1. कृषीपीडिया

चक्रभुंगा व्यवस्थापनासाठी फक्त एव्हढ करा आणि चक्रीभुंग्या पासून सोयाबीन ला सुटका मिळवा

येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे या महिन्यात आपण सोयाबीनची लागवड करणार

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
चक्रभुंगा व्यवस्थापनासाठी फक्त एव्हढ करा आणि चक्रीभुंग्या पासून सोयाबीन ला सुटका मिळवा

चक्रभुंगा व्यवस्थापनासाठी फक्त एव्हढ करा आणि चक्रीभुंग्या पासून सोयाबीन ला सुटका मिळवा

येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे या महिन्यात आपण सोयाबीनची लागवड करणार आणि काही दिवसात सोयाबीन पिकावर चक्रभुंगा या किडीसाठी किटनाशकाची फवारणी घेणार आहोत. दरवर्षी या किडिचा प्रादुर्भाव दिसुन येतो व या किडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायझोफाॕस,प्रोफेनोफाॕस, लॕम्बडा साहायलोथ्रीन, किंवा आणखी काही अंतरप्रवाही किटनाशके फवारतो.पण खरच हा चक्रभुंगा नियंत्रणात येतो का.आपण फवारल्या नंतर आपण एखाद्या वेळेस प्रादुर्भावग्रस्थ खोड फोडुन पाहिले का की चक्रभुंगा अळी मेली का नाही. हे आपण केव्हाच बघत नाही.

फक्त किटनाशक फवारुन समाधान मानतो. मित्रहो ही किड पानाच्या देठाच्या आत किंवा खोडाच्या आतुन खाणारी आहे तिच्या पर्यंत किटनाशक पोहचणे बहुतेक शक्य होत नाही. आता पर्यंत मी बरेच निरिक्षणे घेतली कुठलेही किटनाशक या किडीसाठी प्रभावी नसल्याचे दिसुन येते.मग काय करायचे - आधी या किडीचे नुकसान जानुन घेऊ. ही किड पिक 20-25 म्हणजे 5-6 पानाचे झाल्यावर नर - मादी भुंग्याचे मिलन झाल्यावर कोवळ्या देठावर किंवा खोडावर दोन चक्र काप करुन म्हणजे करकुंडा पाडुन मादी मधात एक पिवळसर अंड घालते व लांबुन अंडी घातलेले पान किंवा खोड सुखलेले दिसुन येते. 

अशाप्रकारे एक मादीभुंग तीच्या जिवनात 70-80 अंडी घालते म्हणजे तेव्हढेच झाड बाधीत करते. हे अंड 7-8 दिवसांनी उबवते व अळी तयार होऊन 3-4 दिवसांनी मुख्य खोडात सिरते (म्हणजे ती 8-12 दिवस पानाच्या देठातच असते).पुढे खोडात शिरल्यावर खोड पोखरत पिक पक्व होईपर्यंत झाडाच्या बुडापर्यंत पोहचते व परत जमिनीपासून 1-2 इंचावर काप करते व झाड सोंगनी करतांना अलगत मोडून येते. या मुळे शेंगा भरत नाही दाने बारीक होतात. आशा प्रकारे ही किड नुकसान करते. मग व्यवस्थापन कसे करायचे जसे साप बाहेर असेल तोपर्यंतच आपण त्याला पकडू शकतो किंवा मारु शकतो, एकदा का तो बिळात गेल्यावर काहिच करु शकत नाही तसेच या किडीचे आहे जो पर्यंत

अंड्यात व देठात आहे तोपर्यंतच ही किड आपण नियंत्रणात आणु शकतो ती खोडात शिरल्यावर काहीच करु शकत नाही . तेव्हा ज्या शेतक-यांची शेती कमी आहे किमान त्यांनी तरी हा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही. तो म्हणजे चक्रभुंग्यामुळे सुकलेले पान करकुंड्यासह तोडुन घेऊन नस्ट करने. तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का. करुन बघायला काय हरकत आहे. पट्टा पद्धत आसेल तर आणखी सोपे जाते, सुरुवात एक एकराने करा किती वेळ लागतो ते बघा. एका बाईच्या मजुरीत एक एकर होते असे दर आठवड्याला चार -पाच आठवडे पिक जरड होईपर्यत केले तर 100% चक्रभुंगा चे व्यवस्थापन होईल. करुन बघा शक्य आहे. पटल तर करा नाही तर किटनाशक फवारा.

 

विठ्ठल धांडे

कृषि सहाय्यक, विश्वी, ता. मेहकर जिल्हा बुलडाणा

English Summary: Just do this for chakrabhunga management and get rid of soybeans from chakrabhunga Published on: 06 June 2022, 07:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters