शेतकरी शेतामध्ये विविध प्रकारची पिके आणि फळबाग लागवड करतात. या लागवडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नफा शेतकऱ्यांना मिळतो.
परंतु असे काही वृक्ष आहेत,ज्यांची लागवड केल्याने दीर्घ कालात पैसे मिळायला सुरुवात होते परंतु मिळणारा नफा हा खूपच खर्चाच्या मानाने जास्त असतो.यामध्ये आपल्याला बांबू लागवड माहिती आहे,सागाची लागवड देखील बरेच शेतकरी करतात.
परंतु बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली हिरवेगार झाडे आपण पाहतो. बऱ्याच लोकांना या झाडांचा उपयोग माहित नसल्याकारणाने अशा झाडांना निरुपयोगी समजले जाते. परंतु अशा वृक्षांच्या लागवडीतून लाखात नफा मिळू शकतो.
आणि यांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या देखभालीसाठी जास्त खर्च आणि मेहनत घ्यावी लागत नाही. राहिला खर्चाचा विषय तर तो देखील एकदम कमीत कमी प्रमाणात लागतो. ना जास्त पावसाचा टेन्शन ना दुष्काळाची चिंता, हवामान कसे असू द्या तरी उत्पन्नही मिळणार आणि अशा वृक्षांची वाढ होतेच.
नक्की वाचा:शेतकरी दादांनो : आंबा लागवडीसाठी या 'टीप्स' वापरा, होईल फायदा अन मिळेल भरघोस उत्पादन
निलगिरी लागवड एक वरदान
आपल्याला सगळ्यांना माहितीये निलगिरीची झाडे अर्थात त्याला सफेदा देखील म्हटले जाते.हि झाडे सरळ वाढतात. जर आपण एका हेक्टरमध्ये निलगिरीची लागवड करायचे ठरवले तर त्याचे तीन हजार रोपे यामध्ये बसतात, असे तज्ञांचे मत आहे.
एका रोपाची किंमत नर्सरी मधून घ्यायचे ठरले तर सात ते आठ रुपयांना सहज मिळते. निलगिरी अर्थात सफेदा हे एका ऑस्ट्रेलियन वंशाचे झाड असून आपल्या भारतात देखील त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून भारतामध्ये मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब आणि आंध्र प्रदेश या सरकार राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
त्याच्या झाडाचे सहसा उंची ही 40 ते 80 मीटर पर्यंत असू शकते. लागवड करताना दोन झाडातील अंतर दीड मीटर ठेवणे आवश्यक असते. निलगिरीच्या झाडाचा वापर हार्डबोर्ड, लगदा, फर्निचर्स, बाप इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. तसेच याच्या लाकडाचा वापर इंधन, बॉक्स, पार्टिकल बोर्ड, फर्निचर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत निलगिरीची अर्थात सफेदा ची झाडे चांगली वाढतात.
नक्की वाचा:खजूर शेती: खजुराचे एक झाड देते 50 हजार रुपयांचे उत्पन्न, होऊ शकता काही वर्षात करोडपती
त्यानंतर ते कापली जाऊ शकतात.त्याच्या एका झाडापासून मिळणाऱ्या लाकडाचा विचार केला तर जवळजवळ चारशे किलो ग्राम लाकूड एक झाड देते.जर आपण याचा बाजारभावाचा विचार केला तर प्रति किलो सहा ते सात रुपये दर निलगिरीच्या लाकडांचा असतो.
अशा परिस्थितीमध्ये जर एका हेक्टर निलगिरी चे लागवड केली तर त्यामध्ये तीन हजार झाडे लावली तर 72 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. असे बरेच शेतकरी असतात की त्यांच्याकडे जास्त जमीन असते आणि बरीच जमीन हे पडीक पडलेली असते. अशा शेतकऱ्यांनी निलगिरी लागवडीचा विचार करण्यास काही हरकत नाही.
Share your comments