नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे हा लेख लक्ष पुर्वक वाचा व अभिप्राय अवश्य द्या मित्रांनो आपन निसर्गाच्या चक्रा मधे आळा घालत आहे.
या गोष्टीला आपन सर्वच जवाबदार आहे ग्लोबल वार्मिग हे नाव काही तुमच्या आमच्या साठी नवं नाही शेती च्या माध्यमातून असो की औद्योगिकीकरण च्या माध्यमातून असो ही हे आपन स्वताहून स्वीकारावं लागेल की या गोष्टी ला आपन कारणीभूत आहे.पहिला मुद्दा म्हणजे शेती चं झालेलं रासायनिकरण! आपल्या डोक्यातून हा रसायनांचा भुतं काढणे महत्त्वाचे आहे या मुळे आपन आपल्या शेतीचा गुणधर्म च बदलविला आहे यावर आळा घालावा लागेल!आपन शेती बाबत येवढे अज्ञानी झालो की त्यांच अज्ञान पाहून हसावे की रडावे तेच कळत नाहीहि सुधारणा आपल्याला करावी लागेल माती ला वाचवण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहेहे माझ्या सारख्या लहानाला सांगावे लागते.आज आपन मातीला वाचविले नाही तर उद्या माती आपल्याला वाचवणार नाही!प्रथम मातिला समजून घ्या माझ्या शेतकरी बांधवांनो.अभि नहीं तो कभी नहीं.विज्ञान म्हणतं एका इंच मातीमध्ये करोडो जीवाणू आहे हे खरं आहे पण ते जिवाणू कोणत्या अवस्थेत आहे हे आपल्याला माहीत नाही
त्या साठी शेती व माती मध्ये लपलेले रहस्य शिकावं लागेल.जिवाणु विषाणू या अंधश्रध्येतुंन बाहेर पडावे लागले.कारण हे समिकरण कृषी क्षेत्रातील तज्ञांचे आहे आपले नाही.ते सांगतात म्हणून आपल्या मातीच्या कुशीत असलेल्या जिवाची ओळख माहीत आहे.या मधे ज्ञान असणं महत्वाचं आहे.शेती व माती मध्ये गरज आहे जिवाणू चे संवर्धन करून शेती व माती चे संगोपन करण्याची माती, पाणी,हवा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.त्यांना आपन नाकारुन चालणार नाही.आज आपन निसर्गाला मात देण्याच स्वप्न बघत आहे.आता हेच बघा ना !कोणतेही झाड हे प्रकाश संश्लेषण क्रीया द्वारे आपल्या फळाचं पोषण करतं हे सर्वांना माहीत असेल पण तरीही आपण जमिनीत खत व औषधी सोडतो कारण आपल्याला नैसर्गिक क्रिया माहीतच नाही.त्या साठी प्रथम मातिच आरोग्य जपावे लागेल त्याच बरोबर झाडांचे ही आरोग्य जपावे लागेल.त्यांच पोषण केले तर जी झाडांची वाढ त्याच बरोबर मूळं व पान चांगले दर्जेदार राहिले आणि माती कसदार असेल तर झाडांची वाढ चांगली होते.
मंडळी आपन आपल्या मातीचा कस सांभाळला तर आपलं हे निसर्गाच चक्र आपले काम सुरळीत करेल. मात्र आपन आज निसर्गाच्या विरोधात काम करत आहे खते औषधे हे आपन वारेमाप टाकत आहे पण मातीचा कस हा कमी कमी होत गेला आहे या मधे सुधारणा करायची म्हटले तर हा काही लहान मुलांचा खेळ नाही खेळलं खेळलं अन् मापले फोडली!आपल पहिलं धोरण असलं पाहिजे मातीची सुपिकता व सेंद्रीय कर्ब वाढविने. लक्षात ठेवा एक वेळ पाणी फिल्टर होईल पण माती नाही होणार मला हेच सांगायचे आहेजागे व्हा...आपन मातीचा कस काढुन घेता आहोत.आता तरि विचार करा साधी सरळ घटना आहे ति म्हणजे आपल्या उत्पादनात आलेली घटहे सर्व मातीच्या जळन घळन वर आधारित आहे. तिच्या पोटामध्ये काहीच नाहीत ते उत्पादन कशी देईल विचार करा....व आपल्याला मातीची भविष्यात गरज आहे.ति बिमार तर आपण बिमार राहणारच.... धन्यवाद मित्रांनो
Save the soil all together
मिलिंद जि गोदे
9423361185
Mission agriculture soil information
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:दुग्ध व्यवसायासह पशुधन देखील अडचणीत; आता शेतकरी आणखी खोलात
नक्की वाचा:राज्यात सध्या २४ लाख टन अतिरिक्त ऊस शिल्लक, अतिरिक्त ऊसासाठी वाहतूक तसेच अनुदानाची मागणी
Share your comments