1. कृषीपीडिया

मल्चिंगसाठी अशा पद्धतीने करा गादीवाफा निर्मिती आणि मल्च लेयिंग यंत्राचा वापर

mulch laying machine

mulch laying machine

 मल्चिंग पेपरचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. पेपरच्या आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित झाल्यामुळे पीक वाढीला फायदा होतो. तसे मल्चिंग पेपरचे भरपूर फायदे आहेत. या लेखामध्ये आपण मच्छी पेपर साठी गादीवाफे ची निर्मिती कशी करतात व मल्चिंग पेपर पसरण्यासाठी मल्चिंग लेयिंग यंत्राचा वापर या बद्दल माहिती घेऊ.

मल्चिंग पेपर साठी गादीवाफ्यांची निर्मिती

  • उभी आडवी नांगरट करून माती भुसभुशीत करावी. शेतात असलेले अंकुश केदार दगड-गोटे किंवा मागील पिकांची अवशेष वेचून बाहेर काढावे.
  • रोटावेटर किंवा कुळवाच्या मदतीने गादीवाफे तीन ते चार फूट अंतरावर तयार करावे लागतात. दोन ओळींमधील अंतर पाच फूट राहणे आवश्यक आहे. अशा गादीवाफ्यावर एका एकरात 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. त्यामध्ये माती परीक्षना  नुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा मिसळावी. त्यानंतर गादीवाफे लागवडीस तयार करावेत. पिकाच्या गरजेनुसार गादी वाफ्याचा आकार  ठरवावा.
  • मल्चिंग पेपर गादीवाफ्यावर बसण्यापूर्वी ठिबकची लॅटरल अगोदर टाकून द्यावी. त्यानंतरच पेपर पसरावा.
  • कागदाच्या दोन्ही बाजू माती मध्ये गाढून घ्यावेत. धातूच्या धारदार कडा असणाऱ्या ग्लासचा उपयोग करून त्रिकोणी पद्धतीने दीड फुटावर छिद्रे तयार करावेत. गरज पडल्यास ग्लास विस्तवावर गरम करून चित्र काढावे.छीद्राचा व्यास तीन इंचापर्यंत असावा. या छीत्रांमध्ये रोपांची लागवड करावी.
  • आंतरमशागतीची कामे करताना पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यावी.

मल्चिंग पेपर पसरण्यासाठी मल्च लेयिंग यंत्राचा वापर

  • मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्चलेयिंग यंत्राचा वापर करावा.
  • या यंत्राच्या वापरामुळे वेळ, मजूर व श्रमात बचत होते.मल्चिंग पेपर चांगल्या प्रकारे अंथरला जातो.
  • यंत्राच्या वापरामुळे बेसल डोस देणे गादी वाफा तयार करणे, लॅटरल टाकणे, पेपर अंथरूण कडेने माती लावणे ही कामे करता येतात.
  • साधारणपणे दोन तासात एक एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरतायेतो.
  • मजुराच्या साह्याने वरील सर्व कामासाठी आठ ते नऊ हजार रुपये प्रति एकर इतका खर्च येतो. तसेच या कामासाठी दीड ते दोन दिवस लागतात. परंतु या यंत्राचा वापर केल्यास एक ते दीड तासात सर्व कामे  एक ड्रायव्हर आणि एक मजुरांच्या साह्याने पूर्ण होते.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters