या एन्झाईम्स ला क्रियाशील करण्याचे कार्य पालाश करते. प्रकाश संश्लेषण क्रियेत एटीपी तयार होण्यासाठी गरजेच्या क्रियेला कार्यान्वित करण्यासाठी पालाश ची गरज भासते.
पानांवरिल पर्णरंध्रांच्या गार्ड सेल मधे पालाश शिरुन त्यात पाणी भरुन घेते ज्यामुळे पर्णरंध्र उघडतात. जास्त प्रमाणात तापमान असल्यास अशा उघडलेल्या पर्णरंध्रातुन जास्त प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होवुन पिकास पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याची कमतरता असेल त्यावेळेस गार्ड सेल मधिल पालाश बाहेर टाकले जाते ज्यामुळे गार्ड सेल मधिल पाणी देखिल बाहेर जाते, व पर्णरंध्र बंद होते. ज्यावेळेस पिकांस पालाशचा पुरवठा कमी असतो त्यावेळेस हि क्रिया मंदावते किंवा बंद पडते ज्यामुळे पिक पाण्याचा ताण सहन करु शकत नाहीं.
पानांनी तयार केलेले अन्न हे पिकाच्या इतर भागात वाहुन नेण्याचे काम पालाश करते. पालाश ची कमी असल्यास हे अन्न पानात साठवले जाते व ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो.
नायट्रोजन, फॉस्फोरस, कॅल्शियम, मॅग्रेशियम आणि अॅमिनो ऑसिडस च्या रस वाहीन्यातील वहनासाठी पालाश गरजेचे अन्नद्रव्य आहे. पिकात स्टार्च तयार होण्यासाठी पालाश ची गरज भासते, पालाश ची कमतरता असल्यास पाण्यात विरघळणारी कर्बोदके (कार्बोहायड्रेटस) आणि नत्र युक्त पदार्थांची निर्मिती वाढते. पिकाच्या वाढीसाठी पालाश ची गरज ही सर्वश्रुत आहे. जमिनीत भरपुर प्रमाणत पालाश (पोटॅश K) असतो, हे अनेक शेतकरी देखिल आता जाणतात. जमिनीच्या ०.२ से.मी. ईतक्याच पृष्ठभागावरिल थरात साधारणतः 1200 ते 3000 किलो पालाश प्रती हेक्टर क्षेत्रात असतो. ह्या भरसाठ पालाश चा साठा असणाऱ्या जमिनीत मात्र हा पालाश पुर्णपणे पिकास वापरता येईल अशा परिस्थितीत नसते. जमिनीत असलेल्या एकुण पालाश पैकी ९८ टक्के पालाश हा पिकास उपलब्ध होणार नाही अशा मिनरल्स (soil minerals) च्या स्वरुपात असतो. ह्या मिनरल्स मघे फेल्डस्पर, मायका, म्युस्कावाईट, बायोटाईट,ऑर्थोक्लेस, ईलिट, व्हर्मिक्लुलाईट, स्मेसटाईट (Feldspar, mica, muscovite, biotite, orthoclase, illite, vermiculite, semctite) यांचा समावेश होतो. जमिनीत असलेल्या एकूण पालाश पैकी केवळ २ टक्के पालाश हा जमिनीतील पाण्यात विरघळलेला किंवा पिकास उपलब्ध होईल अशा स्वरुपात मुक्त असतो. जमिनीत असलेला मुक्त स्वरुपातील पालाश पिक शोषुन घेत असते.
मायका ह्या मिनरल मधे जमिनीतील सर्वाधिक प्रमाणात पालाश असतो, पिकाच्या गरजे ईतका पालाश ह्या मायका मधुन नैसर्गिक रित्या मिळत नसल्याने पिकास, जमिनीत भरपुर पालाश असुन देखील तो वरुन रासायनिक किंवा ईतर स्रोतांतुन कृत्रिम रित्या पुरवावा लागतो. जमिनीत असलेल्या सिलिका च्या मिनरल्स सोबत प्रामुख्याने पालाश स्थिर स्वरुपात असतो. जमिनीतील विविध मिनरल्स मध्ये असलेला पालाश प्रवाहीत करण्याचे काम पालाश प्रवाहित करणारे जीवाणू करतात.
हा पालाश ची उपलब्धता जीवाणू, बुरशी तसेच एक्टिनोमायसिटस मुळे होते हे तेव्हा कळाले, जेव्हा भात पिकात शास्त्रज्ञांनी सिलिका विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर केला. हा वापर केल्यानंतर भात पिकास सिलिका तर मिळतच होते मात्र त्याच वेळेस पालाश ची देखिल उपलब्धता वाढत होती. शिवाय केळी पिकात देखील मुळांच्या परिसरात एकाच प्रकारचा उपयुक्त जीवाणू वाढतो आहे आणि त्यामुळे पालाश उपलब्धता वाढते आहे हे देखील लक्षात आल्यानतंर पालाश प्रवाहित करणाऱ्या विविध जीवाणूंचा अभ्यास केला गेला त्यात बँसिलस स्पे., बॅसिलस म्युसिलेंजीनोसस, बेसिलस मेगाथेरियम, बँसिलस ग्लोबीस्पोरस, बॅसिलस ईडॅफिकस
मायक्रोबॅक्टेरियम स्पे., बसिलस कोअॅग्युलन्स, फ्रॅट्युरिया ऑरिन्टिया, सुडोमोनास पुटिडा, अॅनीबॅसिलस ग्लुकॅनोलाटिकस अशा व इतर जीवाणूंचा समावेश केला गेला. ह्या सारखे अजुन देखिल अनेक असे जीवाणू आहेत ज्यांचा या अभ्यासात समावेश केला गेला आहे.
Share your comments