1. कृषीपीडिया

येळगाव धरणाचे दरवाजे अचानक खुलल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांच्या सोयाबीन सुड्या पुराच्या पाण्यात, नुकसान भरपाई द्या; स्वाभिमानीची मागणी

बुलढाणा भागात दि१८आॅक्टोबर रोजी जोरदार पाऊस झाला.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
येळगाव धरणाचे दरवाजे अचानक खुलल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांच्या सोयाबीन सुड्या पुराच्या पाण्यात, नुकसान भरपाई द्या; स्वाभिमानीची मागणी

येळगाव धरणाचे दरवाजे अचानक खुलल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांच्या सोयाबीन सुड्या पुराच्या पाण्यात, नुकसान भरपाई द्या; स्वाभिमानीची मागणी

बुलढाणा भागात दि१८आॅक्टोबर रोजी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येळगाव धरणाचे स्वयंचलीत गेट अचानक खुले झाल्याने पैनगंगा नदिकाठच्या काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे,व शेतातील सुड्यामधे पुराचे पाणी गेल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.परिणामी पैनगंगा नदिकाठचे शेतकरी चिंतेत आहेत.यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला.त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर सततच्या पावसाचा फटका बसला.या दोन्ही संकटातून

थोडेफार पीक हाती येणार होते त्यातून काही प्रमाणात पेरणीचा,मशागतीचा खर्च निघेल अशी आशा होती.It was hoped that the cost of cultivation would be cleared. परंतु,ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा तालुक्यातील सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे.

एक सत्य घटना कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल, स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपति जाॅन डी राॅकफेलर

आणि त्यातच बुलढाणा येथील येळगाव धरणाचे स्वयंचलीत गेट अचानकपणे खुले झाल्याने पैनगंगा नदिला पुर आल्याने ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून अनेकांनी सुड्या(गंजी) शेतात लावून ठेवल्या होत्या त्या शेतक-यांच्या सुड्यांमधे पुराचे पाणी गेले अनेकांची उभ्या पिकात पुराचे पाणी असल्याने

सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.यामूळे हाता-तोंडाशी आलेला घास गेला आहे.दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी वाडी,ब्रम्हपुरी व सवणा शिवारातील शेतक-यांच्या शेतामधे जाऊन पाहणी केली तर शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तर वारंवार गेट खुले ठेवण्याचे सांगुनही ते खुले ठेवले नसल्याने व सांडवा तयार करण्याच्या मागणीची दखल घेतली नसल्यानेच शेतात पाणी घुसले असल्याचे सांगत या नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याने पंचनाम्यांचा फार्स न घालता नदिकाठावरील सर्व शेतकरी यांना नुकसान

प्रशासन जबाबदार असल्याने पंचनाम्यांचा फार्स न घालता नदिकाठावरील सर्व शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,येळगाव धरणातील ८०गेट पैकी पाच गेट काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.तर प्रशासनाने शेतक-यांच्या संयमाचा अंत पाहु नये,असा सज्जड इशारा सरनाईक यांनी सबंधीत विभागाच्या अधिका-यांना दिला आहे.यावेळी सतिष सुरडकर,राहुल पवार,आकाश बाहेकर,दत्ता कुदळे,रणजीत ठाकुर,निलय देशमुख,विशाल वानखेडे,अमोल वानखेडे,शुभम वानखेडे,अंबादास वानखेडे,सचिन वानखेडे,स्वप्निल वानखेडे,रामदास वानखेडे,निलेश वानखेडे,दिलीप परिहार,सुनील वानखेडे,यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

English Summary: Pay compensation for the sudden opening of the gates of the Yelgaon Dam, the soybeans of the farmers along the Panganga River were washed away by the flood waters; A demand for self-respect Published on: 22 October 2022, 06:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters