1. कृषीपीडिया

कशी करावी सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांद्याची लागवड? जाणून घेऊ

KJ Maharashtra
KJ Maharashtra
onion cultivation

onion cultivation

 कांदा हे पीक आता नगदी पीक म्हणून पुढे आले आहे. जर कांद्याचे व्यवस्थापन हे योग्य तंत्रज्ञानासह केले तर त्याचे भरपूर उत्पादन शेतकरी काढू शकतात. कांदा उत्पादनात बऱ्याचशा गोष्टी व त्यांची योग्य नियोजन हे कांदा उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.  खत व्यवस्थापन, लागवड व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन असो की  कांद्याला असलेली सिंचनाच्या सुविधा त्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. या लेखात आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून कांद्याची लागवड कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत.

 कांदा हे पीक आता नगदी पीक म्हणून पुढे आले आहे. जर कांद्याचे व्यवस्थापन हे योग्य तंत्रज्ञानासह केले तर त्याचे भरपूर उत्पादन शेतकरी काढू शकतात. कांदा उत्पादनात बऱ्याचशा गोष्टी व त्यांची योग्य नियोजन हे कांदा उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.  खत व्यवस्थापन, लागवड व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन असो की  कांद्याला असलेली सिंचनाच्या सुविधा त्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. या लेखात आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून कांद्याची लागवड कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत.

 आपल्याला माहिती आहेच की कांदा पिकासाठी सिंचनाचा वापर करताना सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर हा फायदेशीर ठरतो.  या पद्धतीमुळे पिकास मुलांच्या कक्षेमध्ये आवश्यक तितका पाण्याचा पुरवठा करता येतो. मुळांजवळ वाफसा स्थिती असल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कांदा लागवड ही पारंपारिक पद्धतीने केली जाते. जास्तीत जास्तसपाट वाफा आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्यावर जास्त भर असतो. सिंचनासाठी पाटपाणी पद्धतीचा अवलंब केला जातो.

 परंतु शेतकऱ्यांनी या पारंपरिक पद्धतीऐवजी जर गादीवाफ्यावर कांद्याची लागवड केली तर  निश्चितच उत्पादन वाढीच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे. गादी वाफे तयार करताना त्यांची उंची 10 ते 12 इंच आणि रुंदी 3 फूट असावी. गादी वाफे तयार करताना रासायनिक खतांची मात्रा ही शिफारशीप्रमाणे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये चांगली मिसळून टाकावे. त्यामुळे पिकाची वाढ संतुलित होण्यास मदत होते. कांदा पिकाच्या सिंचनाचा विचार करताना तो ठिबक किंवा तुषार सिंचन यापैकी एका पद्धतीचा अवलंब करावा. या दोन्ही पद्धतीत पाण्याची व्यवस्थित बचत करता येते. या पद्धतीमुळे पिकास आवश्यक तितकेच आणि विभागून सिंचन करता येते. विभागून विद्राव्य खते दिल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. खतांचा होणारा ऱ्हास टाळता येतो. कोणत्याही पिकांच्या चांगल्या वाढीसाठी मुळांजवळ वापर असा असणे आवश्यक असते. पिका जवळील आद्रतेचे प्रमाणही योग्य राखता येते. अति आद्रतेमुळे येणारे करपा सारखे रोग टाळता येतात.

 कांदा पिकात सूक्ष्म सिंचन पद्धतीचे फायदे

  • या पद्धतीद्वारे पाणी वापरामध्ये 40 ते 50 टक्के बचत होते.
  • जमीन कायम वाफसा स्थितीत राहत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते.
  • सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
  • ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यामुळे 25 टक्के खतांची बचत होते.
  • या पद्धतीमध्ये पाणी, वेळ आणि विजेची बचत होऊन अधिक क्षेत्रावर पिकांचे लागवड शक्य आहे
  • सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीच्या वापरामुळेदव आणि धुके यापासुन कांदा पिकांचे संरक्षण होते. तसेच फुलकिडे यांचा प्रादुर्भाव कमी होतो. या पद्धतीमुळे कांद्याचे उत्तम गुणवत्ता मिळते आणि उत्पादनात वाढ होते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters