तीन वर्षां पुर्वी शेती हे नावच सोशल मिडीया वरती वाचायला मिळत नव्हते, कारण आमच्या पोरांना शेती व माती बद्दल बोलायला लाज वाटत होती. मग आपली पोर काय करायची, तर नट - नट्या चे फोटो, शेरो शायरी किंवा एखाद्या पुढाऱ्यांचा उदोउदो हिच कालच्या युवा शेतकऱ्यांची फुकटची पाटिलकी होती. परंतु आता काळ बदललाय, पण कधी नव्हे एवढी जागरुकता आमच्या पोरांत आली. आता हजारो पेजेस झळकु लागलेत.
शेती आणि माती शिवाय पर्याय नाही याबद्दल आता बोलु लागली. आज बोलताहेत, उद्या रस्त्यावर येतील आणि परवा एक क्रांती घडवतील. यात शंकाचं नाही.
मिञानो लक्षात ठेवा :
भविष्यकाळ शेतकऱ्यांचाचं आहे. परंतु गरज आहे स्वतःला बदलत्या काळा बरोबर चालण्याची
स्वतःला बदलण्याची, अत्याधुनिक जगाबरोबर, तंत्रज्ञानाबरोबर शेतीत क्रांती करण्याची आणि काळाची पावले ओळखण्याची.
पन्नास एकरचे मालक आज दोन एकर वरती आलेत. उद्या एक एकर वरती येतील. खाणारी पोटं वाढली तसा जमिनी चा आकार घटतचं चाललाय. येत्या काळात लोक तुमच्या घरी धान्य मागायला घरोघर फिरतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही राजे असालं. हि कोणतीही कल्पना नाही तर येणाऱ्या नवीन जगाचे, पिढीचे वास्तव आहे.
आपण फक्त एकच करायचं :
शेती मातीच विज्ञान व व्यापारी मनोवृती आत्मसात करायचीये.
आपल्या समोर खरे अाव्हान असणार आहे ते म्हणजे : शिल्लक जमिन वाचविण्याची व स्वतःची मानसिकता बदलण्याची. जुनाट रुढी परंपरा मोडा, अधिकाधिक विज्ञानवादी बना. अंधश्रध्दा, भेदभाव, जातीयता, न्युनगंड,लाज, चिंता, देवभोळेपणा सोडा. धुमधडाक्यातील लग्न, हुंड्या सारखी कुप्रथा आहे. त्यात समाधानी मातीत मिळविणारे गावकारण व गाव-राजकारण, भावबंदकी चे खुणी डाव याला तिलांजली द्या आणि फक्त शेती हाच कर्म धर्म अंगीकारा. बघा काय बदल घडतो ते लक्षात ठेवा, आपण शेती वर आई सारखे प्रेम केले तर आई सारखीच माया मिळेल. शेतीला ओझं समजालं तर काळा च्या ओझ्याखाली दबुन जाल.
एकमेकांच्या हातात हात घालुन चाला, एकमेकांना अनुभवाची अमूल्य शिदोरी वाटत चला. जग तुमचेच आहे. आपल्या मुलांना शेतीत जरुर आणा परंतु अगोदर त्याला ,
शेतीच परिपूर्ण शिक्षण द्या.
स्वत: मार्गदर्शक बना.
आपले जुनाट विचार त्याच्या वर लादु नकाच.
माझ्या वयोवृध्द माता पित्यानो, आपण आपल्या पोरांनवरती विश्वास ठेवा.
त्यांना कामाचे नियोजन करु द्या.
कारण क्रांती नविन रक्तच करु शकते.
बुढा शेर कभी शिकार नहीं करता सिर्फ अपना रौब जमाता है.पुन्हा एकदा सांगतो, भविष्यकाळ शेती व मातीचा आहे, मातीत राबणाऱ्या बळीराजा चाच आहे.
विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)
शेतकरी हितार्थ
Share your comments