कांदा पीकासाठी हंगामातच नव्हे तर हंगामानंतरही त्यानुरूप चांगले हवामान असावे लागते.ह्या वर्षीच्या जुन महिन्याच्या दुसऱ्या दहा दिवसातील बिन पावसाळी ढगाळ वातावरण नकळत चाळीत साठवलेला गावठी कांद्याला टिकवणीसाठी संजीवनीच देऊन गेला आहे. असे माझे मत आहे. एकूण साठवण आयुष्यात कमीत कमी १५-२० दिवसाचे सध्या तरी अधिक आयुष्य वाढवून गेले आहे. कदाचित थोडे अधिकही समजावे.नाशिक जिल्ह्यात बहुतांशी भागात गेल्या १५ दिवसापासून असे साठवलेल्या कांद्यासाठी अनुकूल वातावरण असुन अजुनही पुढे दहा-एक दिवसाचे असेच वातावरण राहू शकते अन ते साठवणआयुष्य वाढी साठी मदतच करेल .
असे वाटते.१ जुलै नंतर काय ते नंतर बोलू.सध्या जुन महिन्यातील पावसाळी आर्द्रतायुक्त गार वारा व हवेतील ओलावा कांदा चाळीवर आदळला नाही. ढगाळ वातावरणाचा अभाव, अन त्यामुळे दिवसाचे सूर्यकिरणांचे अधिक तास , ह्यामुळे दिवसाचे कमाल तापमानाची ऊबदारता टिकण्यास मदत झाली, ते (कमाल तापमान ) सरासरी पेक्षा १-२ डिग्रीने अधिकच राहिले. कोरड्या हवामानमुळे हवेची घनताही कमी राहिली. दवांकही कमी झाला. गारवा व दमटपणा नाही, त्यामुळे चाळीत मालाला कोंब नाही, कमकुवत अपरिपक्व कांद्याला पाणी सुटणे नाही, वाऱ्यामुळे सड घाबरवणीचा उग्र वास नाही.ह्या सर्वामुळे कांद्याच्या सडघाणीला सुरवात न होता कांदा घटीची टक्केवारीही कमी ठेवली आहे. हे सर्व ह्या वर्षीच्या उन्हाळ कांदा हंगामाचे जमेचा पहेलू समजावा.
ह्या वर्षीच्या जुन महिन्याच्या दुसऱ्या दहा दिवसातील बिन पावसाळी ढगाळ वातावरण नकळत चाळीत साठवलेला गावठी कांद्याला टिकवणीसाठी संजीवनीच देऊन गेला आहे. असे माझे मत आहे. एकूण साठवण आयुष्यात कमीत कमी १५-२० दिवसाचे सध्या तरी अधिक आयुष्य वाढवून गेले आहे. कदाचित थोडे अधिकही समजावे.नाशिक जिल्ह्यात बहुतांशी भागात गेल्या १५ दिवसापासून असे साठवलेल्या कांद्यासाठी अनुकूल वातावरण असुन अजुनही पुढे दहा-एक दिवसाचे असेच वातावरण राहू शकते अन ते साठवणआयुष्य वाढी साठी मदतच करेल . असे वाटते.१ जुलै नंतर काय ते नंतर बोलू.
पाऊस नाही पेरणीस उशीर होत आहे हे जरी असले तरी कांदा साठवणी साठी ती इष्टापतत्तीच समजावी व त्याचा फायदा करून घ्यावा. कांदा विक्रीसाठी बाहेर काढतांना ' टप्प्या - टप्प्याने ' ही आवाहनाची उक्ती सार्थ करावी.त्यातून स्वतःबरोबर इतर सहकारी शेतकरी बांधवाचाही आर्थिक फायदा होवु शकतो. उगीचच कांदा खराब होत आहे अशी चुकीची अफवाही पसरवू नये.कट्ट्यावरची अर्धवट अफवा ऐकून वस्तुस्थिती न पाहताच दुसऱ्या कट्ट्यावर अफवा ओकून नये.ह्या सहज वाचळतेचे गंभीर परिणाम होतात.ते थांबवा, कारण आपल्याला ह्या वर्षीचा शेतकरी म्हणून पीक-उत्तर हंगाम जिंकायचाच आहे.
माणिकराव खुळे, वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
Share your comments