पी.एस.बी हे एक जैविक खत असून ते जमिनीतील अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करून पिकास त्यांची उपलब्धता वाढवते.सामान्यतः खताद्वारे दिलेल्या स्फुरदामधील १० ते १५ % स्फुरद पिकास उपलब्ध होतो व राहिलेला ८५ ते ९० % स्फुरद जमिनीत अनुपलब्ध स्वरूपात जातात. अविद्राव्य स्फुरद विद्राव्य म्हणजेच पिकास उपलब्ध करून देण्यासाठी पी.एस.बी. चा वापर फायदेशीर ठरते.हे ऑरगॅनिक ऍसिडस् तयार करते जसे कि, लॅक्टिक, सुक्सिनिक, सायट्रिक, फ्युमॅरिक, ग्लुकोनिक व असेटिक ऍसिडस् जे स्फुरदाचे चिलेशन करते तसेच मातीचा सामू कमी करून पिकाची उपलब्धता वाढविते.
पी.एस.बी अमिनो ऍसिड, जीवनसत्वे, पीक वाढ वृद्धीकारके तयार करते, जसे कि आय.ए.ए., जी.ए. जे पिकांच्या वाढीस मदत करतात.पी.एस.बी जवळजवळ ५० टक्के खतांची बचत करते.हे पिकांच्या मुळाजवळील उपकारक सूक्ष्मजीवांना हानीकारक नाही.पी.एस.बी इतर जैविक खतांसोबत वापरण्यास योग्य आहे.वापरासाठी प्रमाण : १-२ ली.प्रति एकर बेणे,कंद,बिया लागणीपूर्वी ४ ते ५ मिली प्रति लिटर प्रमाणात पी.एस.बी घेवून ५ ते १० मिनिटे भिजत ठेवल्यानंतर लागण करावी.
सामान्यतः खताद्वारे दिलेल्या स्फुरदामधील १० ते १५ % स्फुरद पिकास उपलब्ध होतो व राहिलेला ८५ ते ९० % स्फुरद जमिनीत अनुपलब्ध स्वरूपात जातात. अविद्राव्य स्फुरद विद्राव्य म्हणजेच पिकास उपलब्ध करून देण्यासाठी पी.एस.बी. चा वापर फायदेशीर ठरते.हे ऑरगॅनिक ऍसिडस् तयार करते जसे कि, लॅक्टिक, सुक्सिनिक, सायट्रिक, फ्युमॅरिक, ग्लुकोनिक व असेटिक ऍसिडस् जे स्फुरदाचे चिलेशन करते तसेच मातीचा सामू कमी करून पिकाची उपलब्धता वाढविते.
पी.एस.बी अमिनो ऍसिड, जीवनसत्वे, पीक वाढ वृद्धीकारके तयार करते, जसे कि आय.ए.ए., जी.ए.जे पिकांच्या वाढीस मदत करतात.पी.एस.बी जवळजवळ ५० टक्के खतांची बचत करते.हे पिकांच्या मुळाजवळील उपकारक सूक्ष्मजीवांना हानीकारक नाही.पी.एस.बी इतर जैविक खतांसोबत वापरण्यास योग्य आहे.वापरासाठी प्रमाण : १-२ ली.प्रति एकर बेणे,कंद,बिया लागणीपूर्वी ४ ते ५ मिली प्रति लिटर प्रमाणात पी.एस.बी घेवून ५ ते १० मिनिटे भिजत ठेवल्यानंतर लागण करावी.
Share your comments