ज्या मातीचा १ ग्रामनिर्मितीसाठी २०० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो त्य मातीला मातीमोल म्हणून तिची किंमत शून्य ठरवणारे आम्ही किती कृतघ्न!
पृथ्वीवर निवास करणाऱ्या ६.७ अरब लोकसंख्येला ९५% अन्न उत्पादन करणारे मध्यम म्हणजे माती. म्हणून मातीला आपण काळी आई म्हणतो.भार्घूस आणि दर्जेदार पिकांचे उत्पादन हवे असेल तर आपल्या शेतातील माती सुधा तेवढीच सुपीक व निरोगी हवी. ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो. मागचा वर्षीचे घोषवाक्य ‘पृथ्वीचे संरक्षण करूया मातीचा राक्षनाने’. मातीचा महत्व अधोरीखीत करून तिचा आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करण्या साठी हा दिवस.
आता प्रश्न पडतो कि असे की घडले, कि मातीसाठी हा दिवस साजरा करण्याची वेळ आली. आपण आकडेवारी पाहूया. भारताचा ३२८.७३ दशलक्ष जमिनीच्या क्षेत्रफळ पैकी १२०.४ दशलक्ष एवढी जमीन नापीक होत चालली आहे. पाणी आणि हवे मुळे देशातील दर वर्षी ५.६ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन नष्ट होत आहे. महाराष्ट्राचा ३.०७ दशलक्ष क्षेत्रापैकी ४२.५% जमीन खराब आहे. राज्यातील १५९ लाख हेक्टर शेत्र दुष्काळाच्या घायेत येते. इतर राज्यांचा तुलनेत उस वगळता इतर सर्व पिकांची उत्पादकता कमी असून, महाराष्ट्रात सुमारे १४६ लाख हेक्टर शेत्रावर माती आणि पाणी संवर्धनाची गरज आहे.
मातीची निर्मिती प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असून, खडका पासून बारीक कण निर्मितीसाठी शेकडो वर्ष लागतात. उन,वारा, पाउस या निसर्गचक्र मुळेअनेक प्रकारचे खडक खंडित होत होत मातीत रुपांतर होण्यास शेकडो म्वर्ष लागतात. माती हि ४ घटकान पासून बनलेली असते. त्या मध्ये २५% मतीचे कण,२५% पाणी, २५% हवा, ५% सेंद्रिय कर्ब असतो, ती पिकाचा वाढीला आदर्श माती. हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजावे.
मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे मातीचे गुणवत्ता मोजण्याचे २ परिमाणे आहेत.मातीची सुपीकता म्हणजे पिकला लागणारे सर्व अन्नघटक पुरवण्याचे मातीची अंगभूत क्षमता असते .हि क्षमता मातीचा निर्मिती प्रक्रीये पासून तयार झालेली असते. ती सहजासहजी बदलता येत नाही. पिकाचा वाढी साठी १७ अन्नघटक लागतात. यापैकी एक अन्नघटक जरी कमी असली तरी पिकाचा वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुपीक जमिनीत सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात असतात आणि पिकला उप्लाम्ध होतील अशा स्वरूपात असतात. मातीची उत्पादकता पिकाचा एकरी उत्पादनाशी संबधित आहे. जीवाणू खतांचा वापर , कीड रोग नियंत्रण करून एकरी उत्पादन शेतकरी किती घेतो यावरून मातीची उत्पादकता ठरते.
सुपीक मातीची मोठ्या प्रमाणावर होणारी धूप हा चिंतेचा वषय आहे. सुपीक माती हि ४ कारणांनी नष्ट होते.
• पाऊस, नद्यांना पूर आदीं मुळे पाण्याचा प्रवाहात सुपीक माती वाहून जात आहे.
• वृक्षतोडीमुळे व चराउ कुरणे नष्ट झाल्याने ओसाड जमिनीवरील मातीची उन वार्यामुळे होणारी धूप वाढली आहे.
• भौतिक करणानमुळे होणारी धूप जसे शहरीकरण,औधागीकरण, रस्ते विकास ह्या मध्ये होणारे मातीचे स्थलांतर.
