1. कृषीपीडिया

वाचा बीटी तंत्रज्ञानातील सकारात्मकता

गेल्या अनेक वर्षापासून आपण कापसात बीटी तंत्रज्ञान उपयोगात आणीत आहोत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
वाचा बीटी तंत्रज्ञानातील सकारात्मकता

वाचा बीटी तंत्रज्ञानातील सकारात्मकता

गेल्या अनेक वर्षापासून आपण कापसात बीटी तंत्रज्ञान उपयोगात आणीत आहोत. मृदेतील बेसिलस थुरीनजेन्सीस या जीवाणूमधील गुणसूत्र पिकाच्या रंगसूत्रात टाकल्याने "हे" पिक एक कीटकनाशी प्रथिन पानात तयार करते. पाने खातांना हे प्रथिन कीटकास बाधते व कीडनियंत्रण होते, असे हे तंत्र आहे. पिकात हानिकारक रसायनांची फवारणी न करता कीटक नियंत्रित होत असल्याने हे तंत्र अल्पावधीतच जगभरात लोकप्रिय झाले. भारतीय शेतकऱ्याने देखील याचा चांगलाच अनुभव घेतला आहे.   

बी. टी. जनुक विरहीत कपाशीच्या आश्रीत ओळी न लावल्यामुळे व जादा उत्पादनासाठी कपाशीच्या हंगामाचा कालावधी वाढविल्याने मागील वर्षी गुलाबी बोंडअळीत बी. टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार झाली. मोठ्या प्रमाणात पुन्हा फवारण्या करण्याची गरज निर्माण झाल्याने बीटी तंत्रज्ञानावरील आपला भरवसा कमी झाला. मोठ्या प्रमाणात नकारात्मक भावना निर्माण झाली. 

बी. टी. जनुक विरहीत कपाशीच्या आश्रीत ओळी न लावल्यामुळे व जादा उत्पादनासाठी कपाशीच्या हंगामाचा कालावधी वाढविल्याने मागील वर्षी गुलाबी बोंडअळीत बी. टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार झाली. मोठ्या प्रमाणात पुन्हा फवारण्या करण्याची गरज निर्माण झाल्याने बीटी तंत्रज्ञानावरील आपला भरवसा कमी झाला. मोठ्या प्रमाणात नकारात्मक भावना निर्माण झाली. 

तसे बघितले तर सुरवातीपासून टीकाकारांचा एक वर्ग बीटी तंत्रज्ञानाच्या विरोधात उभा होताच. या तंत्रज्ञानाचे अनाकलनीय धोके आहेत असे ते मानत. दीर्घकाळात मित्र/शिकारी कीटकावर याचे दुष्परिणाम होतील असे त्यांना वाटायचे. त्यांच्या या वैचारिक थाटनितून त्यांनी बीटी तंत्रज्ञानाचा दुराग्रही व आक्रमक विरोध केला. माझ्या दृष्टिकोनातून या बूनबुडाच्या विरोधकांनी शेतकऱ्याचे एका प्रकारे अपरिमित नुकसान केले. त्यांच्या आक्रमकतेमुळे इतर पिकातील बीटी तंत्रज्ञान भारतात येवू शकले नाही. आपण काळाच्या मागे पडलो.     

या तंत्रज्ञाना बद्दल आपल्याकडील चित्र असे धुरकट असले तरी, जगभरातील चित्र मात्र वेगळे व अतिशय आशादायी आहे. प्रत्येक शेतकरी बांधवाने हे जाणून घ्यायला हवे.

अलीकडील काळात, गेल्या वीस वर्षाच्या अनुभवातून "जर्नल ऑफ बायोलॉजिकल कंट्रोल" या वैज्ञानिक प्रकाशनात या तंत्रज्ञानाची व्यापक समीक्षा करण्यात आली. बीटी पिके आता जगभरातील एक अब्ज एकरापेक्षा अधिक क्षेत्रात घेतली जात आहेत. दुराग्रही टीकाकारांनी व्यक्त केलेला कुठलाही धोका काही अंशीदेखील खरा ठरलेला नाही. उलटपक्षी नवीन निष्कर्ष असा आहे की "जेव्हा कीटकांच्या नियंत्रणासाठी बीटी पिके "रासायनिक कीटकनाशकांची" जागा घेतात तेव्हा मित्र/शिकारी कीटकांच्या संरक्षणासाठी पर्यावरणाला मदत होते." संशोधकांना असे आढळून आले आहे कि.ज्या भागात बिटी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्या भागात नॉन-बीटी पिकास देखील फायदा होतो. बीटी पिके "लक्ष्य आणि लक्ष्य नसलेल्या कीटकांचे अधिक प्रभावी जैविक नियंत्रण" प्रदान करतात आणि कीटकनाशकांच्या वापराची गरज कमी करतात.

"कीटक-प्रतिरोधक बीटी प्रजाती उत्पन्न वाढविण्यास आणि शेतकर्यांना आर्थिक लाभ प्रदान करण्यास मदत करतातच शिवाय पर्यावरणीय आणि मानवी आरोग्यामध्येही सुधारणा होते.

सध्या जगाच्या पाठीवर, कमी अधिक प्रमाणात, बीटी तंत्रज्ञान प्रामुख्याने मका, कापूस आणि सोयाबीन मध्ये वापरले जाते आहे. अमेरिकेत आणि आशियामध्ये हे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जात असले तरी युरोप आणि आफ्रिकेमध्ये उपयोग कमी आहे..

आपल्या शेजारील बांग्लादेशाची कथा तर जगावेगळी आहे. पाच वर्षापूर्वी बांगलादेशातील मुठभर शेतकऱ्यांना बीटी-वांग्याचे बियाणे देण्यात आले होते. कीटकनाशकात मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याने या बियाण्याची लोकप्रियता अफाट वाढली. सध्या तेथिल २७००० शेतकरी या बीटी बियाण्याचा वापर करीत आहेत! हि एक अत्यंत आशादाई व पथदर्शी बाब आहे.माझ्या मते बीटी तंत्रज्ञान "एक दुधारी तलवार" आहे. तिची धार अतिशय तीक्ष्ण आहे. योग्य पद्धतीने वापरली तर कापूस पिका सोबतच मका, सोयाबीन व वांग्यात देखील या तंत्राचा उपयोग करता येईल. पण पुन्हा व्यवस्थापनात चुका केल्या, क्षणिक नफ्याच्या मोहात पडले किवां दुराग्रहि टीकाकारांना किंमत दिली तर आपण पिढ्यानपिढ्या "फवारणी-मागून-फवारणी" च्या पाढ्यात असेच अडकून राहू. 

बीटी तंत्रज्ञानात सकारात्मकता आहे पण त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्याला स्वत:मधील सकारात्मकची जोड द्यावी लागेल.

English Summary: Read this BT cotton technology good news Published on: 29 April 2022, 08:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters