महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून खरीप कांद्याची लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. आपल्याला माहित आहेच की कांद्याची लागवड करण्याअगोदर कांद्याचे रोप वाटिका तयार करायला लागते. रोपवाटिकेचे व्यवस्थापन आणि जोमदार रोपांची निर्मिती हे भविष्यकालीन येणारे कांद्याच्या उत्पादनाचे प्रमाण आणि दर्जा ठरवत असते.
त्यामुळे कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करून दर्जेदार रोपांची निर्मिती होणे हे कांद्याचे उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते.
खरीप हंगाम मध्ये कांद्याच्या लागवडीसाठी रोपवाटिका व्यवस्थापन फारच काळजीपूर्वक करावे लागते. कारण दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे जास्तीचा पावसामुळे
बरेचदा रोपांचे खूप नुकसान होते तसेच ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण खरीप कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Crop Cultivation:कमी कालावधीत अधिक नफा देतात उडीद आणि मूग, या सुधारित पद्धतीने करा लागवड
खरीप कांद्याचे रोपवाटिकेचे व्यवस्थापन
1- जमीन व करायची मशागत- कुठल्याही पिकाची लागवड करण्याअगोदर जमिनीची निवड फार महत्त्वाची ठरते.
यामध्ये आपण कांदा रोपाचा विचार केला तर सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली, वालुकामय चिकन माती युक्त आणि पाण्याचा निचरा उत्तम होईल अशी जमीन खूप योग्य ठरते. सामू साडेसहा ते साडेसात असणे गरजेचे असते.
मशागत करताना रोपवाटिकेच्या वाफ्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी जमिनीला किंचित उतार द्यावा. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी आणि वखरणी करून जमीन तयार करावी. यामुळे किडीच्या अंडी नष्ट होतात तसेच अगोदरच्या पिकांचे अवशेष वेचून नष्ट करावेत.
1- वाफ्यांची तयारी- पाण्याचा निचरा होणारी, उतार व्यवस्थित असलेली जमीन असली तर सपाट वाफा पद्धतीचा अवलंब करावा. जर जमीन पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली भारी असेल,
तर अशा जमिनीत सपाट वाफे यांच्या ऐवजी गादीवाफे फायद्याचे राहतात. परंतु यामध्ये गादी वाफ्यांमध्ये दोन्ही बाजूंच्या सऱ्यामधून वाफ्याला पुरेसे पाणी न मिळाल्यास उगवणक्षमतेवर परिणाम होतो.
यासाठी ठिबक किंवा स्प्रिंकलर चा वापर योग्य ठरेल. गादीवाफे हे दोन ते तीन मीटर लांब, एक ते दीड मीटर रुंद आणि 15 ते 20 सेंटिमीटर उंच असावेत.
3- खताचे व्यवस्थापन- वाफे तयार करणे अगोदर चांगले कुजलेले शेणखत एक किलो प्रति चौरस मीटर जागेला व्यवस्थित मिसळून द्यावी.
प्रत्येक वाफ्याला 15:15:15 ग्रेडचे खत शंभर ते दीडशे ग्राम आणि 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दाणेदार मातीत एकसमान चांगले मिसळून घ्यावे.
किंवा बी टाकण्याअगोदर अर्धा टन कुजलेले शेणखत,2:1:1 किलो नत्र: स्फुरद:पालाश प्रती पाच गुंठे याप्रमाणे द्यावे. पेरणी केल्यानंतर 20 दिवसांनी एक किलो नत्र द्यावे. एक हेक्टर कांदा लागवड करायची असेल तर साधारणतः पाच गुंठे मधील रोपवाटिका पुरेशी असते.
नक्की वाचा:कृषी क्षेत्रातील 'बुरशीजन्य रोग व किडींवर' तेलांची फवारणी अतीशय महत्त्वपूर्ण व परिणामकारक
4- रोपे पिवळी पडू नये म्हणून- खरीप हंगामा मध्ये जास्त पाऊस झाला तर रोपे पिवळी पडणे याचा किंवा पीळ पडण्याचा धोका असतो.
यासाठी बी टाकल्यानंतर दिवसांनी 19:19:19 एखाद दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण -4 हे एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास फायद्याचे ठरते.
पावसाचे वातावरण असेल तर त्यामध्ये स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर प्रमाणे मिसळावे. पाऊस आणि सिंचनामुळे पाणी अधिक होण्याचा संभव असतो.त्यामुळे वेळेस पाणी बाहेर काढावे.
पाणी जास्त वेळ साठवून राहिले तर मुळापाशी हवा खेळती राहत नाही व मुळे अन्नद्रव्ये घेऊ शकत नसल्याने रोपे पिवळी पडतात. तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून रोप मरू शकते.
5- पाण्याचे व्यवस्थापन- रोपवाटिका कमी असेल तर लोट पाणी न देता रोप उगवण होईपर्यंत झारीने पाणी देणे खूप चांगले. रोपवाटिकेचा विस्तार जास्त असेल तरगादीवाफ्यावर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते.
6- तणनियंत्रण- पावसाळ्यामध्ये रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव निश्चितच वाढतो. त्यामुळे आपण निंदणी करतोच. परंतु तुम्हाला तननाशक वापरायचे असेल तर पेरणीनंतर व रोप उगवणीपुर्वी वाक्यावर पेंडिंमिथ्यालीन 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
नक्की वाचा:लिंबूवर्गीय फळ पिके सल्ला व संत्रा-मोसंबी बागेत आंबे बहराचे नियोजन
Share your comments