1. कृषीपीडिया

Cotton Farming: कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार! कापसाच्या 'या' वाणाला मिळाली मंजुरी, पुढच्या खरीपापासून होणारा लागवडीसाठी उपलब्ध

कापूस हे एक महत्वपूर्ण पीक असून कापसाची लागवड महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये केली जाते. परंतु तरीदेखील तुलनेने विचार केला तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या पट्ट्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड होते. जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर कापूस हे पीक शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक दृष्टीने आधारस्तंभ असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक गणित कापूस पिकावर अवलंबून आहे. सध्या जर मागच्या वर्षापासून विचार केला तर कापसाला चांगल्या प्रकारे बाजारात दर मिळत असून यावर्षी देखील बऱ्यापैकी स्थिती आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mahabij new veriety of cotton

mahabij new veriety of cotton

कापूस हे एक महत्वपूर्ण पीक असून कापसाची लागवड महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये केली जाते. परंतु तरीदेखील तुलनेने विचार केला तर खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या पट्ट्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड होते. जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर कापूस हे पीक शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक दृष्टीने आधारस्तंभ असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक गणित कापूस पिकावर अवलंबून आहे. सध्या जर मागच्या वर्षापासून विचार केला तर कापसाला चांगल्या प्रकारे बाजारात दर मिळत असून यावर्षी देखील बऱ्यापैकी स्थिती आहे.

नक्की वाचाजाणून घ्या, सोयाबीन, कापसाचे अर्थकारण यंदा कोलमडणार काय?

 परंतु केल्या एक ते दोन वर्षाचा विचार केला तर कापूस पिकावरील विविध प्रकारच्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून  उत्पादनात देखील घट येत आहे.

परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर एक कापसाच्या बियाण्याबाबत महत्वाचे अपडेट समोर आली असून कापसाचे उत्पादन वाढावे या दृष्टिकोनातून महाबीजने एक नवीन बियाणे विकसित केले आहे. या बियाण्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.

 महाबिजने केले कापसाचे नवीन बियाणे विकसित

 महाबिजने कापसाचे नवीन बियाणे विकसित केले असून हे नवीन संकरित बियाणे रस शोषक किडींना प्रतिरोधक असून या कपाशीच्या नवीन वाणाला राज्यात व्यावसायिक वाढीसाठीची मान्यता देखील देण्यात आली आहे. महाबिजने  विकसित केलेले हे बियाण्याची बोंडे आकाराने मोठे असून या माध्यमातून शेतकऱ्यांना कापसाचे अधिक उत्पादन मिळणे शक्य होणार.

नक्की वाचा:Organic Farming: सेंद्रिय शेतीतील अन्नद्रव्य व्यवस्थापनात 'हे' तीन घटक आहेत पिकांसाठी वरदान, वाचा या संबंधीची डिटेल्स माहिती

जर आपण कापूस पिकाचा विचार केला तर सर्वात जास्त फवारणीचा खर्च हा रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागतो. परंतु हे वाण रस शोषक किडींना प्रतिरोधक असल्यामुळे शेतकरी बंधूंचा उत्पादन खर्च देखील वाचणार आहे.

महाबिजने  महाबीज १२४ बीजी 2 हे कापसाचे नवीन संकरित वाण विकसित केले आहे. याबद्दल महत्वाचे म्हणजे कृषी पिकांसाठी वाणाना मंजूरी देणाऱ्या पीक मानांकन केंद्रीय उपसमितीच्या 88 व्या बैठकीत नुकतेच महाबीजच्या या विकसित वाणाला राज्यात व्यावसायिक लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची अधिक उत्पादन देणाऱ्या कापसाच्या नवीन जातीची मागणी त्यामुळे आता पूर्ण होणार आहे. महाबिजने तयार केलेले हे नवीन वाण शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचे ठरणार असून पुढील खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकासाठी हे वाण येत्या खरीप हंगामापासून उपलब्ध केले जाणार आहे.

नक्की वाचा:Onion Seed: शेतकरी बंधूंनो! 'हा' काळ आहे कांदा रोपवाटिका टाकण्याचा,टाळायचे असेल नुकसान तर कांदा बियाणे खरेदी करण्याआधी घ्या 'ही' काळजी

English Summary: mahabij develope a new cotton veriety that give more production of cotton Published on: 04 November 2022, 09:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters