शेतकरी शेतीच्या बांधावर अनेक झाडे (tree) लावून उत्पन्न घेत असतात. मात्र पावसाळ्यात शेतीच्या बांधावर कोणती झाडे लावली पाहिजेत, ज्यातून चांगले उत्पादन शेतकरी घेऊ शकतील. या झाडाविषयी सविस्तर माहिती घेऊया.
आवळ्याचे झाड (Amla tree) लावल्यानंतर ४-५ वर्षांत फळे मिळण्यास सुरूवात होते. ८-९ वर्षांनी एक झाड दरवर्षी सरासरी १ क्विंटल फळ देते. ते १५-२० रुपये किलो दराने विकले जाते, म्हणजेच दरवर्षी एका झाडापासून शेतकर्याला १५०० ते २००० रुपये मिळतात. आवळ्याची झाडे तब्बल ५५-६० वर्षे फळ देतात.
हे ही वाचा
Modern Agriculture: आधुनिक शेतीतून 'हे' गाव करतय लाखोंची कमाई; जाणून घ्या सविस्तर
आवळा (amla) ही औषधी गुणधर्मांची खाण असल्याचे म्हटले जाते. यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात जे तुम्हाला निरोगी ठेवतात. यामुळे आवळ्याला बाजारात चांगली मागणी असते. अशा परिस्थितीत लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
आवळ्याची लागवड (Cultivation of Amla) जुलै ते सप्टेंबर दरम्यान केली जाते. पावसाळ्यात आवळ्याची लागवड (Cultivation)अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्याची रोप ४-५ वर्षात फळ देण्यास सुरुवात करते. ८-९ वर्षांनी एक झाड दरवर्षी सरासरी १ क्विंटल फळ देते. बाजारात एक किलो करवंदे २० रुपयांना विकली जातात.
हे ही वाचा
Cultivation Of Vegetables: कमी मेहनत जास्त उत्पन्न; 'या' भाजेपाल्याची कधीही करा लागवड
एका झाडापासून शेतकर्याला (farmers) दरवर्षी १५०० ते २००० रुपये मिळू शकतात. एका हेक्टर मध्ये २०० पेक्षा जास्त झाडे लावली तर वर्षाला ३ ते ४ लाख रुपये कमावता येतात. उन्हाळ्यात दर ७-८ दिवसांनी आणि हिवाळ्यात १२-१५ दिवसांनी पाणी द्यावे लागते. यामुळे फारशी मेहनत न घेता आवळ्यापासून शेतकरी चांगले पैसे कमवू शकतो.
महत्वाच्या बातम्या
Insurance Policy: फक्त 20 रुपयांमध्ये मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत विमा; जाणून घ्या प्रोसेस
Insecticide: शेतकरी मित्रांनो घरीच बनवा नैसर्गिक किटकनाशक; पैशांची होईल मोठी बचत
Cultivation Of Plants: होय खरंय! फळापासून पानापर्यंत मिळणार भरघोस कमाई; करा 'या' वनस्पतीची लागवड
Share your comments