1. कृषीपीडिया

Land Survey Application: शेतकऱ्यांनो काही मिनिटात मोबाईलद्वारे करा जमिनीची मोजणी; नवीन अँप लॉन्च

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवरुन कमी श्रमात जमिनीची मोजमाप करता येणार आहेत. आता टेपची किंवा पट्ट्याची गरज भासणार नाही. काही मिनिटात शेट जमीन मोजता येणार आहे.

Land Survey

Land Survey

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवरुन कमी श्रमात जमिनीची मोजमाप करता येणार आहेत. आता टेपची किंवा पट्ट्याची गरज भासणार नाही. काही मिनिटात शेट जमीन मोजता येणार आहे.

जमीन मोजण्यासाठी शेतकऱ्यांकडे (farmers) फक्त एक स्मार्टफोन असण्याची गरज आहे, ज्यामध्ये इंटरनेट आणि जीपीएसची सुविधा असेल. शेत किंवा जमिनीचे मोजमाप करण्यासाठी अर्ज करावा लागतो मात्र आता त्यानंतर हे सर्व काम या अँप्लिकेशनद्वारेच (Application) केले जाईल.

हे ही वाचा 
E-Crop App: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; ई-पीक पाहणीसाठी नवे 'अ‍ॅप' उपलब्ध

हे अँप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनमध्ये घेण्यासाठी शेतकरी बांधवांना आधी गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) जावे लागेल. यानंतर तुमच्यामध्ये "distance and area measurement" नावाचे अँप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्यानंतर फोनचा GPS ऑन करून हे अँप्लिकेशन ओपन करा.

हे ही वाचा 
भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना घरबसल्या भरता येणार शेतीसंबंधीचे कर

मोबाईलने शेताचे मोजमाप कसे करायचे?

1) फोनमध्ये "distance and area measurement" नावाचे अँप्लिकेशन उघडल्यानंतर "Distance" , मीटर, फूट, यार्ड इत्यादीसाठी मोजमापांपैकी एक निवडा. जर शेतकरी शेतजमिनीचे मोजमाप करत असतील तर ते Area साठी Acre हा ऑप्शन निवडू शकतात.

2) आता तुम्हाला तळाशी एक स्टार्ट बटण दिसेल, जे दाबून तुम्हाला मोजण्यासाठी जमिनीभोवती पूर्ण फेरी काढावी लागेल. जमिनीच्या कानाकोपऱ्यातून क्षेत्रफळ मोजायचे आहे. त्यामुळे तुमची एक फेरी पूर्ण होताच तुमच्या जमिनीचा पूर्ण आकार कळेल.

3) शेतकऱ्यांनी या अँप्लिकेशनचा वापर केला तर फायद्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या 
Farmers Fund: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! खात्यात जमा होणार 50 हजारांचा निधी
Organic Foods: 'हा' व्यवसाय घरबसल्या सुरू करा; दरमहा मिळतील 50 हजार रुपये
Pest Management: शेतकरी मित्रांनो आता पिकांचे नुकसान टळणार; किडीचे करा असे व्यवस्थापन

English Summary: Land Survey Application few minutes through mobile phone Published on: 01 August 2022, 06:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters