1. कृषीपीडिया

अतिशय महत्त्वाचे! खार जमीन असेल तर या पद्धतीने शक्य आहे खार जमीन सुधारणा, वाचा सविस्तर

खार जमिनीत जास्त प्रमाणात कोकणातील किनारपट्टी भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी खार जमिनी आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
improvement method of shar rich land and proper for the cultivate to crop

improvement method of shar rich land and proper for the cultivate to crop

 खार जमिनीत जास्त प्रमाणात कोकणातील किनारपट्टी भागामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी खार जमिनी आहेत.

किनारपट्टी भागात भरतीमुळे येणार्‍या खार्‍या पाण्याच्या सततच्या शिरकावा मुळे असेच उन्हाळ्याच्या दिवसात बाशफीभवनाच्या क्रियांमुळे समुद्रकाठच्या किंवा खाडी काठाच्या जमिनी सतत क्षारयुक्त राहिल्यामुळे खार युक्त होतात. कोकण विभागातील या खार जमिनी अति पावसाच्या भागात असल्याने पावसाच्या पाण्याबरोबर क्षार वाहून जाऊन या खरीप हंगामामध्ये लागवडीखाली आणणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण खार जमिनीची सुधारणा करण्याच्या काही पद्धती पाहू.

 मशागतीच्या या पद्धती ठरतील फायदेशीर

1- उलकट- उन्हाळ्यामध्ये एप्रिल व मे महिन्याच्या काळात ज्यावेळी क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यावेळी संबंधित जमीन पहारा घर कुदळीच्या सहाय्याने खोदून ढेकुळ उलट्या टाकण्यात येतात या पद्धतीमुळे जास्त क्षारांचा भाग खाली जाऊन कमी क्षारांचा भाग वर येतो आणि जमीन मोकळी होऊन क्षारांचा निचरा पटकन होतो. तसेच अशा जमिनीतील लव्हाळ, लोन कट इत्यादी तने पृष्ठभागावर येऊन उन्हामुळे मरून जातात.

2- विंधणी- यामध्ये जमिनीत अंदाजे 30 ते 45 सेंटिमीटर अंतरावर वरची डेप काढून खड्डा तयार करण्यात येतो. जून महिन्यामध्ये जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा पहिल्या पावसाचे पाणी अशा खड्ड्यांमध्ये साठले जाते व त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून क्षारांचा निचरा होण्याचे कार्य सुरू होते.

3- चर काढणे- अशा जमिनीच्या प्रत्येक शेताच्या कडेला बांधाच्या बरोबरीने अंदाजे 30 सेंटिमीटर खोल व 60 सेंटिमीटर रुंदीचे चर चारही बाजूंनी खणतात. अशात चाळीमध्ये जमिनीतील क्षार यांचा निचरा होण्यास मदत होते. पावसाळ्यामध्ये सुरुवातीच्या काही काळामध्ये या चाळींमधील पाणी चरा मध्ये सोडून देण्यात येते व त्यामुळे क्षार वाहून जातात.पण नंतर ते पाणी या चाळीमध्ये साठवून ठेवले जाते. त्यामुळे पाऊस लांबला तरी एकाला ओलावा मिळतो.

4- बांध घालने- समुद्रकिनारी खाडीच्या पाण्याचे अतिक्रमण थोपविण्यासाठी बांधावयाच्या बाह्य काठाचा खाडीच्या बाजूकडील उतार 1:2 या प्रमाणात असावा. बाहेरील काठाच्या ज्या भागावर खाडीतील पाण्याचा  व लाटांचा दाब जास्त प्रमाणात असतो तेथे पाणी जाऊ नये म्हणून खाडी कडील बाजूस काठाला दगडाच्या अस्तर द्यावे.

5- चर काढणे- खार जमिनी जलद सुधारण्यासाठी प्रक्षेत्रावर प्रत्येक दोनशे मीटर अंतरावर चर काढावेत.

6- उथळ  मशागत- जमीन सुधारण्यासाठी प्राथमिक कालावधीमध्ये पूर्वमशागत उथळ करावी.

7- खार जमिनींसाठी भाताच्या जाती- खार जमिनीमध्ये भात लागवड करताना पनवेल एक, पनवेल 2, दामोदर, एम के 47 -22, एस एच आर 3-9 या जातींचे चांगले उत्पन्न येते.

8- घट्ट लावणी महत्त्वाची- भाताची रोपे 28 ते 30 दिवसांचे झाल्यावर लावणी करावी तसेच भाताची लावणी घट्ट करावी आणि एका चुडात चार ते पाच रोपे लावावीत.

9- शेणखताचा वापर- खार जमीनीमध्ये भात पिकासाठी हेक्‍टरी दहा टन शेणखत वापरावे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:क्रिकेटनंतर कडकनाथ! धोनीचे पोल्ट्री व्यवसायात पदार्पण, जाणून घेऊ कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्ये

नक्की वाचा:कृषी क्षेत्राने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या, १.१० कोटी जणांना संधी

नक्की वाचा:ऊस उत्पादनवाढीत मेन फॅक्टर आहे गंधक; ठरेल ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक

English Summary: improvement method of shar rich land and proper for the cultivate to crop Published on: 26 April 2022, 03:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters