1. कृषीपीडिया

हे वाचल तर तुम्ही शेतीत रासायनिक खतांचा वापर करणार नाही, भयावह परिस्थिती!

एका हाताने आपण आपल्या शेतीसाठी रासायनिक खते औषधे आणतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हे वाचल तर तुम्ही शेतीत रासायनिक खतांचा वापर करणार नाही, भयावह परिस्थिती!

हे वाचल तर तुम्ही शेतीत रासायनिक खतांचा वापर करणार नाही, भयावह परिस्थिती!

एका हाताने आपण आपल्या शेतीसाठी रासायनिक खते औषधे आणतो. आणि त्याचा वापर करतो काहीच दिवसात दुसऱ्या हाताला काम लागते की मेडिकल मधून आपल्या साठी औषधे आणावी लागते. हे खूप वाईट परिस्थिती आहे. एकतर शेतीसाठी पैसा खर्च करा वरून आपल्या आरोग्यासाठी पण पैसे खर्च करा. आपण जे काय आपल्या आरोग्य बिघडवतो ते आपल्या हातानेच.

 सगळे शेतकरी सधन आहेत आणि ते आपापल्या शेतात राबत असतात. दुसर्‍याच्या शेतात कामाला जाणार्‍या बायका तिथे ङ्गारशा आढळतच नाहीत. मग ही कसर भरून काढण्यासाठी बिहारमधले मजूर पंजाबमध्ये कामाला जातात. तेही मिळाले नाहीत तर पिकांमध्ये आलेले तण काढणार कोण, असा प्रश्‍न निर्माण होतो. तशी स्थिती आल्यास विषारी तणनाशकांचा मारा करून तण नाहीसे केले जाते.

या विषारी तणनाशकाचे अंश गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये उतरलेले असतात. तो गहू खाणार्‍याच्या रक्तात सुद्धा ते उतरतात. त्यामुळे रोपाड जिल्ह्यात काही तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तामध्ये या तणनाशकाचे अंश सापडले आहेत. आपण आपले रक्त या दृष्टीने तपासत नाही म्हणून ठीक आहे. परंतु आपण तसे ते तपासायला लागलो तर त्या तपासणीचे निष्कर्ष धक्कादायक ठरणार आहेत. पंजाब मधल्याच संगरूर या जिल्ह्यामध्ये जमीनधारणा ङ्गार कमी आहे. तिथे दहा एकराचा शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी असा मानला जातो. सर्वच शेतकरी लहान असल्यामुळे तिथे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे पीक घेतले जाते. या कापसावर मारलेली जंतूनाशके जमिनीत उतरतात. पंजाबमध्ये भूमी अंतर्गत पाण्याची पातळी ङ्गार खोल गेलेली नाही. 

त्यामुळे जमिनीत उतरलेली ही जंतूनाशके पाण्यात मिसळतात. अशा रितीने संगरूर जिल्ह्यातले पाणी सुद्धा विषमय झालेले आहे आणि हे पाणी प्यायल्यामुळे संगरूरच्या लोकांमध्ये कर्करोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.

 केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची शाकीय वाढ होते. रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते.पिकांचा कालावधी वाढतो.

रासायनिक युरिया, सुफला खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.

पालाश, कॅल्शिअम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. 

जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टर सारख्या जिवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.गाडूंळाच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो. त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो     

युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो.पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (१० पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते.पाण्यातील शेवाळ व पाणवनस्पतींची वाढ होते. 

अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात.

त्यामुळे रासायनिक खतांचा भडीमार वापर थांबवा आणि आपल्या शेतीचा खर्चही वाचवा आणि विषमुक्त अन्न खा आयुष्य वाढवा.

आपल्या प्रतिक्रिया कळवा.

संकलन- सौरव गायकवाड

मो -9145050441

English Summary: Read this then after you can don't use of chemical fertilizers in farming dangerous situation Published on: 13 March 2022, 11:25 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters