1. कृषीपीडिया

जाणून घ्या, सोयाबीन, कापसाचे अर्थकारण यंदा कोलमडणार काय?

महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जाणून घ्या, सोयाबीन, कापसाचे अर्थकारण यंदा कोलमडणार काय?

जाणून घ्या, सोयाबीन, कापसाचे अर्थकारण यंदा कोलमडणार काय?

महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी या दोन्ही पिकांना चांगला दर मिळाल्याने ही वाढ झालेली दिसत आहे. मात्र यंदा सोयाबीन आणि कापूस दोन्हींच्याही दरात सतत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे अर्थकारण कोलमडणार की काय असे सध्याचे चित्र आहे.मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाला, एकवेळ तर प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत कापसाचे भाव पोहोचले होते. त्यामुळे यंदाही

कापसाला तसेच भाव कायम राहतील, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता.Farmers predicted that the price of cotton would remain the same. काही भागात आता नवीन कापूस आला असून, काही शेतकरी विक्री करत आहेत.

वाचा रब्बी कांदा उत्पादन वाढीची सूत्रे

पण सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कापसाला साडेअकरा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, आता झपाटय़ाने दर कमी झाले आहेत. दुसरीकडे, सोयाबीनचा हंगाम आता सुरू झाला आहे. केंद्राने यंदा सोयाबीनला ४ हजार ३०० रुपये हमीभाव

जाहीर केला आहे. सध्या सोयाबीनला हमीभावाच्या दरम्यान दर मिळत आहे. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर दर सुधारू शकतात. तर दुसरीकडे सध्या जुन्या सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विचार करता सोयाबीनचा बाजारभाव कमी आहे. यंदा सोयाबीन उत्पादन जास्त राहण्याची शक्यता सोयाबीन प्रक्रिया उद्योगांनी व्यक्त केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते नुकसान वाढले आहे.यंदा महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ४६.०१ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. यंदा त्यात तब्बल २ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा राज्यात सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्र ४८.७६ लाख हेक्टर एवढे आहे. गेल्या वर्षी ३९.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा त्यात ३ लाख हेक्टरने वाढ झाली असून सद्यस्थितीत कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र ४२ लाख २९ हजार हेक्टर एवढे आहे.

बाजारात सोयाबीनचे दर घसरणीला लागल्याने

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागात सोयाबीनच्या काढणीची तयारी सुरू आहे, सोयाबीनचे दर प्रति क्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल इतके खाली आले आहेत. गेल्या वर्षी याच काळात सोयाबीनला सरासरी ८ हजार २६४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.विविध देशांमधील सोयाबीनचे उत्पादन, चीनसारख्या मोठय़ा खरेदीदार देशाकडून होणारी आयात, सोयाबीनची उत्पादकता, सोयाबीन पेंडीची (डीओसी) मागणी अशा अनेक घटकांवर सोयाबीनचे दर ठरत

असतात. बाजारात सोयाबीन दरात काहीशी चढ-उतार सुरू आहे. चीन आणि इतर देशांची मागणी वाढल्यास सोयाबीनला आधार मिळेल. त्यामुळे सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार नाही, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.गेल्यावर्षी खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारने पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात मोठी कपात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खाद्यतेलाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

त्यामुळे देशात सोयाबीनसह पामतेलाची आयात वाढत आहे. परिणामी देशातील खाद्यतेल दरांवर परिणाम झाला आहे. केंद्राने खाद्यतेल आयातीवरील हे शुल्क मार्च २०२३ पर्यंत कायम ठेवले आहे. सरकारने दोन वर्षांमध्ये तब्बल ४० लाख टन सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. म्हणजेच यंदा २० लाख टन तेल आयातीवर कोणतेही शुल्क नसेल. या दोन निर्णयांचा बाजारावर सध्या परिणाम जाणवत

English Summary: Know, will the economy of soybeans, cotton collapse this year? Published on: 03 November 2022, 11:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters