ढगाळ वातावरणामुळे आंब्यावरील मोहराला भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे . भुरीमुळे लहान फळांच्या डेठावरही बुरशीची वाढ झालीकी फळे गळतात आणि करपा रोगामुळे मोहर तांबूस होऊन वळतो फुलगळ होते लहान फळावर काळ्या आकाराचे डाग पडून फळांची गळ होते . करपा आणि भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी हेक्झाकोन्याझोल (५%) ५ मिली लिटर किंवा कार्बेन्डाझिम (१२%) अधिक म्यांकोझेब (६३%) बुरशीनाशक १ ग्रॅम .
टीप :
फवारणी मोहर सवरक्षण वेळापत्रकानुसार कीटकनाशकाच्या द्रावनासोबत घेत येईल एकाच बुरशीनाशकाची सलग फवारणी टाळावी अनावश्यक फवारण्या टाळाव्यात मोहर नुकताच फुलत असतांना ते फळधारना होईपर्यंत कीटकनाशकाची फावरणी शक्यतो टाळावी.
फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकावर होणार परिणाम टाळण्यासाठी त्यांचा परागीकरनाचा कालावधी वगळून (सकाळी ९ ते १२) फवारणी करावी .
कीटकनाश्यक किंवा बबुरशीनाशकांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी किमान तापमानात होणाऱ्या घटीमुळे फळे धरलेल्या आंबा झाडाच्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहर येण्याची शक्यता असते.
त्यामुळे अंनाचे वहन नवीन मोहरकडे होते आणि जुन्या मोहराला असलेली वाटाणा किंवा गोटी आकाराच्या फळांची गळ होतांना दिसुन येते हे
टाळण्यासाठी मोहर अवस्तेतील आंबा झाडावर पुनःर मोहर प्रक्रिया टाळण्यासाठी जीबरेलीक ऍसिड ५० पी.पी.एम. ची म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी झाडाला पुरेसा मोहर आला असल्याची खात्री झाल्या नंतरच झाडावरील मोहर पूर्ण उमललेला असतांना करावी नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराचे फळे झाल्यावर करावी .
Share your comments