1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांना वरदान जैविक शेती च माध्यम !

उत्पादनासाठी शेतीला पर्याय नाही! उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शेतीमध्ये दिवसेंदिवस अनेक बदल झाले आहेत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांना वरदान जैविक शेती च माध्यम !

शेतकऱ्यांना वरदान जैविक शेती च माध्यम !

उत्पादनासाठी शेतीला पर्याय नाही! उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शेतीमध्ये दिवसेंदिवस अनेक बदल झाले आहेत त्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेसी समन्वय साधून शेतीच्या विकासाची वाटचाल साधंल्या जाऊ लागली. कालांतराने पारंपरिक पीक पद्धतीत बदल होऊन शेतीतील तंत्रज्ञान व नवीन नवीन यांत्रिकी धोरण व योजना अमलात आणण्याची सुरुवात झाली. मागील काळात अन्नधान्याचा तुटवडा सोडवण्यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीत बदल करून, उत्पादन वाढीच्या दृष्टीने हरितक्रांतीचा उदोउदो केला.

   मात्र रासायनिक खताचे व कीटकनाशकांचे शेतीवरील दुष्परिणाम पाहून केंद्र शासनाने जैविक शेती ला प्राधान्य दिले गेल्या चाळीस वर्षापासून उत्पादन वाढविण्याच्या शर्यती तून

 रासायनिक खत व कीटकनाशकांचा अती वापर जमिनीत वाढला, आणि पिकासाठी लागतअसणारे, गांडूळ व इतर मित्र किडी संपण्याच्या मार्गावर लागली. वडिलोपार्जित मंडळीने साठवून ठेवलेल्या जमिनीचे पोत व पाण्याचा साठा कमी होत गेला. जमिनीचे पोत घसरून जमिनी कडक होत गेल्या .विषयुक्त धान्य तयार होऊन शरीरात गेल्यामुळे त्याचे परिणाम मानवी शरीरावर होत गेले .जर संपूर्ण देशात विषमुक्त अन्नधान्य तयार झाले तर नागरिक शारीरिक दृष्ट्या सुद्धा मजबूत होइल. 

भाजीपाला फळबाग तसेच शहरातील परसबागे साठी जैविक औषधी ची आवश्यकता भासू लागली . जमिनीची निष्क्रियता पाहून पुढील मुलाबाळांच्या भविष्यासाठी पुन्हा जमिनी सुपीक करणे शेतकऱ्यांना गरजेचे झाले, तसेच उत्पादन वाढीच्या स्पर्धेत शेती निष्क्रिय होऊ नये , ही समस्या वाढत गेली ?जमिनीतील सामू( PH)जर वाढत गेला तर नापिकी होवून पिक उत्पादनाच्या समस्या, अतिशय गंभीर बनतील? उदा. मागील दशकात नाशिक जिल्ह्यातील चांदवड क्षेत्राच्या इतर परिसरात पेरू व डाळींबाचे उत्पादन भरघोस घेतल्या जात होते. रासायनिक खताचा व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे तेथील जमिनी निष्क्रिय होऊन, कालांतराने उत्पादन घटले व जमिनी पडीत पडने सुरू झाले . पेरू व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्त्रोत घसरल्यामुळे, शेतात बांधलेले फार्म हाऊस सुद्धा विना रंगरंगोटीचे ओस पडले. रात्रीतून होणारे शेतीचे सौदे, आता पडीत पडलेल्या जमिनी कोणी विकत घ्यायला तयार होत नव्हते. भयानक वैफल्य ग्रस्त परिस्थितीत तेथील शेतकरी गुरफटला गेला. 

अशी परिस्थिती उद्भवू नये. यासाठी केंद्र शासनाने जैविक शेतीची कल्पना देशासमोर आणली.जैविक शेतीमुळे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याची क्षमता तयार केली. जैविक औषधी म्हणजे आयुर्वेदिक पालापाचोळा, वनस्पती पासून बनवलेली एन.पी.के., सेंद्रिय खते, व जंतुनाशके होय. रा. खताच्या ऐवजी जैविक द्रवरूप (नत्र, स्फुरद व पालाश) सुद्धा बाजारात आलेले आहे. युरिया व इतर रासायनिक खते यांची आता जमिनीत टाकण्याची गरज भासणार नाही. फवारणी तूनच कीटकनाशका सोबत NPK दिले जातात. त्यामुळे रासायनिक खताचे पोते वाहून नेण्याचा व शेतावर फेकण्याचा खर्च कमी होतो. जैविक शेतीवर आधारित कृषी विद्यापीठाने अनेक ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून जागृती केली. शेतकऱ्यांवर प्रापंचिक जबाबदाऱ्या जास्त वाढत गेल्या. शेतीतून उत्पन्न झाले नाही तर,तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला वर्षभर सोसावे लागतात. म्हणून रासायनिक खतांची शेती सोडून, जैविक शेतीकडे काही तरुण शेतकरी पुढे येण्यास अजूनतरी हिंमत करीत नाही.मात्र काही बेरोजगार युवक जैविक शेतीच्या प्रयत्नात दिसून येतात, परंतु त्यातील परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्यांची सुद्धा भटकंती सुरूच आहे .

जैविक शेतीचा विषय परिपूर्ण समजून घेणाऱ्या कृषी पुत्रांचा चांगला गट तयार झाल्यास, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दुरुस्त व्हायला वेळ लागणार नाही. आज बाजारात अतिशय उच्च दर्जाची जागतिक कंपनीची जैविक द्रवरूप NPK खते उपलब्ध झालेली आहेत. औषधी चे गुणधर्म प्रयोगशाळेत तपासणी करून बाजारात विक्री करिता आलेली आहे. ज्याप्रमाणे आपण राहण्यासाठी नवीन घरात जातो , तेव्हा घर स्वच्छ रंग रंगरंगोटी करून पदार्पण करतो . त्याचप्रकारे जमिनीतील शत्रूकिडीचा नायनाट करून, जमीन स्वच्छ केल्यास उत्पादन वाढीसाठी मदत होते. जैविक औषधे ड्रिप इरिगेशन मार्फत जमीनित सुद्धा सोडल्या जातात, किंवा साध्या पंपाने पावसाळ्यात ओलसर जमिनीवर जैविक खते फवारतात, त्यामुळे जमीनी भुसभुशीत होते. व गांडुळांची संख्या वाढली तरच जमीन विषमुक्त होऊन पोत सुधारण्यास मदत होते. कंपोस्ट खत, सोनखत ,शेणखत ,कोंबडी खताच्या उपयुक्ततेमुळे व जैविक औषधे मुळे उत्पादनात भरपूर वाढ होते.जैविक औषधीच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज व संभ्रम पसरविल्या जात आहे. काही भागावर जैविक औषधीचा प्रयोग केल्यास उत्पादन वाढीसाठी विश्वास वाढेल, व शेतीला लागणाऱ्या खर्चात सुद्धा कपात होईल. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता , आत्महत्याचे प्रमाणसुद्धा कमी होईल व शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीची सुरुवात दिसेल. परंतु त्यासाठी अजूनही काही काळ वाट पहावीच लागेल. तेव्हां जैविक शेतीचा उपक्रम हा नक्कीच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल.

 

Save the soil all together

mission agriculture soil information

मिलिंद जि गोदे ९४२३३६११८५

English Summary: Organic farming is a boon to farmers! Published on: 17 April 2022, 02:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters