1. कृषीपीडिया

आत्ताच वाचा ज्यांची सोयाबीन पेरणी राहीली असेल त्यांनी हि घ्या काळजी

खरीप हंगाम सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. ते पेरताना काळजी घेतल्यास नुकसान होणार नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आत्ताच वाचा ज्यांची सोयाबीन पेरणी राहीली असेल त्यांनी हि घ्या काळजी

आत्ताच वाचा ज्यांची सोयाबीन पेरणी राहीली असेल त्यांनी हि घ्या काळजी

खरीप हंगाम सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. ते पेरताना काळजी घेतल्यास नुकसान होणार नाही. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्केपर्यंत खाली आल्यावर साठवण करावी. ज्या ठिकाणी सोयाबीनची साठवण करावयाची आहे ती जागा ओलसर नसावी. साठवलेल्या बियाण्यावर कोणत्याही प्रकारचा दाब पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पोत्याची साठवण पार उंचीपर्यंत न करता जास्तीत जास्त पाच पोत्यांची थप्पी मारावी. मळणी केलेले बियाणे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये साठवणूक करू नये.

पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण - क्षमता चाचणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले बियाणेची चाळणी करुन त्यामधील काडी कचरा, खडे, लहान, खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. कागद घेऊन त्या लाचार घडया पाडाव्यात यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवुन त्याची गुंडाळी करावी. अशा रितीने १०० बियांच्या १० गुंडाळया पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात.

जर ती संख्या ५० असेल तर उगवण क्षमता ५० टक्के आहे, असे समजले जाते. जर ती संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पद्धतीने उगवण क्षमतेचाअंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चांगली म्हणजेच ७० ते ५ टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रे नुसार प्रती हेक्टरी ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी असल्यास त्याचे प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीकरीता वापरावे.रायाझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन असे बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. ७५ ते १०० मी. मी पाऊस झाल्यानंतरच सोयाबिनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ से.मी. खोलीपर्यंत करावी.

पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बिजप्रक्रीया करावी. प्रती हेक्टरी सोयाबिन दर ७० किलोवरुन ५० ते ५५ किलोवर आणणेसाठी खालील प्रमाणे बिज प्रक्रिया करावी. सोयाबिन ,या पिकाची बिज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे... झेलोरा ,व्हिटाएक्स पावर, एवरगोल्ड, बाविस्टीन ,रोको, या पैकी एक बुरशीनाशक तसेच ज्या शेतात वाळवी, हुमनी ,खोडअळी , व काही प्रमाणात किड असतात त्या साठी कुझरfs350,स्लेरप्रो,गाऊचो या पैकी एक किटकनाशकाची बुरशीनाशकाच्या सुरवातीस बिजप्रक्रिया करावी. सोयाबिन बियाणे टोकन पध्दतीने किंवा प्लँटरच्या सहाय्याने रुंद वरंबा पध्दत बी.बी.एफ ने पेरणी करावी. 100 मिली पाऊस झाल्या नंतर ओल 6इंच खाली गेल्यावर चिखलाची गोळी करूण पाहावी 2ते 3 इंचा हून खाली पेरणी करू नये जर केली तर उगवण ची समस्या होते उगवण कमी होते.

English Summary: Read now. Those who have soybean sowing should take care Published on: 28 June 2022, 08:20 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters