुन घ्या त्यावरील नियंत्रण

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
soyabien crop

soyabien crop

स्पोडोप्टेरा लिटूरा ह्या अळईला तंबाखू किड असेही म्हटले जाते याच कारण असे की भारतात ही अळई तंबाखू पिकावर जास्त करून आढळते. सोयाबीन पिकावर देखील ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि ह्याचे नियंत्रण वेळेवर केल नाही तर हे मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करू शकते. ह्या किडीचे सुंड हे काथ्याच्या रंगाप्रमाणे असते,ते सुंदीद्वारे पिकाच्या पानाला खाते, ज्यामुळे पिकाच्या पानाचे टीशु खराब होतात. जर ह्या किडिंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला तर पिकांची पूर्ण पाने गळून जातात, आणि पिकांची वाढ पूर्णपने खुंटते.

स्पोडोप्टरा लिटूरा किडीचे लक्षण

 • दिवसा जमिनीत राहणारे हे अळी रात्रीच्या वेळी झाडांवर हल्ला करतात.
 • ही किड हिरवे पदार्थ खाते, पिकांचे पाने खातात.
 • ज्यामुळे पाने पिवळी पडतात आणि नंतर पडतात आणि झाड कमकुवत बनते.
 • ह्या किडिंच्या हल्ल्यामुळे पानांवर लहान छिद्रेही दिसतात.

 स्पोडोप्टेरा लिटूरा किडीवर नियंत्रण कसं बरं करणार

 • पीक लवकर पेरल्यास ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
 • ह्या अळईची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
 • सोयाबीन पिकावर या किडीचा प्रभाव असल्यास शेताभोवती सूर्यफूल, अरबी आणि एरंडीची रोपे लावूनही ही किड कमी करता येते.

 

जास्त प्रादुर्भाव असलेल्या पिकाला उपटून ते नष्ट करा. अन्यथा त्याचा प्रादुर्भाव अजूनच वाढत जातो

 • पिकांची लागवड जर उन्हाळ्यात करत असणार तर नागरणी करताना खोलवर करावी ही काळजि घ्या.
 • उपयुक्त बीयांची मात्रा घ्यावी.
 • ज्या खतात किंवा खाद्यात नायट्रोजन जास्त असेल ते खाद्य शक्यतोर पिकाला लावू नका.
 • वेळेवर तन नियंत्रण करावे, म्हणजेच वेळेवर निंदनी, खुरपणी करावी जेणेकरून किडिंचा प्रादुर्भाव होणार नाही.
 • कोळी, सरडे, पक्षी इत्यादींपासून पिकांचे संरक्षण केले पाहिजे.
 • लाईटचा किंवा फेरामोनचा वापर करावा हे केल्याने सुद्धा ह्या किडिंवर चांगल्यापैकी कंट्रोल करता येतो.

 

 रासायनिक नियंत्रण

 • स्पोडोप्टरा लिटूरा अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास प्रति एकर जमिनीवर 180 मिली स्पिनेटोरम 11.7 एससीची जे मार्केट मध्ये डेलीगेट, लार्गो, समिट ह्या नावाने उपलब्ध असलेल्या स्प्रेची फवारणी करा.
 • किंवा फ्ल्यूबेंडीमाईड 39.35% प्रति एकर जमिनीवर 60-70 मिली पाण्यात फवारणी करा, हे औषध बाजारात फेम, ओरिजॉन इत्यादी नावाने उपलब्ध आहे.
 • या व्यतिरिक्त, आपण 300 ग्रॅम थिओडीकार्ब 75% डब्ल्यूपी (ब्रँड नेम- लेर्विन किंवा केमविन) देखील फवारू शकता.
 • आवश्यक असल्यास, 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करा.

 

 

 

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters