1. कृषीपीडिया

सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा

आपल्या जमिनिमधे साधारणपणे चुनखडीचे ( C2CO3) कँल्शियम कार्बोनेट चे प्रमाण 4 ते 5% पेक्षा कमी असयला हवे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा

सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा

आपल्या जमिनिमधे साधारणपणे चुनखडीचे ( C2CO3) कँल्शियम कार्बोनेट चे प्रमाण 4 ते 5% पेक्षा कमी असयला हवे.ज्या जमिनिमधे मुक्त चुनखडीचे प्रमाण 8 ते 9% च्या पुढे असते ( चुनखडीयुक्त व पांढरी जमीन) त्या वेळी जमिनितुन 6 सूक्ष्म खतांपैकी फेरस (लोह) या खताची अजिबात उपलब्धता होत नाही.त्याच्या खालोखाल झिंक आणि मॉलिब्डेनम खताची उपलब्धता फार कमी असते.म्हणून अशा जमिनिमधे सुरुवातीला सोयाबीन पिवळे पडते. त्यामुळे अशा जमिनित 1) सोयाबीन ची वाढ खुरटी होते व पाने पुर्ण पणे पिवळे पडते2) झाडाची वाढ मंदावते व पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात3) सर्व पाने हरीतद्रव्यरहित राहुन करपल्या सारखी दिसतात

हे लक्षात घ्या - सोयाबीन पिवळे पडण्यामाघे पानामधे संपुर्ण फेरस (लोह) खताची कमतरता असते.चुन खडियुक्त शेतामधुन पिकाला फेरस ( लोहाची) उप्लब्धता होत नसल्या मुळे पानामधे लोहाची कमतरता दिसते. अनेक शेतकरी या पिवळ्या सोयाबीनला *यल्लो मोझँक व्हायरस असे संबोधतात.आणि कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारण्या घेउन खर्च वाढवतात.आपण हे समजुन घेतले पाहिजे की पिकाच्या पानामधे हरीतद्रव्य निर्मित होण्यासाठी पिकांमधे एन्झाइम, प्रथिने तयार होण्यासाठी फेरस,झिंक , मग्निज, मँग्नेशियम, नायट्रोजन या 5 अन्नद्रव्याचा वापर आवश्यक असतो.

शेतकरी बांधवांनो चुनखडीयुक्त जमिनीमधून सोयाबीनला अन्नद्रव्अन्नद्रव्याची उपलब्धता होत नसतेअशा वेळी विद्राव्य खताच्या पानावर फवारणी घेऊन अन्नद्रव्याची गरज भागून घ्यावी म्हणजे खताचे फवारे घ्यावे.शा जमिनिमधे 5 ते 6 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घ्याव्यातच त्यामुळे सोयाबीनचा फुटवा चागल होऊन वाढ चागली होते. पिवळे पडलेल्या सोयाबीन साठी खालील प्रमाणे फवारे घ्यावे15 ली पाण्या साठी 1) मायक्रो झी एस - 80 ml 2) HEDP फेरस - 25 g m 3) मँग्नेशियम सल्फेट - 70 gm4) एजिफास्ट 30 ml पिवळी पडलेल्या सोयाबीन साठि सुरुवातीच्या वढीच्या काळात पेरणी नंतर 10 व्या दिवशी पहिली फवारणी व 15 ते 16 व्या दिवशी दुसरी फवारणी घ्यावी 

चुन खडियुक्त शेतामधुन पिकाला फेरस ( लोहाची) उप्लब्धता होत नसल्या मुळे पानामधे लोहाची कमतरता दिसते.अनेक शेतकरी या पिवळ्या सोयाबीनला *यल्लो मोझँक व्हायरस असे संबोधतात.आणि कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारण्या घेउन खर्च वाढवतात.आपण हे समजुन घेतले पाहिजे की पिकाच्या पानामधे हरीतद्रव्य निर्मित होण्यासाठी पिकांमधे एन्झाइम, प्रथिने तयार होण्यासाठी फेरस, झिंक , मँग्निज, मँग्नेशियम, नायट्रोजन या 5 अन्नद्रव्याचा वापर आवश्यक असतो.शेतकरी बांधवांनो चुनखडीयुक्त जमिनीमधून सोयाबीनला अन्नद्रव्अन्नद्रव्याची उपलब्धता होत नसते

 

अधिक माहितीसाठी

योगेश लाड - 9545080207

English Summary: See what causes yellowing of soybeans 10 to 25 days after germination Published on: 30 June 2022, 11:40 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters