1. सरकारी योजना

भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना घरबसल्या भरता येणार शेतीसंबंधीचे कर

शेतकऱ्यांना (farmers) शेतीसंबंधीतले विविध कर भरण्यासाठी तलाठ्याकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या, आता याबाबद भूमी अभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या शेतीसंबंधीतले कर भरता येणार आहेत.

farmers agricultural taxes home

farmers agricultural taxes home

शेतकऱ्यांना (farmers) शेतीसंबंधीतले विविध कर भरण्यासाठी तलाठ्याकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या, आता याबाबद भूमी अभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या शेतीसंबंधीतले कर भरता येणार आहेत.

शेतकरी आता स्वतः ऑनलाईन पद्धतीने शेती संदर्भातले कर भरू शकणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) तयार केलेल्या ई पीक पाहणी ॲपवर (E Crop Inspection App) नोंदणी केलेल्या पिकाच्या क्षेत्रानुसार करविषयक ऑनलाइन यूपीआय ची माहिती घेऊन कर भरू शकणार आहेत.

राज्यातल्या जवळपास 356 तालुक्यातील प्रत्येकी एका गावात याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना लागू केली जाणार आहे.

हे ही वाचा 
Onion Rate: कांद्याचे दर वाढले! बाजारपेठेत मिळतोय 'इतका' दर, जाणून घ्या आजचा बाजारभाव

राज्यात गेल्या वर्षी ई पीक पाहणी ॲप मधून पिकांची नोंदणी (Registration of crops) करण्यास सुरुवात झाली त्याला तीन महिने अर्थात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षाच्या काळात भूमी अभिलेख विभागाला ईपीक पाहणीत अनेक नवीन बाबी समाविष्ट करण्याची संधी मिळाली.

त्यानुसार ह्या ॲप मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आलेत. त्याचे अनावरण एक ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक निरंजन कुमार सुधांशू यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

हे ही वाचा 
Kisan Credit Card: काय सांगता! किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजात मिळणार कर्ज; जाणून घ्या व्याजदर

काय होईल फायदा

1) नवीन ॲपला ई चावडी हा प्रकल्प जोडण्यात आला असून शेत सारा व संबंधित महसूल गोळा करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

2) ॲप वर नोंदणी केलेल्या पिकामुळे आपल्या शेती क्षेत्रावर किती कर आहे याची माहिती हातातच उपलब्ध होणार आहे.

3) शेतकऱ्याला जमिनीवरील शेतसारा शिक्षण उपकर जिल्हा परिषद उपकर रोजगार हमी उपकर अधिकारांचा व जमीन महसूल भरणा घरबसल्या करता येणार आहे.

4) राज्य सरकारला ही एका क्लिकवर राज्यात नेमका किती कर सेस गोळा होणार आहे याचा अंदाज येईल. त्यामुळे याचा फायदा नियोजनासाठी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
E-Crop App: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; ई-पीक पाहणीसाठी नवे 'अ‍ॅप' उपलब्ध
Horoscope: कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

English Summary: Land Records Department farmers agricultural taxes home Published on: 01 August 2022, 02:44 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters