पीक उत्पादनात पाणी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगाम या बाबींवर अवलंबून आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे ? पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या किती पाळ्या व प्रत्येक पाळीस किती पाणी द्यावे ? पाणी कसे द्यावे ? या सर्व गोष्टींचा समावेश होतो. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती जसे कि ठिबक सिंचन , तुषार सिंचन यांचा प्राधान्याने वापर व्हावयास पाहिजे.
पाण्याचे नियोजन: –
पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवशयक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असते. भारी जमिनीमध्ये उपलब्ध पाणी धारणा शक्ती ही हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते. या उलट जमिनीत पाणी मुरण्याचा वेग हा हलक्या जमिनीपेक्षा कमी असतो. तसेच भारी जमिनीची खोली ही हलक्या जमिनीपेक्षा तुलनेने जास्त असते त्यामळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमतासुद्धा भारी जमिनीत जास्त असते. त्यामुळे भारी जमिनीत पाणी देण्याच्या दोन पाळ्यातील अंतर हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते.
पिकाची पाण्याची गरज तेथील हवामानावर म्हणजे आर्द्रता, बाष्पीभवनाचा वेग, तापमान, पाऊस इत्यादी बाबींवर अवलंबून असते. बाष्पीभवन पात्रातून दररोज जेवढे पाणी बाष्पाच्या स्वरूपात उडून जाईल तेवढेच पाणी अथवा थोडे कमी पाणी पिकाच्या व जमिनीच्या माध्यमातून उडून जाते असे गृहित धरले जाते. तसेच जमिनीतील ओलाव्याच्या प्रमाणानुसार पाण्याची मात्रा ठरविली जाते. जमिनीतील उपलब्ध ओलाव्याच्या ५० टक्के पाणी उडून गेल्यावर पाणी दिले जाते. पावसाळ्यात १५ ते २० दिवसांनी, हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी व उन्हाळ्यात ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे.
पीक वाढीच्या अवस्था व पाण्याची गरज :
कुठल्याही पिकाची पाण्याची गरज त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एक सारखी नसते. धान्य पिकाच्या बाबतीत पिकाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजेच उगवणीच्या वेळेस पाण्याची गरज कमी असते. पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज जास्तीत जास्त असते. तर पीक पक्व होण्याच्या पाण्याची गरज पुन्हा कमी होते. एकंदरीत पिकास त्याच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. उदा. गव्हामध्ये मुगुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य त्या पिक पद्धतीची निवड करावी. पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचा एकमेकांना पूरक होऊल अशा तऱ्हेने वापर करावा. पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे.
पीक वाढीच्या अवस्था व पाण्याची गरज :
कुठल्याही पिकाची पाण्याची गरज त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एक सारखी नसते. धान्य पिकाच्या बाबतीत पिकाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजेच उगवणीच्या वेळेस पाण्याची गरज कमी असते. पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज जास्तीत जास्त असते. तर पीक पक्व होण्याच्या पाण्याची गरज पुन्हा कमी होते. एकंदरीत पिकास त्याच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते. उदा. गव्हामध्ये मुगुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामातील किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच योग्य त्या पिक पद्धतीची निवड करावी. पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचा एकमेकांना पूरक होऊल अशा तऱ्हेने वापर करावा. पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. उपलब्ध पाण्याच्या जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने सिंचन पद्धत निवडणे फार महत्त्वाचे आहे. सिंचन पद्धत जर योग्य नसेल तर जास्त दिलेले पाणी पिकाच्या मुलाच्या खाली झिरपून वाय तर जातेच तसेच पिकाला दिलेली अन्नद्रव्ये, रासायनिक खतेसुद्धा पाण्याबरोबर झिरपून जमिनीमध्ये मुलाच्याखाली जातात आणि या अन्नद्रव्याचा पिकाच्या वाढीसाठी काहीच उपयोग होत नाही. उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षमरित्या उपयोग होण्यासाठी शेतात येणाऱ्या प्रवाहाची योग्य अशी वितरण व जमिनीचे सपाटीकरण हे फार महत्त्वाचे आहे.
पाणी देण्याच्या मोकाट पद्धतीमध्ये एकूण पाण्याच्या २० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी उपयोग पिकास होतो. बाकीचे पाणी वाया जाते, झिरपते किंवा बाष्पीभवन होते. तसेच पाणी सर्वत्र सारखे मिळत नाही जमिनीला हलकासा उतार असल्यास उताराच्या बाजूने पेरणी झाल्यावर सारा यंत्राच्या सहाय्याने सारे तयार करावे. जमिनीच्या प्रकारानुसार साऱ्याची योग्य ती लांबी, रुंदी ठेवावी, गहू, ज्वारी, भुईमूग, चारापिके व कडधान्य पिकांना साऱ्याची पद्धत ही योग्य आहे. जमिनीला उंच सखलपणा असेल व उतार एकसारखा नसेल तर वाफे पद्धत वापरावी. वाफे साधारणत: १० मीटर बाय ४.५ मीटर आकाराचे असावेत. गाडी वाफे पद्धत ही रोपे तयार करण्यास उपयुक्त आहे. आले पद्धत ही फळझाडे, भोपळा, कारली, दोडका, काकडी यासारख्या वेलवर्गीय भाज्यांना उपयुक्त आहे. सारी वरंबा पद्धत ही ऊस कपाशी, कांदा, वांगी तसेच इतर नगदी पिकांसाठी वापरतात.
सध्या पावसाच प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी आहे व पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होतो. त्यामुळे तुषार व ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धती वापरणे गरजेचे आहे. तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होऊन २० ते २५ टक्के उत्पादनात झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच रात्रीसुद्धा भिजवण करता येणे शक्य झाले आहे. या पद्धतीत पाट, बांध ह्यांची गरज नसल्याने जमीन वाया जात नाही, खते व किटकनाशके काही प्रमाणात फवारण्यांतून देता येतात. ही पद्धत भुईमूग, सोयाबीन सूर्यफूल, गहू, कापूस, मका इत्यादींसाठी उपयुक्त आहे.
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये २५ ते ६० टक्के पाण्याची बचत होते व ३० टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते. जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर त्याचा अवलंब करता येतो. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.
पिकाची उत्पादकता व गुणवत्तेत वाढ –
पिकास वारंवार गरजेनुसार पाणी दिल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात नेहमी ओलावा राहत असल्याने पिकास पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. यामुळे पिकाची जलद व जोमाने वाढ होते, पर्यायाने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. तसेच पिकाच्या उत्पादनाची परत सुधारते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळून आर्थिक फायदा होतो.
Share your comments