1. कृषीपीडिया

Onion Fertilizer Mangement: कांद्याच्या अधिक उत्पादनासाठी करा अशा पद्धतीने खतव्यवस्थापन

कांदापीक हे संवेदनशील पीक असून कांद्याला योग्य वेळी खते देणे फार आवश्यक आहे. मताचा विचार केला तर ते दोन ते तीन टप्प्यात विभागून दिले असतात्याचा चांगला फायदा होतो.तसेच कांद्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.या लेखात आपण कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी शिफारशीत खत व्यवस्थापन पाहणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion crop

onion crop

कांदापीक हे संवेदनशील पीक असून कांद्याला योग्य वेळी खते देणे फार आवश्यक आहे. मताचा विचार केला तर ते दोन ते तीन टप्प्यात विभागून दिले असतात्याचा चांगला फायदा होतो.तसेच कांद्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.या लेखात आपण कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी शिफारशीत खत व्यवस्थापन पाहणारआहोत.

कांदा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन..

  • कांदा पिकाची मुळे जास्त खोलवर नसतात.त्यामुळे त्यांना योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे.कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते.
  • यामध्ये जर आपण रब्बी  कांद्याचा विचार केला तर नत्राचा पुरवठा हा 100 किलो, स्फुरद 50 किलो आणि पालाश 50 किलोप्रति हेक्‍टरी द्यावे. नत्राच्या 100 दिलो मात्रे पैकी अर्धे नत्र म्हणजेच 50 किलो,पूर्ण स्फुरदआणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.उरलेले 50 किलो नत्र कांदा पुनर्लागवडीनंतर एक अथवा सव्वा महिन्यांनी द्यावे.
  • नत्र विभागून देण्याचा फायदा असा होतो की कांदा पूर्ण पोसल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते. अशावेळी जनता चा पुरवठा केला तर कायद्यांमध्ये विकृती येते.जसे की जोड खांदे येणे,चाळीत  कांदा साठवल्या नंतर सडण्याचे प्रमाण वाढणे तसेच कांदे डेंगळे होणे इत्यादी प्रकार आढळतात.
  • स्फूरदाचा व्यवस्थित पुरवठा केला तर मुळांची वाढ चांगली होते.
  • पालाश हे कांदा पिकासाठी फार महत्त्वाचे आहे कारण पालाशच्या योग्य पुरवठा यामुळे कांद्याचा टिकाऊपणा वाढतो तसेच कांद्याला आकर्षक रंग देखील येतो.
  • रब्बी हंगामातील कांदा लागवडी अगोदर पंधरा दिवस आधी गंधक हेक्‍टरी 45 किलो या प्रमाणात द्यावे.
  • कांदा पिकाला जर शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसांनंतर जर नत्राचा पुरवठा केला तर कांद्याची पात नको त्या प्रमाणात वाढते व तिची मान जाड होते.तसेच जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते व साठवण क्षमता कमी होते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा

1-कांदा पिकाला मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे देखील गरज भासते. या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पैकी जर कांदा पिकाला तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासली तर रोपांची वाढ खुंटते.तसेच कांदा पातीचा रंग करडा व निळसर होतो.

2- जस्ताची कमतरता जर कांदा पिकाला भासली तर पात जाड होऊन खालच्या अंगाने वाकते. कांदा पिकामध्ये अशी लक्षणे दिसायला लागताच ताबडतोब शिफारशीत खताच्या मात्रा सोबत झिंक सल्फेट एक ग्राम, मॅग्नीज सल्फेट एक ग्रॅम, फेरस सल्फेट अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी  याप्रमाणे फवारणी करावी.

3- कांदाची पुनर्लागवड केल्यानंतर 15, तीस आणि 45 दिवसांनी 19:19:19 या विद्राव्य खताची पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाणीयाप्रमाणे फवारणी करावी.तसेच पुनर्लागवड केल्यापासून साठ, 75 आणि 90 दिवसांनी 13:00:45( पोटॅशियम नायट्रेट)पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.त्यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते व उत्पादनात वाढ होते

English Summary: onion fertilizer management for more production of oninon crop Published on: 23 December 2021, 01:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters