1. कृषीपीडिया

शेतीतील किटकांचे योगदान जाणून घ्या.

माणसाला निसर्ग आणि शेती समजण्याच्या कितीतरी आधी पासून किंबहुना पृथ्वीवर माणूस येण्याच्या किती तरी आधी पासून कीटक ह्या पृथ्वीवर शेती करत आले आहेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतीतील किटकांचे योगदान जाणून घ्या.

शेतीतील किटकांचे योगदान जाणून घ्या.

माणसाला निसर्ग आणि शेती समजण्याच्या कितीतरी आधी पासून किंबहुना पृथ्वीवर माणूस येण्याच्या किती तरी आधी पासून कीटक ह्या पृथ्वीवर शेती करत आले आहेत. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांमधून पृथ्वीवरील जीवजंतू आणि वृक्षसंपदा यांच्यामध्ये अतूट असे बंध जुळत गेले, आणि ह्यातून जीवसृष्टी अधिक समृध्द होत गेली. पृथ्वीवर आत्ता पर्यंत जवळपास ८०% कीटकांचा अभ्यास झाला आहे ज्यात जवळपास ९००,००० इतक्या किटकांच्या प्रजाती आहेत असे समोर आले आहे. वरती दिलेला आकडा कदाचित चुकीचा असू शकतो, इतक्या प्रचंड प्रमाणात पृथ्वीवर कीटक आहेत. जवळपास ८०% वनस्पती आणि वृक्षांचे परागीकरण किटका मुळेच होत असते.

 

काही झाडं तर अशी आहेत की ज्यांच्या फुलाच परागीभवन त्यांना हवा असलेला विशिष्ट किटकच करेल ह्याची वृक्ष काळजी घेत आले आहेत. ह्याची उदाहरणे कित्तीतरी निसर्गात विखुरलेली आहेत. पण ह्याच सर्वोत्तम उदाहरण द्यायचे झाले तर वड, पिंपळ, अवदुंबर इत्यादी वृक्षांचे देता येईल. जेवढ्या जातींचे अवदुंबर तेवढ्याच विविध जातींचे असतात ' वास्प ' छोट्याश्या केमु सारखे दिसणारे हे कीटक त्याचं जीवन एखाद्या वडाच्या किव्वा औदुंबर फळा मधे सुरू करतात आणि त्याचा शेवट ही ह्याच फळा मधे होतो. ह्या सगळ्याची सुरुवात होते वडाला किव्वा औदुंबरला फुले येण्यापासून. होय फुले, आपण ज्याला औदुंबर किंवा वडाचे फळ समजतो प्रत्यक्षात ते फळ नसते. ते असते हजारो कळ्यांनी भरलेलं एक फुल ज्याला डोक्यावर एक छोटेसे छिद्र असते. विशिष्ठ जातीच्या वड उंबर प्रजातिंमधे त्या प्रजातीच्या वृक्षाला हवे असलेल्या किटका लाच आत येता यावे एवढेच छिद्र ह्या फुलांना असतें.

वास्प किटकाची मादी ह्या छिद्रातून आत प्रवेश करताना तिला असलेले पंख आणि डोक्यावर असलेले स्पर्षक (antene) गमावते, मग तिचा अंधाऱ्या फुलांच्या बागेत प्रवेश होतो, इथे तिच्या अवती भोवती खूप साऱ्या कळ्या असतात. आत येताना तिने आणलेल्या पराग कण ती ह्या कळ्यांना देते. तसे केल्यानंतर या कळ्यांचे फुलामध्ये रुपांतर होते. ह्या अंधार्‍या फुलांच्या बागेमध्ये मग वास्प कीटकाची मादी अंडी घालते आणि तिथेच दम तोडते. ह्या नंतर सृष्टीच दुसर चक्र ह्या अंधाऱ्या बागेत सुरू होत ते म्हणजे सृजनाच. मादीने घातलेली अंडी मोठी होतात त्यातून सर्वप्रथम नर बाहेर येतात. नाराना पंख नसतात, त्यांच्या नंतर पंख वाल्या मद्यांचा जन्म होतो. आणि दोघांचे ह्या अंधाऱ्या बागेतच मिलन होते. मिलनानंतर नर मद्याना फुलांच्या अंधाऱ्या बागेतून मुक्त करण्यासाठी धडपड करत आतून सुरुंग खोदत मग औदुंबराच्या फळाला ( असंख्य फुलांभोवती असलेल्या आवरणाला आपण एकत्रित रित्या फळ म्हणतो.) छिद्र पडतात आणि त्यातच सारे नर मरून जातात. पण त्यांच्या साऱ्या माद्या फुलांच्या कैदेतून आजाद होतात. ह्या कैदेतून बाहेर पडत असताना त्या फुलांमध्ये असलेले परागकण घेऊन बाहेर पडतात. लवकरच त्या मरणार असतात पण मारण्या आधी त्यांना पुन्हा नवीन चक्र सुरू करायचं असते आणि त्या साठी त्या नवीन झाडाच्या शोधात असतात आणि मग परागीभवनासाठी तयार असलेल्या फळामधून माफ करा फुलांच्या बागेतून सुटलेल्या गंध पुन्हा त्यांना कैदेत जाण्यास प्रवृत्त करतो आणि सृष्टीच दुसर चक्र सुरू होते. 

अश्याच प्रकारे किती तरी फुलांचे देखील असते. आपल्याला हव्या असलेल्या कीटकालाच आपल्या पर्यंत पोहोचता यावे म्हणून झाडे आप आपल्या फुलांचे रंग हव्या असलेल्या कीटकालाच ते फुल दिसेल ह्या प्रमाणे ठेवत आली आहेत. उदा, लाल रंगाची फुलं मधमाश्यांना दिसत नाहीत आणि तीच फुल फुलपाखरांना बरोबर दिसतात ह्याची सोय झाडं करत आली आहेत. त्याच बरोबर फुलांचा आकार देखील त्या प्रमाणे झाडे निवडतात ज्या मुळे त्या जातीच्या फुलात दडलेला मकरंद विशिष्ट कीटकालाच टिपता येतो. काही फुले फुलपाखराची असतात तर काही रात्री फिरणाऱ्या पतंगांची असतात. फुलपाखराची सोंड (probosis) ही पतंगांच्या सोंडी पेक्षा लहान असते त्या मुळे ज्या फुलांना पतंग परागिभवित करतात त्या फुलांच्या परागा पर्यंत फुलपाखरांना पोहोचता येतं नाही. आणि अशी फुलं बहुदा रात्रीच्या वेळेला किव्वा संध्याकाळी फुलणारी असतात. कारण ह्या वेळेत सकाळी झोपी गेलेला पतंग जागा होऊन भुकेसाठी फिरत असतो. आणि ह्या वेळी फुलपाखरे झाडांच्या पाना खाली झोपी गेली असतात. 

       

त्याच बरोबर आपल्याला घरात अतिशय नकोशी झालेली माशी देखील परागी भवनाचे सर्वात महत्त्वाचं काम करत असते. तिच्या बरोबर गांधील माशी (paper wasp) मोठी मधमाशी (bumble bee) इत्यादी अनावश्यक वाटणाऱ्या माश्या देखील परागीभवन करण्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शेतातून बऱ्याचदा सुकलेल्या खोडा मधे मातीच घरटे असलेल्या माश्या राहत असतात अशी लाकडे आपण सरपण म्हणून जाळून टाकतो.

त्याच प्रमाणे जमिनीत शेणावर, आणि झाडांच्या अवती भवती फिरणारे भुंगे आपल्याला नकोशे वाटत असतात. पण, वांगी, टॉमेटो, भोपळे मिर्ची इत्यादी पिकांचे परागीभवन करण्यासाठी भुंगे खूप आवश्यक असतात. ते जेव्हा फुला भोवती येऊन गुणगुण करतात तेव्हा त्यांचं गाणं ऐकूनच फुल परागीभवन करण्यास तयार होतं. अश्या प्रकारच्या परागीभवन प्रक्रियेला बझ्झ पोलिनेशन म्हणतात. 

हा झाला कीटकांचा परागीभवनाचा भाग, कीटक शेती मधे शेकडो मजुरांच्या पेक्षा जास्त राबतात पण बदल्यात आजवर आपण त्यांना काय दिलं??? ज्या प्रमाणे शेतात मजुराने दिवसभर मेहनत केल्या नंतर आपण त्यांना पगार देतो त्या प्रमाणे कीटक आपल्याकडे पगार मागत नाहीत. पण त्याच्या मेहनतीचा हिस्सा ते खाऊ पाहतात. पण बिचारे दुर्दैवी कीटक आपण त्यांना तेही खाऊ देत नाहीत. आपण कीटक आले की सरळ कीटकनाशके फवारून त्यांना जिवानिशी ठार करतो. त्यांना जन्म घेण्यासाठी, राहण्यासाठी आवश्यक असणारी बांधावरची झाडझुडपं आपण कचरा समजून पेटवून देतो किव्वा उपटून टाकतो.

कीटक जास्त दूर जात नाहीत त्या मुळे जंगल किव्वा डोंगर दर्या च्या पायथ्याशी असलेल्या शेतात त्यांना सहज ये जा करता येते. पण जिथे आजूबाजूला झाडं झुडपं नाहीत, आणि दूर वर शहर पसरलेले आहे अश्या ठिकाणी असलेल्या शेता पर्यंत त्यांना पोहोचता येत नाही. रात्री लोकवस्ती मधे लावलेल्या विजेच्या दिव्यांच्यारोषणाई भोवती आकर्षित होऊन कीटक सम्मोहित होतात आणि दिव्याभोवती फिरून फिरून दमून मरून जातात. आणि इथे त्यांची वाट बघत असलेली फुलं फुलतात आणि सुकून जातात पण त्यांचं फळ होत नाही.

 

प्रा. भूषण भोईर

सह.प्रा. प्राणीशास्त्र विभाग, 

सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,

पालघर. 

८२३७१५०५२३

English Summary: know about insects important role in farming Published on: 12 March 2022, 11:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters