1. कृषीपीडिया

ऊसातील हुमणी: मे ते ऑगस्ट या काळातील सातत्यपूर्ण प्रयत्न ठरतील ऊस पिकातील हुमणीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर

हुमणी किड हे खूपच नुकसानकारक कीड असून याचे नियंत्रण मिळवणे देखील फारच कठीण असते. पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल तसेच अवर्षणाची स्थिती इत्यादी कारणांमुळे गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून उस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
integrated management is useful in humni insect in cane crop

integrated management is useful in humni insect in cane crop

हुमणी किड हे खूपच नुकसानकारक कीड असून याचे नियंत्रण मिळवणे देखील फारच कठीण असते. पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल तसेच अवर्षणाची स्थिती इत्यादी कारणांमुळे गेल्या नऊ ते दहा  वर्षांपासून उस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

या किडीचा बंदोबस्त करायचा असेल तर सामुदायिक रीतीने एकात्मिक नियंत्रण करणे खूपच गरजेचे आहे. ऊस पिकामध्ये हुमणी जातीचा प्रादुर्भाव झाला तर उसाच्या उगवनी मध्ये 40   टक्‍क्‍यांपर्यंत तर उत्पादनामध्ये 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे याच्या नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट या महिन्याच्या दरम्यान चा काळ व या काळातील सातत्यपूर्ण प्रयत्न  खूपच महत्त्वाचे आहेत. या लेखामध्ये आपण ऊस पिकातील हुमणी चे नियंत्रण कोणत्या पद्धतीने करता येते हेपाहू.

 एकात्मिक नियंत्रण देऊ शकते हुमणी किडीपासून मुक्तता           

 हुमणी किडे चा विचार केला तर अमुक एखाद्या कीटकनाशक किंवा अमुक एखादी उपायोजना कामी येते असे होत नाही. महत्त्वाचे कारण म्हणजे या किडीच्या ज्या अवस्था आहेत त्या बहुतांशी जमिनीखाली पूर्ण होतात. त्यातील फक्त भुंगेरे ही अवस्था मिलनासाठी व पाने खाण्यासाठी पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला जमिनीतून बाहेर पडते. हीच एक संधी आहे  की यामध्ये हुमणीचे नियंत्रण करता येणे शक्य आहे. त्यामुळे या वेळेतच सामुदायिक रीत्या प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. आता आपण हुमणीच्या काही एकात्मिक नियंत्रणाच्या पद्धती पाहू.

 एकात्मिक नियंत्रणाच्या पद्धती

1- जमिनीची नांगरणी- एप्रिल व मे किंवा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दोन ते तीन वेळा उभे आणि आडवे शेत चांगले नांगरून घ्यावी. नांगरणी केल्यामुळे जमिनीतील अळ्या बाहेर आल्याने पक्षी व प्राणी त्या वेचून खातात.

2- आलेली ढेकूळ फोडणे- नांगरटी करताना मोठी ढेकळे उठल्यास यामध्ये हुमणीच्या काही अवस्था राहू शकतात. त्यामुळे रोटावेटर मारून ढेकळे फोडून घ्यावीत.

3- पीक फेरपालट- एखाद्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात असतो. अशा वेळी उसाची तोडणी झाल्यानंतर खोडवा घेऊच नये. त्याऐवजी सूर्यफुलाचे पीक घ्यावे  व सूर्यफुलाचे पीक निघाल्यानंतर शेतीची तीन-चार वेळा नांगरणी करावी.

4- सापळा पीक पद्धत- च्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असतो अशा मध्ये भुईमूग  किंवा ताग या पिकांची सापळा पीक म्हणून लागवड करावी. पाऊस उडवल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकाणी भुईमुग किंवा तागाची लागवड करावी. भुईमूग आणि ताग कोमेजलेला दिसला की त्यांच्या खालील आळ्या नष्ट कराव्यात.

5- उसाची आपण आंतर मशागत करतो तेव्हा मशागत करताना बहुतांशी खुरपणी करताना बहुतेक अळ्या बाहेर पडतात. तेव्हा अशा अळ्या वेचून त्या माराव्यात.

6- जेव्हा वळवाचा पहिला पाऊस पडतो त्यावेळी भुंगेरे बाहेर पडतात व बाभूळ किंवा कडू निंबाच्या झाडावर खूप मोठ्या प्रमाणात गोळा होतात. अशावेळी फांद्या हलवून भुंगेरे खाली पाडावेत किंवा हे शक्य नसेल तर प्रकाश सापळ्यांचा वापर करून त्यांना गोळा करावेत. गोळा केलेल्या भुंगेरे यांना रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून मारावेत. केवळ एकदाच हे केल्याने हुमणीचे नियंत्रण होत नाही तर सलग तीन ते चार वर्ष एकत्रितरित्या असे केल्यास फायदा होतो.

 रासायनिक नियंत्रण थोड्या प्रमाणात पडू शकते उपयोगी

1- वळवाचा पाऊस पडल्या नंतर हुमणीचे भुंगेरे जेव्हा बाहेर येतात व कडुनिंबाचा किंवा बाभळीच्या झाडावर बसतात. अशावेळी या झाडांवर इमिडाक्लोप्रिड  (17.8 टक्के एस एल )0.3 मिली प्रति लिटर फवारणी करावी.

2- आपण जेव्हा शेतामध्ये शेणखत टाकतो त्यावेळी शेणखताचा द्वारे हुमणीचे अंडी व अळ्या शेतामध्ये जातात. अशावेळी शेणखत टाकताना प्रति गाडी शेणखतामध्ये शिफारशीत कीटकनाशक एक किलोच्या प्रमाणात मिसळावे. नंतर त्याचा वापर शेतात करावा. उन्हाळा सुरू असताना शेणखताची लहान लहान ढीग करावेत.

3- ऊस लागवड करताना सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये फिप्रोनील (0.3 टक्के दाणेदार ) 25 किलो प्रति हेक्‍टर मातीमध्ये मिसळावे किंवा क्लोथियानिडीन ( 50 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी ) 250 ग्रॅम या प्रमाणात वाळूमध्ये मिसळून पिकाच्या मुळाजवळ मातीत टाकावी व नंतर हलकेसे पाणी द्यावे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:स्मार्ट व्यवस्थापन देईल स्मार्ट उत्पादन! या पद्धतीने तुरीचे हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन शक्य

नक्की वाचा:पशुपालक मित्रांनो! जनावरांच्या चारा व्यवस्थापनात डॉ. शरद कठाळे सरांचे अनमोल मार्गदर्शन

नक्की वाचा:संत्रा उत्पादकांनो! संत्र्याचे फळगळ होत आहे? तर डॉ. अतुल.पी. फुसे सरांचे मार्गदर्शन पडेल उपयोग

English Summary: integrated management is useful in humni insect in cane crop Published on: 25 April 2022, 10:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters