आइस्क्रीम खाणे कोणाला आवडत नाही. त्यातल्या त्यात इतर फ्लेवर पेक्षा व्हॅनिला फ्लेवर (vanilla flavor) हा अनेकांच्या आवडीचा. मात्र व्हॅनिला फ्लेवर चा वापर हा केवळ आईस्क्रीमपुरता मर्यादित नाही. केक तसेच अनेक खाद्यपदार्थांमध्ये व्हॅनिला फ्लेवरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र तुम्हाला आवडणाऱ्या व्हॅनिला फ्लेवरच्या पिकाबद्दल तुम्ही कधी माहिती जाणून घेतली आहे का? नसेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे.
मादागास्कर, पापुआ न्यू गिनी, भारत आणि युगांडा यांसारख्या देशांमध्ये याची लागवड केली जाते. केशरनंतर व्हॅनिला पिक हे जगातील दुसरे सर्वात महाग पीक आहे, कारण त्याची मागणी केवळ भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये आहे. याचा वापर आईस्क्रीम, केक, कोल्ड्रिंक, परफ्यूम आणि इतर सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
नाही म्हटलं तरी जगात बनवल्या जाणार्या आइस्क्रीमपैकी 40 टक्के आइस्क्रीम ही केवळ व्हॅनिला फ्लेवरचे असते. त्यामुळे व्हॅनिलाला बाजारात मोठी मागणी आहे. व्हॅनिला फळाचा सुगंध मनमोहक असल्याने सौंदर्य प्रसाधनांसाठीही याचा वापर केला जातो. परिणामी, बाजारात व्हॅनिलाच्या फळांना आणि बियांना चांगली मागणी आहे. तुम्हीही शेतात काही वेगळा प्रयोग करायचा विचार करत असाल तर व्हॅनिलाची शेती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
चवदार असणाऱ्या या व्हॅनिला फ्लेवरचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. त्यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांना चांगला नफा करून देऊ शकते.
व्हॅनिला लागवडीबद्दल
कोणत्याही पिकाची लागवड करताना शेतजमीन महत्वाची भूमिका बजावत असते. या पिकासाठी तपकिरी माती योग्य आहे . मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.5 असणे गरजेचे आहे. व्हॅनिलाची लागवड करण्यासाठी, त्याचे बियाणे दोन प्रकारे पेरू शकता. पहिला मार्ग म्हणजे कटिंग आणि दुसरा पर्याय म्हणजे बियाणे पेरणे.
शेतकरी याची लागवड करून 3 वर्षांनी नफा घेऊ शकतात, कारण व्हॅनिलाचे पीक 3 वर्षानंतर उत्पन्न देऊ लागते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर शेती करून तीन वर्षांनी लाखोंची कमाई करू शकतात.
व्हॅनिलाला फुले तयार होण्यासाठी सुमारे 9 ते 10 महिने लागतात. यानंतर, रोपांमधून बिया काढल्या जातात. या बियांचा वापर नंतर अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जातात. सध्या भारतात व्हॅनिला बियांची किंमत 40 रुपये ते 50,000 रुपये प्रति किलो आहे. अशा परिस्थितीत व्हॅनिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
आरोग्यसाठी उत्तम
व्हॅनिलामध्ये व्हॅनिलिन हे रासायनिक घटक असते. हा घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो असे डॉक्टरांचे मत आहे. याशिवाय कॅन्सरसारख्या आजारांवर व्हॅनिलाची फळे आणि बिया खूप गुणकारी मानल्या जातात. यासोबतच, व्हॅनिला पोटाच्या समस्यांना आराम देण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे . सर्दी, फ्लू यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. अशा आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या आणि जगातल्या महागड्या पिकाची लागवड करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
महत्वाच्या बातम्या:
FRP: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच, आंदोलन पेटण्याची शक्यता
8 दिवसांपासून अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी सांगितले कारण...
Share your comments