1. कृषीपीडिया

"खात" आणि "ताप" या भारतीय पारंपारिक शेतीतील दोन महत्वाच्या बाबी आहेत, समजून घेणे आवश्यकच

कोणतेही पीक झालेनंतर जमिनीची खोल नांगरट केली जाते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
"खात" आणि "ताप" या भारतीय पारंपारिक शेतीतील दोन महत्वाच्या बाबी आहेत, समजून घेणे आवश्यकच

"खात" आणि "ताप" या भारतीय पारंपारिक शेतीतील दोन महत्वाच्या बाबी आहेत, समजून घेणे आवश्यकच

कोणतेही पीक झालेनंतर जमिनीची खोल नांगरट केली जाते. उन्हात ती नांगरट चांगली तापवली जाते. मातीच्या भौतिक संरचनेनुसार हा नांगरट तापवण्याचा कालावधी ठरतो.काळ्या मातीच्या ठिकाणी नांगरटीने मोठमोठी ढेकळे निघतात. अशा ठिकाणी नांगरट जास्त कालावधीकरीता तापवावी लागते. तर माळाच्या जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीत

नांगरटीने ढेकळे न निघता माती मोकळी होते. अशा स्थितीत नांगरट जास्त कालावधीकरीता न तापवता, सरी-वरंबा पद्धतीने ताप द्यावा लागतो (Photo) काळ्या जमिनीच्या ठिकाणीही नांगरट काही कालावधीकरीता तापवल्यानंतर, सरी-वरंबा पद्धतीने जमिनीमध्ये ताप द्यावा लागतो अश्या पद्धतीने सलग दोन किंवा तीन महिने जमिनीला ताप द्यावा.In this way, the soil should be heated for two or three consecutive months.

१) मातीच्य तापमानात वाढ होते.शेतातील वरच्या ५ सें. मी थरातील मातीचे तापमान ४२℃ ते ५५℃ पर्यंत वाढते तर त्याखालील ४५ सें. मी . पर्यंतच्या मातीचे तापमान ३२ ℃ ते ३७℃ पर्यंत वाढते. २) मातीच्या भौतिक व रासायनिक वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा होते.उन्हाचा ताप दिल्यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाचा वेग वाढतो ज्यामुळे विद्राव्य स्वरूपातील, मूलद्रव्ये नायट्रोजन(NO3, NH4+) कॅल्शिअम (Ca++), मॅगनेशियम (Mg++), पोटॅशिअम(K+),फॉलिक ऍसिड इत्यादी पिकांकरीता उपलब्ध होतात. मातीच्या कणांची रचना बदलते.

३) किडींचे नियंत्रण : जमिनीतील हानिकारक बुरशी, जीवाणू, निमॅटोड, कोषावस्थेतील कीडी इत्यादींचे चांगल्या प्रकारे नियमन होते.मातीतील रासायनिक बदलांमुळेही काही प्रकारच्या किडींचे नियंत्रण होते. फ्युमिगेशन सारख्या रासायनिक प्रक्रियांना काही किडी दाद देत नाहीत त्या किडींचे नियंत्रण उन्हाची ताप दिल्याने (Soalrization) झाल्याचे आढळले आहे. 

४) बुरशी, जीवाणू, निमॅटोड उन्हाचा ताप दिल्याने मातीतील अनेक प्रकारच्या हानिकारक बुरशी व जीवाणूंचे नियंत्रण केले जाते. (Table No - 1) काही प्रकारच्या तणांवरही नियंत्रण मिळते ५) मातीतील लाभकारी सूक्ष्मजीवांना चालना मिळते.मायक्रो-हायझा बुरशींच्या वसाहतीमध्ये वाढ आढळली आहे. ट्रायकोड्रामा ,अॅस्परजिलस या बुरशींची संख्या वाढते.बॅसिलस, सुडोमोनास या सारखे जिवाणू काही कालावधीनंतर झपाट्याने वाढतात. 

English Summary: "Khat" and "Tap" are two important aspects of Indian traditional agriculture, must be understood Published on: 05 September 2022, 09:01 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters