तुम्ही पूर्व मशागत चांगली केला बियाणे दर्जेदार वापरला मातीआड डोसेस दिला सर्वआधुनिक पद्धतीने ऊसाची शेती केला परंतु सरीतील अंतर कमी ठेवला असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुद्धा ऊसाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर उत्पादन वाढीसाठी सरीतील अंतर योग्य ठेवणे महत्वाचे आहे.त्यासाठी सरीतील अंतर हे कमीत कमी 4.5/5फूट ठेवले पाहिजे.
पूर्वी आम्ही 2.5फूट/3फूट/3.5फुट अंतरावर ऊस शेती करत असताना उत्पादन वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले.N.P. K. मात्रा जादा देऊन बघितले. रासायनिक खतांच्या खर्चामध्ये वाढ झाले, परंतु उत्पादनामध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे जास्त खते टाकली की उत्पादन वाढते हे गैरसमज दूर झाले.2006/2007साली 4.5फूट सरी वरती पहिल्यांदा एकरी 100टन उत्पादन काढले . त्यानंतर प्रत्येक वर्षी जितके आडसाली ऊसाचे क्षेत्र असेल तेवढ्या
क्षेत्रावरती एकरी 100टन उत्पादन घेत आहे.जसे अनुभव मिळत जाईल, तसे सरीतील अंतर 5फूट/6फूट/7फूटा पर्यंत वाढवून देखील ऊसाचे उत्पादन एकरी 100टनांच्या आत कधी आलेले नाही.आमच्या भागातील शेतकरी पूर्वी 3/3.5फूट सरी वरती पूर्वहंगामी /सुरू ऊसाचे उत्पादन एकरी35/40टन व आडसाली ऊसाचे उत्पादन एकरीं 50/55टन घ्यायचे.
त्यांनी सरीमधील अंतर 4.5/5फूट केल्यानंतर पूर्वहंगामी/ सुरू ऊसाचे उत्पादन एकरीं 60टना पर्यंत व आडसाली ऊसाचे उत्पादन एकरी 70/80 टना पर्यंत मिळू लागले.
आज आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 80टन उत्पादन देखील कमी वाटत आहे. कारण उत्पादन काढण्याची त्यांची क्षमता वाढत चालली आहे. बरेच शेतकरी एकरी 100टना पर्यंत पोहचलेत.क्रमशः
शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999
English Summary: Modern technology is needed for record production of sugarcanePublished on: 18 May 2022, 12:51 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments