1. कृषीपीडिया

हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर वाचा या टीप्स

प्रामुख्याने अधिक उत्पादन देणार्‍या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर वाचा या टीप्स

हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर वाचा या टीप्स

प्रामुख्याने अधिक उत्पादन देणार्‍या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर, योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर, पाणी आणि पीकसंरक्षणाचे योग्य नियोजन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, वेळीच आंतरमशागत या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टीने हरभरा पीक लागवड सुधारीत पद्धतीने करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा

वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.If used, this crop gives good yield even in dryland areas. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या पिकांसाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणार्‍या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन

लम्पी चर्म रोगाचे लक्षणे दिसताच पशुधनावर उपचार केल्यास रोग लवकर बरे होण्यास मदत

अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात.पेरणीची वेळ : जिरायत हरभर्‍याची पेर जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १० ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणार्‍या पावसाचा जिरायत हरभर्‍याच्या उगवण

आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभर्‍याच्या पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभर्‍याच्या पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे.

पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रती हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.बीजप्रक्रिया आणि जिवाणूसंवर्धन : बियाणाची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम+२ ग्रॅम कार्बेन्डेंझीम एकत्र करून प्रति किलो बियाणांस चोळावे. यानंतर १० किलो बियाण्यास रायोबियम जीवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या

थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभर्‍याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ते ५ टक्के उत्पादन वाढते.बियाणे प्रमाण : हरभर्‍याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाणाचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता ६५ ते ७०

किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्‍या दाण्यांच्या वाणाकरीता १०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी.के.व्ही. ४ या जास्त टपोर्‍या काबुली वाणांकरीता १२५-१३० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. ९० सें.मी. रुंदीच्या सर्‍या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफशावर पेरणी केली असता रुजावा चांगला होतो.

खते : सुधारीत हरभर्‍याचे नवे वाण खत आणि पाणी यात चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रति हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी.) अधिक ५०

किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे. पीक फुलोर्‍यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

English Summary: Read these tips if you want to get the maximum yield from your gram crop Published on: 30 September 2022, 06:24 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters