ऑक्झिन्स च्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते.
झिंक चे कार्य
• प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.
• झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
• झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.
• झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे.
• पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते.
झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-
• जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिंक ची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते.
• झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस) चे गुणोत्तर – जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते.
• नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो.
• सेंद्रीय पदार्थ – जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते.
• जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते.
• झिंक व कॉपर चे गुणोत्तर – पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते.
• झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर – मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते.
जस्त (झिंक) ZN चे विविध स्त्रोत
जस्त (झिंक) Zn चे विविध स्त्रोत
उत्पादन रासायनिक फॉर्म्युला सर्वसाधारण झिंकचे प्रमाण
झिंक सल्फेट ZnSO4-H2O 21 %
झिंक क्लोराईड ZnCl2 43-45 %
झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट ZnEDTA 12 %
झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट ZnHEDTA 6-10%
Share your comments