1. कृषीपीडिया

लक्षात घ्या जीवाणु हा शेतीचा आत्मा आहे

हे विधान गोंधळ निर्माण करणारे आहे आणि त्या गोंधळामुळेच लाखो शेतकरी जैविक शेतीच्या नावाखाली ढोर मेहनत करत आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
लक्षात घ्या जीवाणु हा शेतीचा आत्मा आहे

लक्षात घ्या जीवाणु हा शेतीचा आत्मा आहे

लगेच मत बनवु नका व तुमच्या मताना छेद गेला म्हणून न चिडता हा पूर्ण लेख वाचा मग जरूर आपला प्रतिसाद नोंदवा.शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब आहे हे मी 2016 च्या एग्रोवन वर्तमान पत्रात वाचले तेव्हापासून त्याचा खोलवर अभ्यास करतोय.जीवाणु तेव्हाच उत्पन्न होतात व वाढतात जेव्हा त्यांना अन्न असते आणि अन्न आहे आर्गेनिक कार्बन किंवा ह्यूमस.

आता हेच पहा ना.तुम्हाला मुंग्या गोळा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल ? त्यांना शोधत बसाल की साखर टाकाल अगदी त्याप्रमाणे जीवानुंचे अन्न वाढवा जमिनीत ते आपोआप येतील

आजपर्यंत जे जीवाणु स्लरीचा प्रचार प्रसार करत आहे. त्यांनी याचा अभ्यास करायला हवा की आपल्या पूर्वजांनी कुठे असला उल्लेख केलेला आहे की एखाद्या शास्त्रज्ञांनी याचे संशोधन केलेले आहे!

लक्षात घ्या.शेतकरी टेंशन मुक्त झाले तरच त्यांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य अयोग्य समजून घेण्याची क्षमता वाढेल. अर्थात विचार सरणी!

गांडुळ व जीवाणु चे शेतीतिल महत्व अनन्य साधारण आहे. पण ते मातिबाहेर तयार करून जमिनीत सोडने म्हणजे टेस्टट्यूब बेबी जन्माला घालणे होय जे शेतकऱ्यांसाठी खुप खर्चाचे व तात्पुरता फायदा तंत्रज्ञान आहे. त्यामुळे शेतकरी औताला जुपलेल्या बैलासारखा सारखा त्यात अडकलेला असतो. मी जैविक शेती करून समाजाचे भले करतोय ही भोळी भाबडी कल्पना करत असतो. मित्रहो आपल्या आजोबा पंजोबानी केव्हा स्लऱ्या केल्या होत्या. खुप पौष्टिक अन्न धान्य पिकवायचे ते. आज तूप लावुन ही भाकरी जेवढी गोड लागत नाही तेवढी शिळी भाकरी लागायची. अलीकडे 1980 मध्ये फ़क्त 29 वर्षापुर्वी. गांवागावात किती आनंद किती समाधान, शेतकरी सर्व सण समारंभ निवांत साजरे करायचे.

त्यावेळी रानावनात चरणाऱ्या देशी जनवारांच्या शेणखतांच्या मदतीने हजारो वर्ष यशस्वी शेती केली.

याचे शास्त्रीय कारण म्हणजे त्या रानावनाच्या मातीचा सेंद्रिय कर्ब 10% च्या पुढे होता आणि तिथल्या चाऱ्यातून जे शेण पडायचे त्यात 5-6% सेंद्रिय कर्ब असायचा पण आजची परिस्थिती पहा एकतर गावठी जनावारे बोटावर मोजावि इतकी आणि त्यांना चारा कोणता तर अश्या मातितला तिथला सेंद्रिय कर्ब 1% च्या खाली आहे सांगा त्यातून तयार होणारे शेणखत कितपत या जिवाणू चे पोषण करू शकणार आहे ? म्हणूनच तर आपल्याला स्लरी करताना गुळ, दाळ टाकावी लागते जिवाणू ना अन्न म्हणून.

अर्थात चुकीच्या ख़त व्यवस्थापनेमुळे जमीन निकस झाली मग अलीकडच्या 30-40 वर्षात काय झाले !? तुम्हाला माहितीचआहे

गरज आहे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याची पण आपण अडकलोय जिवाणू वाढ करण्यामध्ये. मित्रहो जिवाणू संवर्धन खुप क्लिष्ट बाब आहे. जे शास्रज्ञ जिवाणू चा अभ्यास करतात त्यांच्या मते 25000 जातींचे जिवाणू आहेत. त्यातील 200 च्या आसपास ओळख झाली आहे लैब मध्ये नियंत्रित वातावरणात अनेकवेळ नको असलेले जिवाणूची वाढ होते तर शेतकरी शेतात ज्या प्रमाणे जिवाणू वृद्धि करतात ते कितपत सुरक्षित आहे देवजाने. मित्रहो ...

म्हणूनच आम्ही जेव्हा याबाबत अनेक प्रयोग केले त्यावरून असे स्पष्ट झाले की जर गांडूळ जमिनीत वाढले तर जिवाणू ही वेगाने वाढतात.अर्थात आपण जर जामिनीचे सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन सुधारले तर जिवाणू ची वृद्धि आपोआप होते आज आपण अर्धवट माहितीच्या आधारे तात्पुरता उपाय करणाऱ्या संकल्पना शेतीत रुजवल्या आणि शेती भरकटली. मित्रहो जिवाणू बद्दल आत्मविश्वासाने बोलनारे शेतकरी आम्हाला अजूनही नाही भेटले

केमिकल, जैविक व सेंद्रिय यांचेबाबत गोंधळ असलेले शेतकरी आम्हाला रोज भेटतात. त्यांना जर विचारले की, सेंद्रिय शेती व जैविक शेतीतील फरक कोणते ती एकमेकांवर अवलंबून असते की स्वतंत्र ?

यावर त्यांची कोणतीच संकल्पना स्पष्ट झालेली दिसली नाही आणि हो अनेकदा ते एक यशस्वी शेतकरी असतात. पण संभ्रम अवस्था व केवळ ट्रायल वर शेती करण्याची प्रथा रूढ़ आहे हे दुर्दैव म्हणायचे की सुदैव ट्रायल एंड एरर काही काळासाठी ठीक असते पण 25-30 वर्षनाही हे योग्य नाही.

शेतकऱ्यांना आत्मविश्वास देणारे तंत्र हवे अंधारात चाचपड़ने भविष्यसाठी घातक आहे.

 

लेखक - मिलिंद गोजे

English Summary: Understand microbs is important for soil Published on: 29 December 2021, 10:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters