1. कृषीपीडिया

जाणून घेऊयात गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
earthworm fertilizer

earthworm fertilizer

 भारतात आगोदर रासायनिक खत यायच्या अगोदर शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. परंतु कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येत आहे. त्यामुळे एक पर्यावरण असमतोल निर्माण झाला आहे. जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडूळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक, सेल्युलो लाटकीक आणि लीग्नो लायटिक एंझाईम असतात. यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन सध्या सेंद्रिय पदार्थातील सहजीवी  विषाणू व अॅक्टीनोमाइसिट्स बुरशीमुळे लीगनिनयुक्त सहसा लवकर नको जाणाऱ्या पदार्थाचे अन्नद्रव्येकरण होते. या लेखात आपण गांडूळ खत निर्मितीच्या पद्धती आणि फायदे जाणून घेणार आहोत.

 भारतात आगोदर रासायनिक खत यायच्या अगोदर शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. परंतु कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येत आहे. त्यामुळे एक पर्यावरण असमतोल निर्माण झाला आहे. जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडूळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक, सेल्युलो लाटकीक आणि लीग्नो लायटिक एंझाईम असतात. यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन सध्या सेंद्रिय पदार्थातील सहजीवी  विषाणू व अॅक्टीनोमाइसिट्स बुरशीमुळे लीगनिनयुक्त सहसा लवकर नको जाणाऱ्या पदार्थाचे अन्नद्रव्येकरण होते. या लेखात आपण गांडूळ खत निर्मितीच्या पद्धती आणि फायदे जाणून घेणार आहोत.

 गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

 गांडूळ खत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतीने तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी लागते. या शाळेची लांबी दोन ढिगासाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेड च्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाचा झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लास्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्रांचा उपयोग करावा.

 गांडूळ खत तयार करण्याची ढीग पद्धत

 ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3.0 मीटर लांबीचे आणि 90 सेंटिमीटर रुंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढीगाच्या तळाशी नारळाच्या काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा थर रचावा त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा.

या थरावर तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो. या थरावर पूर्ण वाढलेली गांडूळे अलवारपणे सोडावेत. साधारणतः शंभर किलो ग्रॅम सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष जनावरांचे मलमूत्र धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरिपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. त्यातील कर व नत्राचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय  पदार्थामध्ये चाळीस ते पन्नास टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन  झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशांच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

 

2- गांडूळ खत तयार करण्यास खड्डा पद्धत: खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत. खड्ड्याची लांबी तीन मीटर, रुंदी दोन मीटर आणि खोली 60 सेंटिमीटर ठेवावी. खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस व गव्हाचा कोंडा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः 100 किलोग्राम सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त 50 सेंटिमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळाच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थ मध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावे. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळ खताचा शंक्वाकृती ढीग करावा. ढीगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळुन घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters