कापूस या पिकास 650-850 मि.मी. पान्याची आवश्यकता असते . कापूस पिकाची लागवड संपूर्ण भारतात फेब्रुवारी ते जुलै या काळात केली जाते, व विभिन्न प्रकारच्या जमिनीवर कापसाची लागवड होत असल्यामुळे तसेच सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या जाती वेगवेगळया कालावधीमध्ये पक्व होतात, 140 दिवसापासून ते 180 दिवसात येणाऱ्या शेकडो कंपन्यांच्या जवळजवळ 1000ते 1200 कापूस वाण बाजारात उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रात मुख्यतः बारामती फलटण परिसरात फेब्रुवारी मार्च महिन्यात In Maharashtra mainly in Baramati Phaltan area during the month of February and March ,खान्देशातील जळगाव ,धुळे ,
अशी करावी फायद्याची करडई लागवड
नंदुरबार या जिल्ह्यात व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जेथे मुबलक सिंचनाची व्यवस्था आहे तेथे मान्सूनपूर्व कापूस लागवड केली जाते. कापूस या पिकास जमीन, हंगाम, हवामान व वाणाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी जास्त असते.महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकास हंगामानुसार (मान्सून पूर्व आणि कोरड) 200-700 मि.मी.
पाण्याची गरज असते. कापूस पिकास लागणाऱ्या एकूण पाण्याच्या गरजेपैकी लागवडी पासून पाते लागण्यापर्यंत 20%, पाते लागणे ते फुले धरण्याच्या काळात 40%, फुले धरणे ते बोंडे लागण्यापर्यंत 30% ,आणि बोंडे लागणे ते शेवटची वेचणी होईपर्यंत 10% पाण्याची गरज असते.म्हणजेच सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते, पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कापूस या पिकाला पाण्याची गरज
सर्वाधिक असते. त्यानंतर परत पाण्याची गरज कमी होते. सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडाची व मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. हे जे पाणी आपण कापसाला देतो त्यालाच उभारीचे पाणी असे म्हणतात.
टिप - 6, 7 , 8, ऑक्टोबर या कालावधीत तापमान वाढून, स्थानिक ढग निर्मिती होऊन, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील, कापूस उत्पादक जिल्ह्यात, तुरडक ठिकाणी मेघ गर्जनेसह, चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता यापुढे सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. आपापल्या भागात पावसाचा अंदाज पाहूनच कापूस पिकास उभारीचे पाणी द्यावे*
प्रा.दिलीप शिंदे
भगवती सिड्स
चोपडा जिल्हा जळगाव
9822308252
Share your comments