• रासायनिक प्रक्रियेने होणारी धूप जसेकी एकाच प्रकारची पिक घेतल्याने होणारी अन्न घटकांची कमतरता घटते सेंद्रिय कर्ब, पाण्याचा अतिरिक्त वापरांमुळे साचलेला क्षार ह्यामुळे नापीक होत चालेली जमीन.
मातीचे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे पाण्याचा जास्त वापर,जमिनीची धूप , रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर, एकाच एक पिक घेणे आदि. खर्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याचा जास्त वापरा मुळे. पिकला पाणी दिले कि पिक हवे तेवढे शोषून घेते व उरलेले जमिनीत साचून राहते.साचलेले पाणी हे जमिनी मध्ये असेलेली हवा बाहेर काडून आपले स्थान बनवते. वेळीच पाण्याचे निचरा झाला नाही तर मुळाना हवा मिळत नही व पिकाचे वाढ खुंटते. साचलेल्या पाण्यात क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाचा उष्णतेने पाण्याचे भाष्पिभावन होते. मात्र क्षार जमिनीवर मातीचा कणात अडकते. म्हणून जास्त पाणी देणे हे कधीही घतक.
मातीचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतातून मातीचा योग्य पद्धतीने नमुना कडून तो प्रयोगशाळेत तपासून घेणे हे शेतकर्याचे पहिले कर्तव्य आहे.
प्रयोगशाळेत मातीमधील उपलब्ध नत्र ,स्फुरद,पालाशचे प्रमाण ,सेंद्रिय कर्ब,मातीचा सामू,विधुत वाहकता आदि घटकांचे प्रमाण त्याला अनुकूल पिक व त्या पिकासाठी खताची शिफारस या बाबींची विस्तृत मातीची आरोग्यापात्रिका तयार करून शेतकऱ्याला दिले जाते. मातीचा सामू ६.५ ते ७.५% असल्यास पिकाच विकासासाठी आदर्श असतो. मातीतील सेंद्रिय कर्ब हे पिकासाठी अहोरात्र काम करणाऱ्या जीवनुंसाठी खाद्य असत.शिवाय सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर पाणी जमिनीत चांगले मुरते,ओलावा टिकून राहतो,माती भुसभुशीत राहते.म्हणून चांगले कुजलेले शेन खात ,लेंडीखत,गांडूळखत,किंवा हिरवळीच खतांचा जीवाणू खतान सोबत वापर करावा.पिकाचा वाढी साठी १७ घटकांची आवशकता असते.त्या मध्ये नत्र ,स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्य बहुतांश शेतकरी वापरतात. काल्शिम,मग्नेशिअम ,गंधक हे दुय्यम अन्नघटक असून शेतकरी त्याचा कडे दुर्लक्ष करतात.युरिया सारखी स्वस्त खत जमिनीचा पोत खराब करतात. जीवाणू खतांचा वापर केल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहते व उत्पादन सुद्धा वाढते.
शेतातील कडी कचरा, गावात न जलता मुल्स्थानी पिकाच्या अवशेषांचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. पाणलोट शेत्राचा विकासावर भर देऊन माथा ते पायथा योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील. शेतातील झाडांची संख्या घाटात आहे.बांधावर,पाणलोट शेत्रात,गावरान आदि शेत्रात वृक्षारोपण केल्यास मातीची धूप थांबते.पिकांची फेरपालट करावी.मुगानंतर ज्वारी आणि सोयाबीन नंतर गहु पेरावा.दल्वर्गीय पिके हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर करतात जे पुढील पिकला उपलब्ध होते व मातीतील अन्नद्रवयाचे संतुलन राखले जाते.मातीची सुपीकता टिकवण्य साठी संतुलित खत वापर अत्यंत गरजेचे आहे. मातीही अत्यंत दुर्लभ आणि दुर्लक्षित संसाधन आहे, हि जागरूकता देशातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे हि काळाची गरज आहे.
Share your comments