भारतात अनेक पिकांची लागवड केली जाते, मात्र ठोस असे उत्पन्न कशातून मिळत नाही. यामुळे शेतकरी अडचणीत जातात. यामुळे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना नेहेमी पडतो. देशात उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांपूर्वी स्त्रिया मेहंदीने आपले हात आणि पाय सजवतात.
मेहंदी ही एक औषधी वनस्पती (Medicinal Crops) आहे. जुन्या काळी उन्हाळ्यात हात आणि पायांना उष्णता आणि उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी मेहंदी (Henna Crop) लावली जात असे, असे सांगितले जाते. तसेच यामुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिकच दिसते.
सध्या संस्कृतीला फाटा दिला जात असला तरी बाजारात अजूनही मेहंदी ची मागणी कायम आहे. आता वेगवेगळ्या कंपन्या मेहंदीची निर्मिती करत आहेत. यामुळे याच्या शेतीला देखील तेवढेच महत्त्व प्राप्त आहे.
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो बोगस खते कशी ओळखायची? वाचा साधी सोप्पी पद्धत
यामुळे मेहंदीच्या शेतीतून मिळणारा नफा देखील वाढत आहे. मेहंदी ही एक झुडूप वनस्पती आहे. जी चहासारखी दिसते, परंतु त्याची पाने आणि देठ खूपच निबार असतात. याची शेती कमी पाणी असलेल्या भागात केली जाते.
भारताच्या एकूण मेहंदी उत्पादनापैकी 90% एकट्या राजस्थानमध्ये घेतले जाते. येथिल शेतकरी यामधून लाखो रुपये कमवतात. राजस्थानच्या पाली जिल्ह्याला हेना फार्मिंगचे हब मानले जाते. जिथे जगातील सर्वात प्रसिद्ध 'सोजत मेहंदी' ची लागवड केली जाते.
भाजप नेत्याला मोठा धक्का! 28 वर्षांनंतर साखर कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे
याठिकाणी जगभरातील व्यापारी येतात. येथून मेहंदीची प्रक्रिया आणि पॅकेजिंग केल्यानंतर उत्पादने देश-विदेशात निर्यात केली जातात. यामुळे यामधून चांगला दर मिळतो. याच्या पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी वेगळे कष्ट व श्रम करावे लागत नाहीत.
कमी पाण्याचे क्षेत्र, अवर्षण प्रवण क्षेत्र आणि कमी सुपीक जमीन अशा ठिकाणी मेहंदीचे खूप चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच एकदा रोप लावले की पुढील 25 वर्ष ती टिकतात. याच्या पानांमधून मेहंदी तयार केली जाते.
महत्वाच्या बातम्या;
लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी मिळणार? बैलगाडा चालकांची मागणी
२४५० रुपये FRP बसत असताना २५०० रुपये भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर देणार
ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक
Share your comments