तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे (rain) अनेक पिकांचे नुकसान होत आहे. विविध पिकांवरील किडीचे प्रमाण वाढत आहे. हल्ला करत असणाऱ्या अशा किडीचे व्यवस्थापन (Pest management) कसे करायचे? याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
पिकांवरील किडीचे करा असे व्यवस्थापन
१) सोयाबीन
पिकात रसशोषण (absorption) करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन संशोधनालय (Soybean Research) इंदौर यांच्या शिफारसीनूसार थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारा.
सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा
2) ऊस
पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क (Soybean Research) किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करा.
रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करणे उत्तम ठरेल.
3) खरीप ज्वारी
जर खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम (Thiamithoxam) 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन (Lambda Cyhalothrene) 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटूनब जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करा.
4) हळद
पिवळी पडत असल्यास पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर 2% यूरियाची फवारणी करावी. हळद पिकात पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर बायोमिक्सची आळवणी करा.
आळवणीसाठी 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो (पावडर)/ 4 लिटर (लिक्वीड) बायोमिक्स (biomix) याप्रमाणे द्रावण तयार करा व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडा किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करा.
महत्वाच्या बातम्या;
Animal Husbandry: जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे? तर वेळीच लक्षणे ओळखून करा उपचार
Castor Farming: एरंडेल शेतीतून लाखोंची कमाई घेण्यासाठी 'या' खास पद्धतीचा अवलंब करा; जाणून घ्या
Diabetes Solution: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी गुळवेलसह या पानांचा वापर करा; होईल फायदा
Share your comments