भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात शेतकऱ्यांसाठी हजारो योजना आहेत. मात्र त्यातील मोजक्याच योजना शेतकऱ्यांकडे पोहोचतात. देशभरातील बहुसंख्य लोक कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत. ऊन, पाऊस, वारा, वादळे अशा नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतकरी पिक घेतो, पिकवतो. कधी त्याला भरघोस उत्पन्न मिळते, तर कधी त्याच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे घराचा खर्च भागविताना अन्नदात्याला मोठी कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत शेतीपूरक व्यवसाय करणे, हे आर्थिक स्थैर्य देणारे ठरते. आज आम्ही अशाच एका शेतीपूरक व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.
मधुमक्षिका पालन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय,मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता.मधुमक्षिका पालनासाठी तुम्हाला सरकारकडून अगदी 85 टक्क्यापर्यंत अनुदानही मिळू शकते.औषधांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अनेक ठिकाणी मधाचा वापर केला जातो. अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून मधमाशी पालनाला सुरुवात केली. यातून त्यांना केवळ पैसाच मिळत नाही, तर सरकार अनेक प्रकारे मदतही करते.
मधमाशी पालनामध्ये कृषी आणि बागायती उत्पादन वाढवण्याची क्षमतादेखील आहे. मधमाशीपालन आणि मध प्रक्रिया युनिट उभारून प्रक्रिया प्रकल्पाच्या मदतीने मधमाशीपालनाच्या बाजारपेठेत यश मिळू शकते.तुम्ही किमान 10 पेट्या घेऊन मधुमक्षिका पालनाला सुरुवात करू शकता. जर प्रत्येक बॉक्समधून 40 किलो मध मिळाले तर 10 बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रतिकिलो 350 रुपये दराने 400 किलो मध विक्री केल्यास 1 लाख 40 हजार रुपये कमाई होते. प्रत्येक बॉक्सचा खर्च 3500 हजार रुपये येतो. याप्रमाणे 10 बॉक्सचा एकूण खर्च 35 हजार रुपये होतो.
म्हणजे यातून तुम्हाला 1,05,000 रुपये फायदा होतो.मधमाशांच्या संख्येत वाढ होईल तसा हा व्यवसाय तीन पटीने वाढतो. वातावरण आणि इतर घटक पोषक असतील तर तुम्ही वर्षभरात 25 ते 30 पेट्यांच्या माध्यमातून मधाचे उत्पादन घेऊ शकता.मधमाशी पालनाचे अर्थशास्त्र त्याच्या दर्जावर अवलंबून असते. प्रत्येक डब्यातून प्राप्त होणारे 50 किलो कच्चा मध 100 रुपये प्रति किलोच्या दराने विकला जातो.म्हणजेच प्रत्येक डब्यामागे तुम्हाला 5 हजार रुपये मिळकत होते. मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास प्रति महिना 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. जैविक मध चांगल्या किंमतीत बाजारात विकले जाते. एक किलो सेंद्रिय मधाचा दर 400 ते 700 रुपये आहे.
Share your comments