1. कृषीपीडिया

आपल्या फळबागेसाठी या पध्दतीने बनवा बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट

बोर्डो मिश्रण हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आपल्या फळबागेसाठी या पध्दतीने बनवा बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट

आपल्या फळबागेसाठी या पध्दतीने बनवा बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट

बोर्डो मिश्रण हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आहे. इतर बुरशीनाशकांपेक्षा स्वस्तही आहे. बोर्डो मिश्रण हे डाळिंब फळपिकात फवारणी केल्यास मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगावर नियंत्रण करते तसेच कीडनियंत्रण करण्यासही मदत करते पण ते चांगल्या प्रकारे बनवने गरजेचे आहे. बोर्डो मिश्रण हे नेहमीच ताजे बनवून लगेच फवारणी करावी यामुळे चांगले रिझल्ट मिळतात.आज बनवलेले बोर्डो मिश्रण हे उद्या फवारणी करू नयेत बोर्डो मिश्रण बनवल्यानंतर फवारणीसाठी काही

अडचण आली जसे की पाऊस पडला किंवा एखादं अर्जंट काम आल्यास दुसऱ्या दिवशी त्यात 50ग्रॅम/लीटर याप्रमाणे गुळ टाकून फवारणी करावी.If there is an urgent task, the next day, add jaggery at 50 grams/liter and spray it.0.5% (आर्धा टक्का) बोर्डो मिश्रण मोरचुद (Copper Sulphate) बारीक पावडर

या पद्धतीने करा खपली गहु लागवड, होईल मोठा फायदा

करून 1/2 (आर्धा) कीलो/100ली पाण्यासाठी घ्यावा आणि त्या सोबत चुना (Lime) शुध्दतेनुसार 125-200ग्रँ/100ली पाण्यासाठी घ्यावा बाकी सर्व वरील पध्दतीने करावे.10%बोर्डो पेस्ट10% बोर्डो पेस्ट ही वर्षातून दोनदा लावने गरजेचे आहे एकदा छाटणी सोबत/छाटणी झाल्यावर लगेच आणि दुसऱ्यांदा पावसाळा संपल्यावर लगेच सप्टेंबर ते

आँक्टोबरमध्ये यामुळे खोडावर खोडकिडा किंवा खोड भुंगेरेचा प्रादुर्भाव होत नाही मोरचुद (Copper Sulphate) बारीक पावडर करून 1किलो/10 ली पाणी. 1किलो मोरचुद प्लास्टिकच्या भांड्यात 5 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या.त्यचप्रमाणे चुना (Lime) 1 किलो/10 ली पाणी. 1किलो चुना प्लास्टिकच्या भांड्यात 5 लीटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. सकाळी जेव्हा तुम्हाला बोर्डो पेस्ट बनवायची आहे तेव्हा चुना आणि मोरचुदचे द्रावण ढवळून एकसारखे प्लास्टिकच्या भांड्यात ओतावे व त्यात

क्लोरोपायरीफाँस 20 मिली किंवा ईमिडाकक्लोप्रिड 20 मिली टाकून लाकडी काठीने चांगले ढवळून घ्यावे त्यानंतर पेस्ट तयार होऊन लाकडी काठीवर थर चढल्यास चांगली पेस्ट तयार झाली समजुन झाडाचे वय आणि ऊंची नुसार खोडावर 1-2.5 फुट वरपर्यंत ब्रशने लावावी.टिप- बोर्डो पेस्टचा pH पाहण्याची गरज नाही टिप - 0.5% बोर्डो मिश्रण फवारणी बाग फुलधारनेपासुन ते फळे काढणी पर्यंत महीन्यातुन एकदा करावी . यामुळे बागेतील सर्व बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोग नियंत्रण होण्यास मदत होते आणि औषधांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होउ शकतो.

English Summary: Make bordeaux mixture and bordeaux paste for your orchard this way Published on: 01 November 2022, 03:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters