वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत अनेक पिकाच्या वाण विविध संशोधन केंद्रातून आजवर विकसित झाले अशातील एक महत्वाचे संशोधन केंद्र म्हणजे कृषी संशोधन केंद्र बदनापूर आहे या केंद्राचा मागील तीस वर्षाचा मागोवा घेतला तर कालानुरूप संशोधन निर्मिती करण्यात संशोधकांना यश आलेले आहे सुरवातीस बिडीएन 2 या वाणापासूनचे संशोधन आम्हाला माहिती आहे.खूप दिवस या वाणाने शेतकऱ्याच्या मनात घर केले त्यानंतर बीएसएमआर म्हणजे बदनापूर स्टरलेटी मोझाक रजीस्टन्स 853 आणि 736 ही दोन अधिक उत्पादन देणारी वाणाची निर्मिती झाले 853 रंग पांढरा आणि 736 रंग लाल ही वान उत्पादनात अतिशय अग्रेसर होती पण कोरडवाहू शेतीत भरपूर उत्पादन मिळणे अवघड होते
त्याचे कारण म्हणजे या वाणाचा कालावधी होय उत्पादन क्षमता असूनही कोरडवाहू शेतकरी या वाणाच्या लागवडीपासून वंचित झाले हमखास एखादे पाणी असल्याशिवाय लागवड करणे तश्या अर्थाने धाडसाचे होते.या सर्व परिस्थितीत नेमकं मराठवाड्याच्या शेतीत कोणता वान असावा त्याची काय खास वैशिष्ट्य असावे जेणेकरून शेतकरी बांधव अशा वाणाची लागवड करतील याच चिंतनातून पुढे बिडीएन 711 या वाणाची निर्मिती संशोधकांनी केली हा वान आज शेतकऱ्यांचा प्रथम पसंदीचा ठरला आहे विषेश म्हणजे कोरडवाहू शेतीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा, आणि पाणी देण्याची व्यवस्था असेल तर उत्तम प्रतिसाद देत उत्पादनात भरती आणणारा हा वान ठरला मागील आठ वर्षांपासून या वाणाची लागवडीसाठी शेतकरी उपयोग करतात आणि प्रत्येक शेतकरी या वाणाचे गुणगौरव करतात याची खास वैशिष्ट्य म्हणजे रंग पांढरा, 150 ते 160 दिवसात तयार होणारा, कोरडवाहू शेतीत तग धरनारा काढणीस एकाच वेळी पक्व होणारा
काढणीस विलंब झाला तरी शेंगा फुटणे किंवा गळणे हा प्रकार न होणे त्यामुळे सर्व शेतकरी या वाणाच्या प्रेमात पडलेबिडीएन 716 हा वान बिडीएन 711 या वानांनंतर उदयास आला आहे याचा रंग लाल आहे कालावधी 170 दिवस आहे विदर्भ आणि मराठवाडा विभागात लातूर , हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी या वाणाची मागणी करतात या वाणाचा कालावधी जास्त असल्याने हमखास सिंचन व्यवस्था असल्याशिवाय लागवड करू नये अशी संशोधन शिफारस करण्यात आलेली आहे मर व वांझ रोग प्रतिकारक्षमता क्षमता असलेला हा वान आहेबिडीएन 2013 - 41 म्हणजेच गोदावरी हा मागील वर्षी विकसित झाला आहे या वाणाची उत्पादकता ही बिडीएन 711 या वाणापेक्षा अधिक आहे असा संशोधकांचा दावा आहे
विशेष म्हणजे बिडीएन 711, 716 आणि गोदावरी या तीन ही लोकप्रिय वाणाची निर्मिती ही एकाच संशोधकाचा मार्गदर्शनाखाली चमू ने केली आहे.हा वान रंगाने पांढरा असून पूर्वीचा बिडीएन 2 सारखी शाकीय वाढ होते फांद्याची संख्या जास्त, मर व वांझ रोग प्रतिकारक आहे कालावधी 170 दिवसाचा आहे बिडीएन 711 या वाणापेक्षा दाणा टपोरा आहे ठिबकद्वारे लागवडीस योग्य , मात्र कोरडवाहू शेतीत लागवड करू नये भारी जमीन आणि सिंचन व्यवस्था असल्याशिवाय लागवड करू नये. अशा प्रकारे मराठवाड्याच्या शेतीसाठी तूर पिकाच्या वाणाच्या बाबतीत कृषी संशोधन केंद्राचे मोठे भरीव योगदान आहेया वाणाचा खरिपात पेरणीसाठी वापर करा भरघोस उत्पादन घेऊन आनंदी राहा
माहिती स्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र पैठन रोड औरंगाबाद
Share your comments