बियाणे प्रमाण पेरणीसाठी एकरी २६ किलो बियाणे वापरावे. एकरी झाडांची संख्या १.७६ ते १.८० लाख ठेवावी. घरचे बियाणे असेल व बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यानुसार बियाण्याचे प्रमाण वाढवावे. बीजप्रक्रिया सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांसाठी रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोगांचे व्यवस्थापन चांगले होते.
पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) + थायरम (३७.५% डीएस) ३ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया केल्यास कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. अलीकडील काही वर्षांत सुरुवातीच्या अवस्थेत काही भागांत खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. म्हणून वरील बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम (३०% एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
या बीजप्रक्रियेमुळे खोडमाशीसोबतच रसशोषक किडींच्या नियंत्रणासही मदत होते. या प्रक्रियेनंतर ब्रेडी रायझोबिअम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे अशी प्रक्रिया करावी. बियाणे प्रक्रियेनंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी.
बिपरजॉय चक्रीवादळाचा जोर वाढला! मुंबई, रायगडसह 'या' किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा
ब्रेडी रायझोबिअम या जिवाणू संवर्धनाची पेरणीवेळी बीजप्रक्रिया केल्यास सहजीवी जिवाणूंच्या गाठींची संख्या वाढते. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात. हे नत्र पिकास उपलब्ध होते. स्फुरद विरघळविणारे जिवाणू ‘स्फुरद’ हे अन्नद्रव्य पिकास वाढीच्या काळात उपलब्ध करून देतात.
तूरडाळीचे भाव पुन्हा वाढले! शेतकऱ्यांना अच्छे दिन...
हिवाळी पीक काढल्यावर लगेच उन्हाळी नांगरट करावी २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी. हेक्टरी २५ ते ३० गाड्या कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी.
अखेर राज्यात पावसाला सुरुवात, 'या’ ठिकाणी आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी…
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
जगातील सर्वात लहान गाय 'पुंगनूर' हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर..
Share your comments