1. कृषीपीडिया

इंडिकेटर क्रॉप! या पिकांच्या मदतीने तुम्हाला कळेल पिकावर येणाऱ्या कीड व रोग येण्याचे संकेत

पिकांवर अनेक प्रकारच्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव हा बदलत्या हवामानामुळे होत असतो. त्यामुळे त्यांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. एखाद्या गोष्टीमुळे किंवा पिकांमुळे जर आपल्या पिकांवर कोणते कीड येणार आहे किंवा कोणते रोग येणार आहे त्यांचे संकेत आपल्याला मिळाले तर नक्कीच आपण त्या किडींवर व रोगांवर मात करू शकतो. या लेखात आपण अशाच कीड व रोगाचे संकेत देणाऱ्या इंडिकेटर्स क्रॉप म्हणजेच पिके यांची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
indicators crop

पिकांवर येणाऱ्या रोग आणि कीड यांचे  संकेत देणारे पिके

 मावा या किडीचा विचार केला तर ही कीड सगळ्यात आगोदर मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. या पिकांवर मावा ही कीड आले तर समजावे की यानंतर तो आपल्या शेतात असणाऱ्या पिकात येणार. दुसरे म्हणजे शेपूचाशेंडा जर पांढरा पडला तर समजावे आपल्या शेतात लावलेल्या पिकावर बुरशी येण्याचे हे संकेत आहेत.

 जर पिकाच्या अवतीभोवती किंवा कांदा पिकाच्या सभोवती मक्याची सिंगल लाईन करून त्याचे कंपाउंड केले तर कांदा पिकावर थ्रिप्स कमी येतो. मका पिकाच्या पोंग्यात मित्र कीटक लवकर तयार होतात. मक्यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो.

 तो कांद्यावर येत नाही. असाच फायदाच झेंडू या फुला झाडा मुळे देखील होतो.शेतात झेंडूची झाडे अधिक प्रमाणात असले तर लाल कोळी हे किटक झेंडूला आधी खातो. तसेच झेंडूचे फूल पीक सूत्रकृमी लाही अटकाव करते. करडई हे पीक जर शेतात असले तर करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायचे व मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात पाने टाकायचेत्यामुळेमावा मरतो.

 हिरवी मिरची व लसूण व त्यासोबतच गरज एवढी थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची त्यामुळे अळी चे नियंत्रण होते.

तसेच तुळस हे पीक फार महत्त्वाचे आहे. एका एकरात आठ तुळशीची झाडे लावली तर त्याच्या वासाने शत्रू कीटक पिका जवळ येत नाहीत.पिकाच्या आजूबाजूला रोग किडीचे प्रमाण असल्याचा  अनुभव आहे. तसेच लिंबाचा पाला व गवरीची जाळून राखुंडीतयार करून ती पिकावर धुरळल्यास नाग अळी नियंत्रणात येते.

English Summary: some idicator crop they are give indication ti insect and disease on crop Published on: 18 October 2021, 02:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters