नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत वनस्पतीच्या अन्नाचे व्यवस्थापन हे मुख्यत्वे जीवाणुशी संबंधित आहे. जमिनीत होणाऱ्या बहुतेक रासायनिक प्रक्रियेत भाग घेणारी रसायने या सूक्ष्म जीवांच्याकडून उपपदार्थ म्हणून निर्माण झालेली असतात. यामुळे या प्रक्रिया जैव-रसायनशास्त्रीय होतात. पिकांच्या अन्नांश व्यवस्थापनाच्या पाच पायऱ्या आहेत.
१) अन्नांश टाकणे
२)स्थिरीकरण
३) उपलब्धीकरण
४)पोषण
५) अभिसरण
सर्वसाधारण शेतकऱ्यांची समजूत अशी असते की आपण सेंद्रिय अगर रासायनिक स्वरूपात पिकांचे अन्नांश जमिनीत टाकतो. पावसाच्या पाण्यात अगर सिंचनातत्यातील अन्नद्रव्ये विरघळतात व मुळांकडून शोषण केली जातात, ही एक अत्यंत चुकीची कल्पना आहे. वरील पाच पायऱ्यांचा विचार केल्यास खते टाकणे ही पहिली पायरी फक्त शेतकऱ्यांच्या हातात आहे. स्थिरीकरण व उपलब्धीकरण या दोन पुढील पायऱ्या जमिनीतील सूक्ष्म जीवांच्या हातातील आहेत. त्या पुढील शोषण व अभिसरण या पायऱ्या वाढणाऱ्या पिकाच्या हातातील आहेत.
कार्यक्षम अन्नाच्या व्यवस्थापनासाठी या पाचही पायऱ्यांचा सखोल अभ्यास शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. कोणत्या पिकासाठी कोणती ते किती, केव्हा, कशी द्यावयाची या पहिल्या पायरीचा अभ्यासच मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक प्रयोग करून अशा खतमात्रांच्या शिफारशी शेतीखाते व कृषि विद्यापीठाकडून केल्या जातात. परंतु पुढील चार पायऱ्यांचा अभ्यास योग्य दिशेने न झाल्याने आज खतांच्या वापराची कार्यक्षमता अत्यंत कमी आहे. या अकार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते व पर्यावरणाचीही हानी होते.
२) स्थिरीकरण: वनस्पतीचे अन्नांश जमिनीत टाकल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे स्थिरीकरण झालेच पाहिजे व त्या स्थिर साठ्यातून गरजेप्रमाणे पुढे उपलब्धीकरण होते. आपण जी सेंद्रिय खते जमिनीला देतो त्यातील अन्नांशाचे प्रथम योग्य स्थिरीकरण झालेलेच असते, मात्र रासायनिक खताबाबत तसे नसते. त्यातील अन्नांश जसे टाकले असतील त्याप्रमाणे पिके घेऊ शकत नाहीत त्यावर पुढे जमिनीत अनेक प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यातील अन्न घटक पिकांनी शोषण करण्याच्या अवस्थेत येतात. प्रथम योग्य स्थिरीकरण झाले तरच पुढे योग्य उपलब्धीकरणाला बाव शिल्लक राहतो यामुळे स्थिरीकरणाचा सखोल अभ्यास करू या. स्थिरीकरण तीन प्रकारात होऊ शकते.
अनुदानातील तफावतीमुळे शेतकरी संतप्त, चार लाखांचे अनुदान असून मिळतात अडीच लाख
१) कायिक स्थिरीकरण
२) रासायनिक स्थिरीकरण
३) जैविक स्थिरीकरण
कायिक स्थिरीकरणात अन्नांशाचे कण विजातीय विद्युत भारामुळे सेंद्रिय अगर खनिज कणांना चिकटून राहतात याला इंग्रजीत Physical adsorption असे म्हणतात. असे स्थिरीकरण सैल असते. एखाद्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर असे चिकटलेले कण वाहून जाऊ शकतात. रासायनिक स्थिरीकरणात मूळ अन्नांशाची जमिनीतील एखाद्या रसायनाशी रासायनिक प्रक्रिया होऊन नवीनच पदार्थ निर्माण होतो. असा पदार्थ जमिनीत सहज नाश पावू शकत नाही.
त्याचबरोबर पिकाच्या गरजेनुसार स्थिर साठ्यातून सहज उपलब्ध साठ्यात रूपांतरही होऊ शकत नाही. रासायनिक स्थिरीकरण घट्ट असते. असे असले तरी या स्थिरीकरणातील अन्नांश पिकासाठी पुढे केव्हाच उपलब्ध होणार नाहीत असे नाही. हळूहळू त्याचे उपलब्ध अन्नघटकात तर होऊ शकते. जैविक स्थिरीकरणात दिलेली अन्नद्रव्ये प्रथम सूक्ष्मजीव खतात व कालांतराने त्यांची मृत शरीरे हे त्या अन्नद्रव्याचा जमिनीतील स्थिर साठा असतो. या साठ्यातील अन्नद्रव्ये सहजासहजी नाश पावू शकत नाहीत, परंतु वाढणाऱ्या वनस्पतीच्या गरजेप्रमाणे त्वरित स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात रूपांतरित होऊ शकतात.
याप्रमाणे तीनही प्रकारच्या स्थिरीकरणाचा अभ्यास केल्यास जैविक स्थिरीकरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात उपयुक्त स्थिरीकरण आहे. असे स्थिरीकरण केव्हा होते? जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया चालू असता बाहेरून रासायनिक खतांतील अन्नांश दिल्यास त्यांचे जैविक स्थिरीकरण होऊ शकते. सेंद्रिय पदार्थ कुजत असता जिवाणूंच्या नव्या पिढ्या निर्माण होत असतात. कुजण्याच्या क्रियेतून जमिनीतील सेंद्रिय कर्ब तयार होत असतो. आपन अभ्यासल्यास कोणत्याही वनस्पतीचे अन्नद्रव्य प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थातच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असे लिहिलेले आढळते.
'शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, नाहीतर 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा घरावर धडकणार'
हा संदर्भ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सेंद्रिय कर्ब हेच वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचे जमिनीतील कोठार आहे. हे कोठार गरजेइतके मोठे केल्यासच दिलेल्या अन्नद्रव्यांची व्यवस्थित साठवणूक होऊ शकते व पुढे पिकाचे पोषणही. किफायतशीर रासायनिक शेती करावयाची झाल्यास सेंद्रिय कर्बाची जमिनीत सतत निर्मिती होणे गरजेचे आहे.
एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतील एका जंगलाचे पृथ:करण केले व जंगलातील वेगवेगळ्या घटकात असलेला नत्राचा साठा मोजला. त्याला असे आढळले की जंगलात असणाऱ्या एकूण नत्र साठ्यांपैकी ६० टक्के नत्र जंगलातील मृत सेंद्रिय पदार्थात आहे. ८.५ टक्के नत्र जिवंत वनस्पतीत तर फक्त ०.५ टक्के नत्र खनिज कणाबरोबर आहे. आपल्याकडील जमिनीत ०.५ टक्के ही सेंद्रिय पदार्थांची टक्केवारी राखली जात नाही. जो तुटपुंजा सेंद्रिय कर्ब आपण देतो तोही जमिनीबाहेर कुजवून अशा परिस्थितीत कार्यक्षम रासायनिक खतांचे व्यवस्थापन व्हावे कसे? यावर गंभीरपणे चिंतन केल्यास आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे हे लक्षात येईल.
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
9423361185
महत्वाच्या बातम्या;
काटामाऱ्यांनो तुमचे दिवस संपले! उसाच्या वजनातील झोल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
चिंता वाढली! चीनमध्ये धुमाकूळ घातलेला व्हेरिएंट मुंबईत दाखल, पहिल्यांदाच आढळेल 3 रुग्ण
सीबीलमुळे शेतकऱ्याचे कर्ज मंजूर न केल्यास तक्रार कोणाकडे करावी? सरकार आदेशाला बँकांकडून केराची टोपली
Share your comments