1. कृषीपीडिया

सोयाबीनमध्ये 2 प्रकारचे मोझॅक येतात – पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅक

सोयाबीन मोझॅक व अन्नद्रव्य कमतरता यातील फरक आणि नियंत्रण आज आपण बघणार आहोत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सोयाबीनमध्ये 2 प्रकारचे मोझॅक येतात – पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅक

सोयाबीनमध्ये 2 प्रकारचे मोझॅक येतात – पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅक

पिवळा मोझॅक पिवळ्या मोझॅकमध्ये पानाला हळदीसारखा पिवळेपणा येतो. हा पांढ-या माशीमार्फत प्रसारित होतो.तुम्ही मॉझॅक फरशी बघितली असेल. त्यावर छोटे छोटे ठिपके रॅंडम पद्धतीने विखुरलेले असतात. त्या ठिपक्यांचा आकारही निश्चित नसतो. अशी लक्षणे पानावर दिसतात तेव्हा मोझॅक हा रोग झाला आहे असे समजावे. हिरवट पिवळे, पिवळसर ठिपके एकमेकांत मिसळलेले असतात, रॅंडम पद्धतीने विखुरलेले असतात. असे सुरूवातीला एखाद दुस-या पानावर दिसते व बाकीची पाने हिरवी असतात. त्यानंतर नवीन येणारी पाने पिवळ्या रंगाची असतात.

सोयाबीन मोझॅक:सोयाबीन मोझॅकमध्ये पिवळेपणा जास्त दिसत नाही. साधारण पिवळी छटा पानावर येते. पानं कुस्करल्यासारखी किंवा वेडीवाकडी होतात. पानाच्या कडा खालच्या बाजूला वळतात. पानांचा आकार घटतो आणि सोयाबीन पिकाची उंचीसुद्धा घटलेली दिसून येते. हा बियाण्यामार्फत प्रसारित होतो.अन्नद्रव्य कमतरता:- याशिवाय लोह, जस्त नत्र, मॅग्नेशियम, पोटॅश इ. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेही पाने पिवळी पडतात. यामुळे झाडाची वाढ खुंटलेली दिसून येते.सोयाबीन वरील मोझॅक नियंत्रण 1.या रोगाचा प्रसार पांढरी माशी करते.2. रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल तर शेतातील रोगट झाडे उपटून नष्ट करावीत.

3.पिवळे चिकट सापळे शेतात हेक्टरी 15-16 लावावेत.4.पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करावा.5.प्रसार पांढरी माशी करत असल्यामुळे इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल या कीटकनाशकाची 2.5 मिली किंवा थायमिथॉक्झाम 25 डब्लू जी 2 ग्रॅम किंवा इथोफेनप्रोक्स 20 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सोयाबीन मोझॅक व अन्नद्रव्य कमतरता यातील फरक आणि नियंत्रण आज आपण बघणार आहोत.पिवळा मोझॅक पिवळ्या मोझॅकमध्ये पानाला हळदीसारखा पिवळेपणा येतो. हा पांढ-या माशीमार्फत प्रसारित होतो.तुम्ही मॉझॅक फरशी बघितली असेल. त्यावर छोटे छोटे ठिपके रॅंडम पद्धतीने विखुरलेले असतात. त्या ठिपक्यांचा आकारही निश्चित नसतो. 

अशी लक्षणे पानावर दिसतात तेव्हा मोझॅक हा रोग झाला आहे असे समजावे. हिरवट पिवळे, पिवळसर ठिपके एकमेकांत मिसळलेले असतात, रॅंडम पद्धतीने विखुरलेले असतात. असे सुरूवातीला एखाद दुस-या पानावर दिसते व बाकीची पाने हिरवी असतात. त्यानंतर नवीन येणारी पाने पिवळ्या रंगाची असतात.सोयाबीन मोझॅकमध्ये पिवळेपणा जास्त दिसत नाही. साधारण पिवळी छटा पानावर येते. पानं कुस्करल्यासारखी किंवा वेडीवाकडी होतात. पानाच्या कडा खालच्या बाजूला वळतात. पानांचा आकार घटतो आणि सोयाबीन पिकाची उंचीसुद्धा घटलेली दिसून येते. हा बियाण्यामार्फत प्रसारित होतो.

English Summary: Soybeans come in 2 types of mosaics - yellow mosaic and soybean mosaic Published on: 02 June 2022, 07:55 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters