1. कृषीपीडिया

आता सेंद्रिय शेती हीच काळाची गरज आहे, अन्यथा अनेक संकटांना सामोरे जावे लागेल

भविष्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती ही खरेच काळाची गरज असणार आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आता सेंद्रिय शेती हीच काळाची गरज आहे, अन्यथा अनेक संकटांना सामोरे जावे लागेल

आता सेंद्रिय शेती हीच काळाची गरज आहे, अन्यथा अनेक संकटांना सामोरे जावे लागेल

आपल्याला या गोष्टीचा विचार करावाच लागेल.आपल्या पुर्वजांनी जी शेती केली रसायनांचा न वापरता तशी आता आपण शेती करत आहोत का?हा मोठा प्रश्न आहे.आपल्याला धुंदी पिकांची या निसर्गाने दिलेल्या शरीराची नाही!पण त्या मधे काही महाभाग शेतकरी उदाहरण देतात श्रीलंका या देशाचं कि सेंद्रिय शेती मुळे वाटोळं झालं.आपल्या जवळ हे बोलण्या शिवाय काहीच नाही.आपल्या देशात५० ते६० वर्षांपूर्वी कोणतेही रासायनिक खते, कोणतेही विषारी कीटकनाशक नव्हतेच.आपली शेती त्या वेळी शेती ही पूर्ण शेणखतावर व पिकामधून शेतामध्ये बाकी राहीलेल्या अवशेष यावर होती नैसर्गिक कुजण्याची प्रक्रिया केली जायची ते लोक खुप ज्ञानी होते व विचारी होते त्यांनी नाही गांडूळ खत तयार केली ना कोणते कंपोस्ट युनिट तयार केले. म्हणून तेव्हा जी शेती मधुन धान्य,भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची.

ते अन्न मानवीय शरीराला व जनावरांना खाल्ल्यानंतरआवश्यक घटक मिळायचे.शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची म्हणून त्या वेळी मानव शंभर शंभर वर्षे जगत होती पण आता उतरती कळा लागली व मानवाचे जीवन आयुष्यमान शंभर नाही तर साठ ते सत्तर वर आले आहे. हे दुष्परिणाम कशाचे आहेत हे आता सांगायचे जरुरी नाही कारण आपण विचार केलाच नाही.यामुळे आज मानवाला वेगवेगळ्या रोगाची लागण झाली आहे.आता कारणं ही थोडं समजून घेऊ आपल्या रोजच्या आहारामधुन शरीराला ज्या घटकांची गरज आहे ते घटकच मिळेनासे झाले आहे.यामुळे काय झाले की रसायन युक्त अन्न, पाणी, हवा या मधुन होणार्या आजारांस सामोरे जावे लागत आहे.जर बालपणापासून हे विष मुलांच्या शरीरात गेले तर कशी निरोगी घडेल पुढची पिढी? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.हेच रसायन बाळंतपण असणार्या आईच्या दुधात सुद्धा हे किटकनाशकाचे अंश आढळलेले आहे.हे माझे बोल नाही तर WHO या संस्थेच्या माहीतीचा आधारे मि सांगत आहे.

मित्रांनो आपण जर रसायनांचा वापर कमी कमी करून जैविक म्हणा किंवा सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे! पण आपन जर एकाच दमाने सेंद्रिय शेती कडे वळतो तर आपल्या साठी घातक आहे व शेती मधल्या माती साठी सुद्धा घातकच म्हणावें लागेल. कमी खर्चात शेती कशी होईल व उत्पादनात वाढ कशी होईल याचा विचार करायला हवा!आज आपल्या शेतीचा खर्च खूप होतो. पण त्यामानाने आपल्याला उत्पादन मिळतच नाही. जर मिळालेच तर भावच मिळत नाही.अशी अवस्था आपली आहे. त्याच प्रमाने आपण जर जैविक शेती केली तर शेतीला लागणार खर्चपण कमी होईल.आपली मातीपण चांगली राहील, उत्पादनात सुद्धा वाढ दिसेल व सकस व पौष्टिक अन्न आपल्याला खायला मिळेल महत्वाचं म्हणजे बाजारात चांगल्या दराने विकता सुद्धा येईल. शेतमालाला चव व गुणवत्ता चांगली असल्यामुळे भावसुद्धा चांगला मिळेल. आता हेच पहा आपन रसायनांचा वापर करू तर दुष्परिणाम दिसणारच आहे. आपण आपल्या शेतात रसायनांचा वापर करतो यामुळे काय होते की सर्वात आधी माती वर परीनाम होउन नापीक होते. आपल्या मातीतील पोषक घटक कमी होतात.मातीतील जीवाणू व मित्र बुरशी नष्ट होतात व माती क्षारपड,कडक,नापीक होण्याच्या मार्गावर जाते.

तीच रसायन पाण्यात मिक्स होतात व परीनाम निसर्गाच्या चक्रात अडथळे निर्माण होतात म्हणून समजून घ्यावे.माझ्या मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे कि कोणतेही नविन तंत्रज्ञान अभ्यासपुर्वक वापरले तर त्याचे फायदे व तोटे पाहुन नियोजन करता येईल.आपल्याला वाटत असेल तर पुढच्या पिढिने आनंदाने शेतिकडे वळावे तर त्यांना शास्त्रीय व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देने आवश्यक आहे. जे सोयिस्कर व सुटसुटित असेल माझ्या बांधवांनो बंद करा त्या माय माऊली विष पाजणे व पिकांना विष घालणं ,अत्याचार करनं जिनं हजारो वर्ष पिढ्यान् पिढ्या आपलं पालन पोषन केले तिला आपन आज मारत आहोत परीस्थिती अशी की ति निर्जीव व नापिक होत आहे.तिचे शोषन करून तिला दरिद्री व विषारी करून टाकले,तिला काहीतरी सुपिक तेच अमृत द्या , तिला कर्बाची संजीवनी द्या! ती पुन्हा मरनाच्या दारातून बाहेर येईल पण आधी तिची झीज भरून काढायची तयारी ठेवावी लागेल. बस झाले आता त्या माती माय माऊलीची विषारी रसायनांनी ओटी भरनं , आपल्या मातीची शेतामध्ये शेणखत व काळी कचरा कुजवून भरा तीला शांत करन्याचा मार्ग शोधावा मि या लेखा द्वारे शास्त्रीय माहित समोर ठेवण्याचे कार्य केले आहे.

 

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil

information

Save the soil all together

Milindgode111@gmail.com

9423361185

English Summary: Organic farming is the need of the hour, otherwise many crises will have to be faced Published on: 25 May 2022, 03:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters